Avatar
About हिमगौरी कर्वे
मी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.

जगावे अगदी बिनधास्त

जगावे अगदी बिनधास्त, निर्भय आणि निडर, कशाला पर्वा कुणाची, जगणे असावे कलंदर , असे जगावे जबरदस्त, पत्थरांशी टक्करावे, निधड्या छातीने अगदी, संकटांना दूर सारावे, मार्गी जेवढ्या अडचणी, तेवढी घ्यावी आव्हाने , तू मोठा का मी म्हणत, सरळ त्याच्याशी झुंजावे, सामना करणे अटळ मग, कशासाठी ते भ्यायचे, सिंहाचे काळीज करून, का नाही लढायाचे,—? आत्मविश्वासाने जग जिंका, भल्याभल्यांनी […]

चल सये ग झणीं

चल सये ग झणीं, मांडू या खेळ अंगणी, लहान वयातली भातुकली, धांदल बाहुलीच्या लग्नाची,–!!! लग्न करण्या त्यांचे, घालत होतो घाट, धावपळ करत सगळी, मांडायचा सर्व थाट,—-!!!! इवले इवले बाहुला बाहुली, सुंदर गोंडस खूप छोटुकली, मुंडावळ्या बांधून त्यांना, उभे सगे घेऊनी हाती,–!!! सासर माहेर सगळे मिळुनी, अंगण जायचे गजबजुनी, ठुमकत येई वरमाई, नाकात झोकात नथ घालुनी,–!!! देण्याघेण्यावरून […]

तेजोनिधीच्या आगमनाने

तेजोनिधीच्या आगमनाने, निळ्या आभाळां सोनझळाळी, जलद अवतरती सोनेरी किती,—- डोकावती विस्तीर्ण जलाशयी,— आपुला रंग लेऊनी पाणी,—– कसे खळाळते समुद्री,खाली, अस्तित्व” अमुचे दाखवतो त्यांना, प्रतिबिंबित होऊनी समुद्रकिनारी,– निळा जलाशय तो हसे गाली, कुठून आली माझ्यावर “निळाई”, वर्षा ऋतूत जेव्हा ‘बरसला’ तुम्ही, तुमच्यातील पाणीच आले खाली, निळे–शाssर रंगले माझे पाणी, किनार्‍यावर लोक हिंडून बघती, जलभरले’ “मेघ” कुठे असती,– उत्सुकताही […]

1 28 29 30