नवीन लेखन...

व्हॉटसअप, फेसबूक आणि गोठलेली संवेदना

परवा परवाच माझा  वाढदिवस साजरा करण्यात आला पण पूर्वीसारखी वाढदिवसाला काही मजा वाटली नाही. अनेक मित्रांना निमंत्रण देवूनही, प्रत्यक्ष भेटणे शक्य असूनही अनेक मित्रांनी व्हॉटसअपच्या माध्यमातूनच शुभेच्छ्या देणे पसंद केले. त्यामुळे लहानपणी एकत्र खेळलेली – बागडलेली पाखरे कुठेतरी हरवल्यासारखी वाटली.

अगदी माझा जवळचा मित्र सुरज याने तर आई आजारी असल्याचे कारण सांगितले पण प्रत्यक्ष त्यादिवशी तो दिवसभर मला ऑनलाईन दिसत होता. आईजवळ चौकशी केली असता आईने ठनठनीत असल्याचे सांगितले. असे का…? नाती इतकी विरळ होत आहेत का…? व्हॉटसअप, फेसबुक सर्व नात्यांपेक्षा श्रेष्ठ आहे का…?

आणखीन एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो, माझा मित्र राहुलच्या वडीलांचे दोन दिवसापूर्वीच निधन झाले. मित्राला दिवसभर वडिलांच्या श्रद्धांजलीचे मेसेज येत होते पण प्रत्यक्ष येवून मात्र कुणालाही भेटावेसे वाटले नाही.

एक मेसेज तर असा होता कि, तो वाचून मनाला शांती मिळण्या  ऐवजी वेदना झाल्या. मित्रा बातमी ऐकून खूप वाईट वाटले पण माझा ना इलाज आहे. मी बाहेरगावी असल्यामुळे तुला भेटायला येवू शकत नाही. तुझ्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली. मित्राच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर मित्राचे सांत्वन करायला जेवढे लोक नव्हते तेवढे भावपूर्ण श्रद्धांजलीचा ब्यानर लावायला हजर होते. नात्यांची वीन कशी कुमकुवत होत चालली आहे. याचे हे ज्वलंत उदाहरण होते. या सर्व वेदना फक्त राहूलच समजू शकतो.

आमच्या ऑफिसातल्या कमलाकर बाई यांना आम्ही व्हॉटसअपबाई म्हणून चिडवतो. नेहमी व्हॉटसअप आणि फेसबूकवर असणाऱ्या या बाईना कुणाच्याही सुख:दु:खाशी काहीही देण-घेण नाही. ऑफिसातही नेहमी शो-बाजी करणाऱ्या बाई असेच सगळे त्यांना संबोधतात. प्रत्यक्ष काम काहीच नाही पण केलेले काम पुढ – पुढ होऊन सांगायला एक नंबर असतो त्यांचा. जरा कामाचा ताण पडला रे पडला कि, लगेच दुसऱ्या दिवशी आजारी असल्याचा साहेबांना फोन आला रे आलाच म्हणून समजा. बाईंची कामावर दांडी !

आजकाल साहेब बाईंवर भलतेच चिडून आहेत. याचे कारणही तसेच आहे. एक महिन्यापूर्वी साहेबांच्या सासुबाईंचा देहांत झाला. स्टाफ मधील सर्व कर्मचारी साहेबांचे सांत्वन करायला हजर होते. पण कमलाकर बाईंनी चक्क व्हॉटसअप आणि फेसबूक वरून साहेबांच्या सासूबाईना श्रद्धांजली वाहिली. सांत्वनाला न येण्याचे कारणही कमलाकरबाईंनी अजबच सांगितले. ते कारण म्हणजे, कमलाकरबाईंना भूत आणि प्रेताची भीती वाटते म्हणून त्या साहेबांच्या सांत्वनाला हजर राहू शकल्या नाहीत.

जागतिक वृक्षारोपण दिनानिमित्त वृक्षारोपण  आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. साडीला घाण लागू नये म्हणून कसे बसे साडी सावरत कमलाकर बाईंनी झाडे लावण्याचा आणि झाडू हातात घेवून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. वर्तमान पत्रामध्ये फोटो येण्यासाठी वृत्तपत्र वाल्यांना बाईंनी पायघड्या घालून फोटो येण्यासाठी आटापिटा  केला, आणि चक्क बाईंचा स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाचा फोटो दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाला होता. बाई दिवसभर ऑफिसातील लोकांना फोटो दाखवून स्वताचे कौतुक करून घेत होत्या.

सांगण्याचा उद्देश हाच की, माणूस किती असंवेदनशील बनत चाललेला आहे. स्व:तावर फुलं उधळून घेण्याची आणि खोटा मोठेपणा मिरविण्याची लोकांची सवय वाढत चालली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या आपण इतके आहारी गेलो आहे की, आपल्यालातील एकमेकांप्रती असलेला जिव्हाळा, प्रेम,माया, ममता आणि आपुलकीची भावना नष्ट होत चालली आहे. आपण तंत्रज्ञानाच्या युगात इतके व्यवहारी होत चाललो आहोत की, आपल्याला रक्ताची नातीही कळेनाशी झालेली आहेत. कुणीही जगल्या – मेल्याचं सोयर- सुतक कुणालाही राहील नाही.

— परशुराम चंद्रकांत माळी 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..