स्वच्छतेसाठी साबणाची गरज
पुष्कळ वेळा पुरेसे पाणी वापरूनही कपड़े स्वच्छ होत नाहीत. आपण त्या वेळी साबणाचा उपयोग करतो. कपडे स्वच्छ करण्यामध्ये साबण नेमकं काय करतो? आपल्या शरीरातून व केसांमधून घामाबरोबर तेलकटपणा किंवा स्निग्धांश बाहेर पडतो. शिवाय आपण तेल, व्हॅसलिन वापरतो. आपल्या खाण्यामध्ये लोणी, तूप, तेल हे पदार्थ असतातच. […]
