नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

बॅरिस्टर नाथ पै

लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि अंगी ज्ञानलालसा असल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत बॅरिस्टर नाथ पै हे चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२२ रोजी झाला. विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्य चळवळीत घेतलेल्या सहभागामुळे त्यांनी तुरुंगवास भोगला होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतांनाही, आर्थिक मदत मिळवून ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले होते. बॅ. पै यांचे मराठी व इंग्रजीवर कमालीचे प्रभुत्व होतेच, शिवाय ते […]

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक फिरोझ खान

१९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘दीदी’ या चित्रपटाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३९ रोजी बंगलोर येथे झाला. १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘टारझन गोज टू इंडिया’ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी व्यक्तिरेखा साकारली होती. १९६५ साली प्रदर्शित झालेला ‘ऊँचे लोग’ हा चित्रपट त्यांचा पहिला ‘हिट’ चित्रपट ठरला. त्यानंतर आलेल्या ‘आरजू’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील […]

अभिनेता सुनील बर्वे

मराठी-हिंदी-गुजराती नाटक, टीवी मालिका व चित्रपट अशी अभिनयाची सर्वच क्षेत्रात आपल्या प्रसन्न अभिनयाने वावर करणारे सुनील बर्वे मागील २५ पेक्षा अधिक वर्ष मराठी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९६६ रोजी झाला. सुनील बर्वे मुंबईतल्या पाटकर कॉलेजातून रसायनशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्‌सी. झाले. त्यांनी यू.एस. व्हिटॅमिन्स या कंपनीत एक महिना नोकरी केली, पण तिथे त्यांचे मन […]

ज्योति प्रकाश दत्ता उर्फ़ जे.पी.दत्ता

बॉलीवुड चे प्रसिध्द निर्माते दिग्दर्शक ज्योति प्रकाश दत्ता उर्फ़ जे.पी.दत्ता यांचा जन्म ३ आक्टोबर १९४९ रोजी झाला. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता ओ.पी.दत्ता हे जे.पी.दत्ता यांचे वडील. ५ डिसेंबर १९७१, लोंगेवालाची लढाई या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारीत जे.पी.दत्ता यांनी “बॉर्डर” हा चित्रपट अतिशय रोमांचकारी आणि स्फ़ूर्तीदायक असाच बनवला होता. असेच कारगीलचे युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. […]

देश की सुरेली धडकन विविधभारती

स्थापना : ३ आक्टोबर १९५७ आज विविधभारती साठ वर्षाची झाली. जेव्हा भारतात जनतेच्या मनोरंजनासाठी वाहून घेतलेली कोणतीही वाहिनी नव्हती, तेव्हा विविध भारतीचा उदय झाला. त्या वेळी रेडिओ सिलोन हे एकमात्र विरंगुळ्याचे साधन होते. संगीताच्या सुवर्णयुगात नागरिकांसाठी मनोरंजन वाहिनी सुरू करण्याची कल्पना सुचली आणि विविध भारती सेवेला प्रारंभ झाला. ३ आॅक्टोबर १९५७ रोजी आकाशवाणीवरून शीलकुमार शर्मा यांच्या […]

माधव गडकरी

तब्बल सहा दशके वृत्तपत्रीय क्षेत्रात ‘चौफेर’ मुशाफिरी करणारा, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार असलेला एक लढवय्या, व्यासंगी, व्रतस्थ पत्रकार, एक तत्वचिंतक, मार्गदर्शक, पत्रकारितेच्या अथांग सागरातील दीपस्तंभ माधव गडकरी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२८ रोजी मुंबईत झाला. एकविसाव्या वर्षांपासून आपल्या अमोघ वक्तृत्वाने राज्यात, देश-विदेशात अनेक उत्तमोत्तम भाषणांसह व्यासपीठ गाजवणारे फर्डे वक्ते, लिहावे कसे… बोलावे कसे.. याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजेच […]

सदाबहार, चिरतरुण, चॉकलेट हिरो – देव आनंद

देव आनंद यांचे मूळ नाव देवदत्त पिशोरीमल आनंद असे होते. त्यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. लाहोरच्या प्रसिद्ध सरकारी कॉलेजमध्ये १९४२ मध्ये इंग्रजी साहित्यात ग्रॅज्युएशन केले. याच कॉलेजमध्ये त्यांची ओळख बलराज साहनी, बी. आर. चोपडा, आणि खुशवंत सिंह या भविष्यात खूप मोठ्या झालेल्या व्यक्तींशी झाली.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लष्कराच्या सेन्सॉर ऑफिसमध्ये कारकून पदावर […]

त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार राजा रवि वर्मा

राजा रवि वर्मा यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. त्यांचा जन्म २९ एप्रिल १८४८ रोजी झाला. राज रविवर्म्याने काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावेत, ते समजले. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रविवर्म्यानॆ काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात. रविवर्म्याचा जन्म केरळमधील कोईल तंपुरन येतील किलिमनूर राजवाड्यात झाला. त्याचे वडील मोठे विद्वान […]

२ ऑक्टोबर आज आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी

वयाच्या सातव्या वर्षी दिनकर कैकिणी यांनी एका संगीत सोहळ्यात उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद फैय्याज खान व उस्ताद अब्दुल करीम खाँ या तीन संगीत दिग्गजांचे गाणे ऐकले. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला. उस्ताद फैय्याज खानांचे गाणे ऐकल्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिथेच संगीत कलेची साधना करण्याचा व फैय्याज खानांच्या गायनशैलीला आत्मसात करण्याचा निश्चय केला. त्यांचे प्रथम […]

प्रसिद्ध पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ

‘निसर्गराजा ऐक सांगतो’, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या लोकप्रिय गीतांसह ‘कुदरत’ चित्रपटाच्या शीर्षक गीतामुळे रसिकांच्या मनात घर करून राहिलेले गायक म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ. लहानपणापासूनच राकट पण तितकाच श्रवणीय आवाज लाभलेल्या चंद्रशेखर गाडगीळ यांचे त्याकाळी बालगंधर्व यांनी भरभरुन कौतुक केले होते. पंडित हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, पंडित गोविंदप्रसाद जयपूरवाले, पंडित मनोहर चिमटे, पंडित […]

1 294 295 296 297 298 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..