नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

इतरांतील लाचारी बघे

शक्तीच्या जोरावरती,  बघतो इतरांत लाचारी विसरून जातो वेड्या,  स्वत:तील न्यूनता खरी ….।।धृ।।   पैसे ओढती खोऱ्यानें,  परि शरीर भरले रोगानें श्रीमंतीत वाढली कांहीं,  गरिबाची लाचारी पाही विसरून देह दुर्बलता,  धनाचा अहंकार धरी…१ शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी   शरीर संपदा मिळे,  परि अडते पैशामुळे देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार विवंचना ती पैशाची,  विसरे शरिर सौख्यापरि….२ […]

भिकाऱ्याचे पुण्य

रखरखत्या उन्हांत बसूनी,  भीक मागतो एक भिकारी जगदंबेचे नाम घेवूनी, भजन देवीचे सदैव करी…१, नजीक येत्या वाटसरूंना,  आशिर्वाद तो देत असे ‘प्रभू तुमचे भले करिल’   हेच शब्द ते उमटत असे…२, अन्न न घेता दिवस जाई,  खात भाकरी एकच वेळां दिवसभरीचे श्रम होवूनी,  उपवास तो सदैव घडला…३, पूर्व जन्मीच्या कर्मफळाने,  दीनवाणी ते जीवन मिळाले आज पुण्याच्या राशि […]

सद्‌गुरु

भटकत जातो वाटसरू , जंगलामधील अज्ञात स्थळी, आंस लागते जाण्याकरिता, दूरवरच्या दिव्या जवळी ।।१।।   मार्ग जाण्याचे अज्ञात असूनी, निराशेने वेळ दवडितो, ध्येय दिसत असून देखील, मार्गामुळे अडून पडतो ।।२।।   अज्ञानाच्या अंधारात , शोधत असतो असेच त्याला मार्गदर्शन सद्‌गुरुचे, न लाभता ध्येय मिळे कुणाला ।।३।।   वाट दाखवी सद्‌गुरु , प्रभूचरणी जाण्याचा, दुवा साधतो आमच्यामध्ये, […]

अन्नासाठी दाही दिशा

कोपऱ्यात गुळाचा खडा ठेवा, थोड्याच वेळांत अनेक मुंगळे वेगवेगळ्या दिशेने त्या गुळाच्या खड्याभोवती जमतात. मधाचा एक थेंब वेगळाच गंध पसरवितो. ज्यामुळे अनेक माश्या उडत त्याच्या जवळ जमा होतात. कोठेतरी पडलेल्या मृत प्राण्या भवती असंख्य किडे आळ्या अशाच पद्धतीने जमा होतात. ते त्यांचे भक्ष असते. […]

विरोघांत मुक्ति

भक्ति करुन प्रभूसी मिळवी, दिसले आम्हा ह्या जगती परि त्याचाच विरोध करुनी, कांही पावन होऊन जाती   लंकाधिपती रावण याने, रोष घेतला श्रीरामाचा जानकीस पळवून नेई,  विरोध करण्यास प्रभुचा   झाली इसतां आकाशवाणी,  कंसास सांगून मृत्यु त्याचा तुटून पडता देवकीवरी,  नाश करण्या त्याच प्रभुचा   प्रभी अवताराचे ज्ञान होते,  परि विरोध करीत राही होऊन गेले तेच […]

वचन

वाणी मधूनी शब्द निघाला,  कदर त्याची करीत होते  । मुखावाटे बाहेर पडे जे,  वचन त्याला समजत होते  ।। दिले वचन पालन करण्या,  सर्वस्व पणाला लावीत होते  । प्राणाची लावून बाजी,  किंमत शब्दांची करीत होते  ।। स्वप्नामध्ये दिले वचन,  हरिश्चंद्र ते पालन करी  । राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी  ।। प्राण आहूती देई दशरथ, वनी […]

परमार्थ व संसार आहेत एकच

उपास तापास करुनी,   शिणवित होतो देहाला भजन पूजन करुनी,   पूजीत होतो देवाला कथा किर्तनें ऐकूनी,   पुराण मी जाणिले माळ जप जपूनी,   प्रभू नामस्मरण केले वेचूनी सुमनें सुंदर,   वाही प्रभूचे चरणीं फुलांचे गुंफूनी हार,   अर्पण केले कंठमणीं जाऊनी तीर्थ यात्रेत,   दर्शन घेतले तीर्थांचे प्रसिद्ध देवालयांत,   चरण स्पर्षिले मूर्तीचे मनामध्यें ठेऊन शांती,   मूल्यमापन केले जीवनाचे कांहीं न मिळाले […]

कर्तृत्वाचे कल्पतरू

जीवन गंगा वहाते , फुलवित सारी जीवने  । पडेल प्रवाहीं कुणी, लागते त्याला वाहणे  ।।१।।   काही काळ वाहतो देह, डुबून जाणे अंतीम, कसा वाहतो केंव्हा डुबतो, प्रवाही वेगाचे हे काम   ।।२।।   बुडूनी जाती देह प्रवाही, कर्मे आतील तरंगती । वाहत वाहत नदी किनारी, स्थीर होऊन काठी राहती  ।।३।।   देह क्षणाचा जरी, कर्मे राहती […]

दयेची बरसात

समर्थ नाहीं कुणी,  जाणून घेण्या प्रभूला थोटके पडतो सारे,  घेण्यास त्याच्या दयेला बरसत असे दया,  प्रचंड त्या वेगाने दुर्दैवी असूनी आम्हीं,  झेलतो फाटक्या झोळीने असीम होते कृपा,  पात्र नसूनी कुणी तो बरसत राही सतत,  परि आहे सारे अज्ञानी दयेच्या तो प्रवाह,  वाहात राही नदीसारखा डूबती कांहीं त्यांत,  परि न दिसे अनेकां नशीब लागते थोर,  पेलण्यास दया ती […]

देह बंधन – मुक्ती

बंधन मुक्तीसाठीं असतां,  बंधनात ते पाडून टाकी कर्मफळाचे एक अंग ते,  टिपतां राही दुसरे बाकी…१, साध्य करण्या जीवन ध्येय,  देह लागतो साधन म्हणूनी सद्उपयोग करूनी घेतां,  साध्य होईल हे घ्या जाणूनी…२, हिशोब तुमचा चुकून जाता,  तोच देह बनतो मारक विनाश करितो मागें लागतां, मिळविण्यास ते ऐहिक सुख….३, बंधन पडते आत्म्याभोंवती,  शरिरांतल्या वासने पायी वासनेच्या आहारी जातां, […]

1 10 11 12 13 14 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..