नवीन लेखन...

नागली

नागली म्हणजेच नाचणी. नागली अथवा नाचणी हे भारतात अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. भारतात सर्व भाषेत नागली अथवा नाचणी असेच म्हणतात. इंग्रजीमध्ये याला रागी अथवा मिलेट असे म्हणतात. नाचणी हे सर्व भारतातच नाही तर सर्व जगभर मिळते. थोडक्यात हे गरिबांचे अन्न म्हणून वापरतात. भारतातील शेतकरी व लोक नाचणीची भाकरी करतात.

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी सकाळी लवकर उठून, आपल्या बैलांना जोडून नांगरणी करतो. दुपारी भर उन्हात कारभारीण डोक्यावर कापडात गुंडाळून नाचणीची भाकरी घेऊन येते. आपल्या कारभाऱ्याबरोबर जेवते. दोघे घरच्या गप्पा गोष्टी करतात. भाकरीबरोबर हिरवी चटणी व कांदा असतोच. भाकरीचे जेवण झाल्यावर काम करून सूर्य उतरणीला लागल्यावर घरधनी घरी येतो. एवढे प्रचंड काम हा शेतकरी कसा करतो. याला एवढी शक्ती येते कुठून? सर्वांनाच हा प्रश्न पडतो. ही नाचणी उपयोगी पडते.

पाश्चिमात्य लोकांनी रागीचे बरेच संशोधन केले. या नाचणीत काय नाही? अत्यंत पौष्टिक तसेच प्रचंड शक्ती (एनर्जी) असलेले हे धान्य आहे. विशेषतः चुना (कॅल्शियम) लहू तसेच प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. तसेच याबरोबर खनिज द्रव्येदेखील विपूल प्रमाणात असतात.

१०० ग्रॅम रागीमध्ये गुणधर्म आढळतात.

यातील कार्बोहायड्रेट जवळजवळ ८० टक्केपर्यंत असते. तसेच प्रथिने व खनिज पदार्थही जवळजवळ १०० टक्के असते. शेतकऱ्याची शक्ती जवळजवळ ३३६ किलो कॅलरीज असतात. म्हणजे हा शेतकरी सतत काम करून थकत नाही व सदैव उद्योगी असतो. यात कॅल्शियम हा एक महत्त्वाचा घटक आहे. ३५० मिलीग्रॅम इतके कॅल्शियम यात आहे. एवढे कॅल्शियम असलेले धान्य क्वचितच मिळते.

 

प्रथिनांचा शोध डॉ. फ्रेडीक रॉबिन आणि त्यांचे सहकारी यांनी लावला. प्रथिनांमध्ये अमायनो ॲसिड याचा शोध लावला. त्यांनी बऱ्याच प्रकारचे अमायनो ॲसिड शोधून काढले. जे शरीरातच तयार होतात त्याला नॉनइसेंशियल अमायनो ॲसिड म्हणतात. या शास्त्रज्ञांनी असाही शोध लावला की, काही प्रथिने (अमायनो ॲसिड) बाहेरून घ्यावी लागतात व बाहेरून न घेतल्यास शरीरात कमतरता निर्माण होते. ह्याला इसेंशियल अमायनो ॲसिड म्हणतात. ती दहा प्रकारची आहेत. आणि नाचणीमध्ये सर्व अमायनो ॲसिड तयार होतात ज्याची यादी खालीलप्रमाणे

सर्व प्रथिनांचा प्रमुख उद्देश म्हणजे स्नायू बळकट करणे. शास्त्रज्ञांनी संशोधनानंतर गहू, तांदुळ, नाचणी, मका यांचा एक तक्ता बनविला तो याप्रमाणे.-

१०० ग्रॅम वजनात

याचा अर्थ नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर असते. तसेच लोहही भरपूर प्रमाणात असते. भाकरी व्यतिरिक्त नाचणी कशाप्रकारे खाता येते, याचेही संशोधन झाले आहे. भारतातही अनेक प्रकारचे नाचणीचे खाद्यपदार्थ आहेत.

नाचणीचा डोसा, अथवा एक भाग चणाडाळ, १ भाग मूगडाळ, १ भाग उडीद डाळ, १ भाग नाचणी- थोडा वेळ भिजवून. रडग्यावर किंवा मिक्सरने वाटणे. एकत्र भिजवून रात्रभर आंबून देणे व त्याचे डोसे अथवा तिखटमीठ घालून थिरडे बनविणे, हे देखील शक्य आहे. मीठ-साखर घालून ठुली बनविण्याचा प्रकार असतो. पाश्चिमात्य देशात नाचणीचे केकही बनवतात. थोडक्यात नाचणीचा वापर कशातही करावा व मुले व इतरांना खायला द्यावा. नाचणी खाल्ल्याने कॅन्सर रुग्णाचे जीवन बऱ्यापैकी सुधारते. या बाबतीत अमेरिकेने या कामाकडे भरपूर लक्ष आहे आणि कदाचित बऱ्यापैकी सुधारेल, असा त्यांचा विश्वास आहे.

– मदन देशपांडे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..