नवीन लेखन...
प्रकाश पिटकर
About प्रकाश पिटकर
मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.

वासंतिक झुळूक ….. फुलोरा

हैदराबादच्या आमच्या घराजवळच एक छोटीशी टेकडी आहे. त्यावर एक लहानसं गार्डन आहे. आम्ही रोज सकाळी इथे चालायला जातो. आज जरा अंमळ लवकरच गेलो. साडे सहाच्या थोडसं अगोदरच. वातावरण अति प्रसन्न होतेच पण आजचा सकाळचा वारा काही वेगळाच होता. त्यात असा एक सुखद गारवा होता की जो अंतर्मनाला फार सुंदर स्पर्श करत होता. एक तास झाला पण […]

कोंडुरा ….एक दिव्य अनुभव

त्या दिवशी मोठ्या रिक्षाने शिरोड्याहुन सकाळी निघायलाच नऊ वाजून गेले आणि वाटेत देव वेतोबा ..माऊली चं दर्शन घेऊन परुळे करीत भोगव्याला पोचायला जवळ जवळ दुपारचे बारा वाजले …. मी फार अस्वस्थ झालो .. कारण हा किनारा फार सुंदर आणि इथून दिसणारी विशाल समुद्राची निळाई … मला कॅमेऱ्यात टिपायची होती .. मला इथे नऊ वाजता पोचायचं होतं ..सकाळच्या […]

प्रवासाचं सुंदर देणं ….. 

प्रवासाचं सुंदर देणं ….. बामणोली … वासोटा … नागेश्वर … चोरवणे… अविस्मरणीय ट्रेक) (हा फोटो वरंध घाट परिसरातला आहे … मागे जो मोठा डोंगर दिसतोय तो … वरंध घाटातला कावळा किल्ला … महाराजांनी याला फार सुंदर नाव दिलं … चंद्रगड … इथेच खाली स्वामी समर्थांची शिवथर घळ … सुंदर मठ आहे … सह्याद्रीचा हा परिसर पंचमहाभूतांचा […]

हरकूळ बॅक वॉटर्स

हरकूळ बॅक वॉटर्स …. फोंडा … भिरवंडे …. सांगवे …. कनेडी परिसर … सह्याद्रीचा पायथा (राधानगरी घाट) …. तळकोकण आयुष्याच्या सायंकाळी सूर मनांतच सनईचे दूर दिगंती मृदू रंगांचे मनमोहन घन मलईचे कोण वागलें काय वाउगें त्याचा आतां विसर पडे भलें पुटा जें आलें त्याचे सडेच मागें आणि पुढें स्नेह पांगले त्या घाटांतिल उंबरठयावर गोड उषा पाणवठयावर […]

राधानगरी घाट.. सह्याद्रीचा महासमर्थ मुलुख !

दास डोंगरी राहातो …..! राधानगरी घाट.. सह्याद्रीचा महासमर्थ मुलुख ! दाजीपूर….राधानगरीचा …. फोंडा …. भिरवंडे … हरकूळ … नरडवे … सांगवे … कनेडी …… हा सहयाद्रीच्या घाटमाथ्याचा … पायथ्याचा महा मातब्बर मुलुख …घनदाट अरण्याचा… आकाशाला स्पर्श करणाऱ्या सहयकडयांचा…कल्पनेपलिकड़े कोसळणाऱ्या पावसाचा… कडेकपाऱ्यांतून …. दऱ्याखोऱ्यातून अहोरात्र थैमान घालणाऱ्या वाऱ्याचा …फुसांडत कोसळणाऱ्या प्रपातांचा … निसर्गाच्या या सगळ्या सामर्थ्यचं प्रतीक […]

राधानगरी धरण परिसर …. डोंगरमाथा … 

राधानगरी धरण परिसर …. डोंगरमाथा … गूढरम्य …. बेलाग सह्याद्री …. ! माझ्या व्याकुळल्या मना …. नको साकळून राहू सख्या आपुल्या गतीने तू मी निरंतर वाहू …. नित्य चांगले स्मरावे .. ओखटे ते विसरावे अहंतेचे द्वाडपण नीट ओळखून घ्यावे ….. आपुली ही पायपीट येथे थोडया दिवसांची वाट पहाते पहाट सोसलेल्या अवसांची …. साकळलेपणामुळे विष प्रसवते जिणे […]

मॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका

या सूर्यास्ताला ‘मॅनहॅटनहेंज’ म्हटलं जातं. याला मॅनहॅटन सोल्स्टाईस असंही म्हटलं जातं. असा हा सूर्यास्त वर्षातून दोन वेळा होतो … मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात आणि जुलैच्या दुसऱ्या आठवडयात. अगदी असाच… वर्षातून दोन वेळा त्याच पॉईंटला सूर्योदय देखील होतो. […]

निजामपूर-कुंभा धरण परिसर …. गूढरम्य सह्याद्री

निजामपूर हे माझ्या आजोळचं मूळ गाव असल्याने आणि मी तिथे कधीही न गेल्याने मनात कित्येक वर्ष ते रुंजी घालत होतं. सकाळचे दहा वाजले असताना निजामपूरच्या अगोदर रस्त्याच्या कडेला … शांत जागी एक साधं स्वच्छ हॉटेल दिसल्याने थांबलो. तिथून मागे सह्याद्रीच्या … ढगांनी वेढलेल्या डोंगररांगांचा विशाल देखावा दिसत होता. न्याहारी झाल्यावर मी हॉटेलच्या मालकांना विचारलं की हे डोंगर कुठचे … ते म्हणाले की तिथे कुंभा धरण आहे आणि त्या पलीकडच्याबाजूला आहे लवासा. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..