नवीन लेखन...
चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

धक्का तंत्रा शिवाय हा देश सुधारणार नाही

डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय हा भारतातील बहुतेकांसाठी धक्कादायक ठरला. अतिरेकी कारवाया करणारे आणि अमेरिकेसाठी धोकादायक असलेल्या लोकांना नक्कीच जरब बसणार आहे. मोदी यांचे सरकार सर्व निर्णय देशाच्या उन्नती साठीच घेत आहेत यावर सध्यातरी ठाम विश्वास ठेवून जनता आहे. पंतप्रधानांचा हेतू प्रामाणिक आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे.फक्त त्यांना चांगल्या लोकांची साथ मिळाली पाहिजे. पुढील सर्व धक्के सुखद असतील असे मला वाटते. धक्का तंत्रा शिवाय हा देश सुधारणार नाही. […]

जातीची दांडगाई आणि ज्ञानेश्वरांची मराठी

ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात सहाव्या अध्यायात माउलींनी मराठी भाषेची महती सांगताना ” माझ्या मराठाचिया बोलू कौतुके “अशी सुरवात करून ओव्या रचल्या .ज्ञानेश्वरांनी जाणीव पूर्वक मराठीचिया या शब्दा ऐवजी मराठाचिया हा शब्द प्रयोग केला होता . या मधे मराठी बोली बोलणारा तो मराठा हा हेतू असावा .परंतु आज मराठी भाषाच जणू जातीभेदांनी झाकोळून गेली आहे. […]

नितीन गडकरी आणि Route 66

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न असलेला मुंबई –पुणे एक्सप्रेस वे तयार झाला आणि नितीन गडकरी या माणसाकडे लक्ष गेले. आजही त्यांच्या शिरावर संपूर्ण देशाचे रस्ते बांधण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकली ती त्यांचे मुंबई–पुणे या रस्त्याचे काम पाहूनच.महाड -पोलादपूरचा ब्रिटिश कालीन पूल कोसळल्या नंतर जी विधान सभेत चर्चा झाली त्याचे वृत्त अनेक वृत्त वाहिन्या दाखवत होत्या . सरकार मधील कुणीही ” हो या अनर्थाची जबाबदारी आमची आहे” असे स्पष्ट पणे म्हणत नव्हते. पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे उद्गार ऐकले आणि जरा बरे वाटले. […]

एक वॉर्ड एक गणपती

१७ ऑगस्ट २००८ साली माझा हा लेख लोकसत्ता मध्ये आला होता. हायकोर्टाच्या ताज्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मी हा लेख मराठीसृष्टीवर टाकत आहे. गणेशोत्सवा चे स्वरूप हे उत्सव साज-या करणा-या कार्यकर्त्यांच्या गुणांवर अवलंबून असते .लोकमान्य टिळकांनी राजकारणाबरोबर समाजाला एकत्र आणण्यासाठी जे प्रयत्न केले ,त्यातूनच शिवजयंती ,गणेशोत्सव या सारखे उत्सव करण्याची परंपरा महाराष्ट्रात उदयास आली.राजकारण आणि धर्म या एकाच […]

श्री रामरक्षा

पूर्वी प्रत्येक घरातून श्री रामरक्षा संध्याकाळी म्हंटली जायची . कधी कधी वडीलधारी मंडळी सोप्यावर संध्याकाळी फे-या मारत आणि रामरक्षा मोठ्या आवाजात म्हणत. ती ऐकत असताना लहान मुलांची आपोआप पाठ होत असे. संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र म्हणणे हे हिंदू घर असल्याची एक खूण होती.घराचा सुसंस्कृतपणा या स्तोत्रावरून ओळखला जायचा.संध्याकाळी तुळशी वृंदावना जवळ दिवा लावणे.घरात देवाजवळ दिवा लावणे . […]

परीकथेतील सुंदर गाव

Standardization is the process of developing and implementing technical standards. ग्रामीण भागाचे सर्व प्रथम standardization झाले पाहिजे होते. लाखो कोटी रुपये खर्च करूनही आम्ही जगाला आमचे एकही खेडे दाखवण्या योग्य करू शकत नाही हे सत्य नाकारू शकत नाही. घरांची रचना, त्यांच्या समोरील आंगणे, (खरेतर घरासमोरील बाग म्हणायचे होते ) त्यांची पाणी पुरवठा योजना, त्यांची मलनिस्सारण योजना […]

शिवराय आणि बाजीरावाचा महाराष्ट्र

दादरा, नगर हवेली, वापी या भागात मी फिरलो आहे. चर्चगेट पासून ते वापी पर्यंत महाराष्ट्र गिळला गेला आहे. उंबरगाव महाराष्ट्रात सामील करण्याचा लढा संपला…. इतिहास जमा झाला. बेळगाव, कारवार, निपाणीचे लोक महाराष्ट्रात येण्यासाठी महाराष्ट्राच्या दरवाजावर अनेक वर्षे टक्कर देत आहेत. त्यांचा कपाळमोक्ष झाला. कानडी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खावून त्यांची हाडे पीचली आहेत पण अजूनही ते लढत […]

अमेरिकेतील सुखान्त

कर्करोगाने ग्रासलेल्या आणि अत्यवस्थ झालेल्या माझ्या जवळच्या नातलगाची शेवटची भेट व्हावी म्हणून पत्नीसमवेत मी मध्यंतरी तातडीने अमेरिकेला गेलो. न्यूयॉर्क येथे पोहोचल्यावर आंघोळ वगैरे उरकून ‘हॉस्पिस’(हॉस्पिटल नव्हे) गाठले. ज्या रुग्णांना कुठल्याही औषधोपचारांनी बरे करणे शक्य नसते आणि रुग्णाचा अंत:काळ जवळ आलेला असतो अशांना ‘हॉस्पिस’मध्ये ठेवतात. त्या ठिकाणी कुठलाही रोग बरा करणारा औषधोपचार होत नाही, परंतु अटळ असणारा […]

विजय मल्ल्या शेवटी पळालाच …!!!

कोण याती वशं लोके मुखे पिंडेन पूजिता मृदंगो मुखलेपेन करोति मधुरं ध्वनी ……… या श्लोकाचा अर्थ असा कि- तोंडात ( भाताचा ) गोळा भरवल्यावर कोण वश होत नाही ? मृदुंगाच्या तोंडावर जेव्हा कणिक थापतात तेव्हा तो सुद्धा मधुर ध्वनी करू लागतो …..! विजय मल्ल्या शेवटी सर्वांना चुना लावून पळालाच. त्याला म्हणे भारतात परत आणण्यासाठी सरकार पयत्न […]

समर्थ रामदास स्वामी – भाग १०

सत्व गुणाला मनुष्य देहातला अत्यंत उत्तम गुण म्हणून समर्थांनी वर्णिले आहे. समाजाचे व्यवहार अविरथ चालले आहेत याचे मूळ कारण समाजात सत्व गुणी माणसे आहेत.प्रतेक माणसात सत्व ,रज आणि तमो गुण असतात. परंतु ज्यात सत्व गुणाचे प्राबल्य असते तो माणूस समाजासाठी मोठा आधार असतो.वैयक्तिक स्वार्था पेक्षा परोपकार ,सेवाभाव , करुणा ,प्रेम,समाधान ,निस्पृह व्यवहार ज्याच्या ठाई असतात तो […]

1 2 3 4 5 6 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..