नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

‘अक्षरकार’ कमल शेडगे

कमल शेडगे हे धुरंधर, ज्येष्ठ कलाकार. अक्षरांची कलात्मक मांडणी करून शेडगे शीर्षकाला असं काही रुपडं बहाल करत असत की ते शीर्षक हीच कलाकृतीची ओळख बनत असे. कमल शेडगे यांनी मुद्रित माध्यमात विपुल काम केले असले तरी त्यांची खरी ओळख होती ती टाईम्स समूहातील प्रकाशनांसाठी तसेच नाटक, सिनेमाच्या जाहिरातींसाठी त्यांनी केलेल्या कला दिग्दर्शन व सुलेखनामुळे! […]

अभिनेते टॉम अल्टर

ज्येष्ठ चित्रपट, टीव्ही आणि नाट्य अभिनेते टॉम अल्टर यांचा जन्म २२ जून १९५० मसुरी येथे झाला. सोनेरी केस, निळे डोळे आणि टॉम अल्टर या नावामुळे चटकन अमेरिकन किंवा ब्रिटिश वाटणारा हा ज्येष्ठ अभिनेता-लेखक जन्माने आणि मनाने मात्र पक्का भारतीय होता. […]

आंतरराष्ट्रीय सेल्फी डे

जगातली पहिली सेल्फी घेतला गेला होता तो १८३९ साली. अर्थात त्यावेळी सेल्फी हा शब्द रूढ झाला नव्हता. स्मार्टफोनचा जन्म होण्यापूर्वीही हातात कॅमेरा घेऊन स्वतःची छबी टिपण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता. उपलब्ध माहिती नुसार जगातील पहिली सेल्फी १८३९ घेतली गेला. फिलाडेल्फिया येथे एका दिव्यांच्या दुकानाबाहेर रॉबर्ट कॉर्नेलिअस यांनी ही सेल्फी घेतली होती. […]

सारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक

समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ आहे. नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे ‘विद्येचे माहेरघर’ मानले जाते. परंतु नवसाला पावणाऱ्या ‘तळ्यातला गणपती’ने पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अगदी आत्तापर्यंत हे ठिकाण “तळ्यातला गणपती” याच नावाने ओळखले जायचे. […]

जागतिक संगीत दिन

जागतिक पातळीवर संगीत-दिन साजरा करण्याची प्रथा प्रथम फ्रान्सने पाडली. तिथे या दिवसाला फेटे डे ला म्युसिक्यू असे संबोधितात. फ्रान्समधील एक ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी त्यावेळेच्या तिथल्या सांस्कृतिक विभागासाठी या सोहळ्याची सुरुवात केली होती.
[…]

जगप्रसिद्ध आयबीएम कंपनी

इंटरॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्पोरेशन म्हणजेच आय.बी.एम. ही आयटी क्षेत्रातील जगात दुसर्‍या क्रमांकाची कंपनी म्हणून जगजाहीर आहे. “आयबीएमचा सेल्समन अथवा कर्मचारी क्षणाला काही न काही विकत असतो” हे वॅटसनचे वाक्य मात्र आपल्याला विचार करायला लावते. […]

सरोजिनी शंकर वैद्य

सरोजिनी वैद्य या ललित लेखिका, चरित्रकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध होत्या. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक म्हणून त्यांनी योगदान दिलं होतं. […]

कविवर्य प्रा. शंकर वैद्य

‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’,‘शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा’, ‘पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई’ अशा अनेक अजरामर शब्दरचनांनी काव्यरसिकांवर अनेक दशके गारूड करणारे प्रा. शंकर वैद्य यांना वयाच्या सहाव्या वर्षापासूनच कवितेची गोडी लागली. […]

ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी

प्रेमानंद गज्वी हे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणे यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रेमानंद गज्वी यांचे ‘घोटभर पाणी’ अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालं. ‘श्रेष्ठ भारतीय एकांकी’ या द्विखंडीय ग्रंथात प्रसिद्धही झालं. […]

अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक किसन बाबूराव हजारे उर्फ अण्णा हजारे यांचा जन्म १५ जून १९३७ भिंगार, अहमदनगर जिल्हा येथे झाला. अण्णा हजारे यांचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. किसन यांना सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात मदत व्हावी म्हणून किसनने शिक्षण सोडून नोकरी शोधण्यास सुरुवात केली. […]

1 197 198 199 200 201 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..