नवीन लेखन...
बी. बी. देसाई
About बी. बी. देसाई
लेखन : पुनर्वसन कादंबरी, ‘मला भावलेला कॅनडा’ प्रवास वर्णन प्रकाशनाच्या वाटेवर, दैनिक "सकाळ' व "बेळगाव वार्ता'मधून विविध विषयांवर 20 वर्षे लेखन, ज्वाला, जिव्हाळा, अमरदीप दिवाळी अंकातून कथा, लेख व कविता प्रसिद्ध, अमरदीप दिवाळी अंकाचे सात वर्षे संपादक म्हणून कार्य हव्यास : लेखन, वाचन, विविध विषयांवर व्याख्याने, सामाजिक कार्यात सहभाग
Contact: Facebook

मनं खुलविणारी माणसं

विदेशी नि त्यातल्यात्यात पाश्चिमात्य संस्कृतीबद्दल माझ्या मनात गैरसमजाचं काहूर माजलं होतं. पारतंत्र्याच्या काळात भारतीयांवर इंग्रजानी केलेल्या अन्याय, अत्याचारांमुळे त्यांच्याविषयी मनात घृणाच अधिक होती. परंतु सगळेच गोरे तसे नसतात याची अनुभूती कॅनडातील गोऱ्या लोकांच्या बाबतीत मला आली. अनेक चांगल्या, अनुकरणीय गोष्टी इथे पहायला मिळाल्या नि शिकता आल्या. त्यांची आगळी संस्कृती अनुभवता आली. […]

कॅनडा व्हाया लंडन

विदेशदौरा नि तोही विमानातून ……! विचारच न केलेला बरा. सगळे कल्पने पलिकडचे, स्वप्नवत वाटावे असेच ! शेजारच्या शहरात जायचे म्हटले तरी दहा वेळा विचार करावा लागायचा. खर्चाचा कधी ताळमेळ बसायचाच नाही. जग आज प्रगत झालंय, माणूस चंद्रावर जाऊन पोहोचलाय. मंगळ, शुक्राचा तो वेध घेतोय …….. तिथे विमानातून विदेशदौरा, ही तशी आज सामान्य गोष्टच ! त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारणही नव्हते. पण आम्हा सामान्य माणसांच्या दृष्टीने ही गोष्ट तशी मोठीच ! […]

नायगारा … निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार !

भारतातील सर्वच प्रमुख नद्यांच्यामागे एखादी लोककथा (दंतकथा) दडलेली आहे. अशीच लोककथा नायगारा धबधब्याच्या बाबतीत असेल का याचा मी विचार करीत होतो. अमेरिका, कॅनडा ही प्रगत राष्ट्रे ! विज्ञान क्षेत्रात त्यांची प्रगती उल्लेखनिय ! त्यामुळे अशा निराधार दंत कथांवर त्यांचा विश्वास नसावा, अशीच माझी भावना! त्यामुळे नदी किंवा धबधब्याबाबत अशी एखादी लोककथा प्रचलित असेल असे मला वाटले नाही. परंतु बोटीत बसून धबधब्याजवळ जाताना कुणीतरी ‘मेड ऑफ दी मिस्ट’ असा शब्दोच्चार  केल्याचे मी ऐकले. ही ‘मेड ऑफ दी मिस्ट’ काय भानगड आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली; अधिक चौकशीअंती ती एक लोककथा असल्याचे समजले. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..