नवीन लेखन...

दसरा, कोजागिरी आणि आपले स्वास्थ्य

दसरा आणि कोजागिरी पौर्णिमा हे अश्विन महिन्यातील महत्वाचे दिवस. आयुर्वेदाच्या दृष्टीनेही हे दिवस किंवा सण तसेच महत्वाचे आहेत कारण त्यांचा आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्वाचा संबंध आहे.

भाद्रपद महिन्यात गणपतीची धावपळ आटोपते आणि मध्ये १५ दिवस गेले की नवरात्र सुरु होतं .हा बदल होताना वातावरणही बदलत असतं ,पाऊस कमी होऊन हळूहळू परतीचा रस्ता धरतो आणि पिवळेधमक ऊन पडायला सुरुवात होते ,वातावरणात उष्णता जाणवू लागते ज्याला आजच्या आधुनिक भाषेत ” ऑक्टोबर हिट” असे म्हणतो.दुपारच्या वेळात चांगलाच उन्हाचा तडाखा वाटायला लागतो .

हे बदल आपल्या शरीरातही काही मोठे बदल घडवून आणतात.पावसाळ्यात पाऊस पडू लागला की नवीन पाणी पचायला तर जड असतेच पण अम्लविपाकी असते म्हणजे शरीरात आंबटपणा वाढवणारे असते ,तसेच दमट ,थंड अशा पावसाळी हवेचा परिणाम म्हणून शरीरात पित्त दोष वाढू व साठू लागतो .पुढे पाऊस थांबून ऊन पडले की ह्या साठलेल्या पित्ताचा प्रकोप होतो म्हणजेच उद्रेक होतो आणि काही विशेष लक्षणे दिसू लागतात .

छातीत जळजळ होणे ,घशात आंबट पाणी येणे,मळमळ होणे ,उलटी होणे ,डोके दुखणे ,अंगावर पित्ताच्या गाठी उठणे ,नाकातून रक्त येणे ,नागीण,डोळे तसेच तळहात ,तळपाय यांची आग होणे ,उष्ण मूत्रप्रवृत्ती होणे ,अंगावर कुठेतरी बेंड उठणे असे अनेक उष्णतेशी निगडीत व्याधी अचानक डोके वर काढतात .
आयुर्वेद हे शास्त्र केवळ आजार बरे करणारे शास्त्र नाही तर आजार होऊच नयेत म्हणूनही ते फार महत्वाचे काम करते ज्याला आजच्या भाषेत ” Preventive Aspect ” म्हटले जाते.हे बदल नैसर्गिकपणे घडणारच आहेत पण त्यामुळे आपले स्वास्थ्य बिघडू नये म्हणून या दिवसात काय खावे ,प्यावे ,काय पथ्य पाळावे ,कोणती शरीरशुद्धी करावी की जेणेकरून आपले आरोग्य अबाधित राहील या विषयी आयुर्वेद मार्गदर्शन करतो.

वाढलेले पित्त शरीराबाहेर काढून टाकावे म्हणजे व्याधी निर्माणच होणार नाहीत,ह्या साठी या दिवसात म्हणजेच “शरद” ऋतूत विरेचन ही पित्ताची शुद्धि करणारी ,जुलाबावाटे दोष शरीराबाहेर काढून टाकणारी पंचकर्मातील क्रिया करून घ्यावी.

त्याचप्रमाणे रक्तातील दोष ,उष्णता निघून जावी आणि नवीन रक्त तयार व्हावे या दृष्टीने ” रक्तमोक्षण ” ही शुद्धीक्रियाही वैद्यांच्या सल्ल्याने जरुर करून घ्यावी.यामध्ये ठराविक प्रमाणात रक्त शिरेवाटे बाहेर काढून टाकले जाते.

खाण्यात पित्तशामक पदार्थांचा वापर करावा ,गोड किंवा मधुर रसाचे पदार्थ अधिक असावे .त्यामुळे दूध ,तूप यांचा वापर नियमित करावा.त्यासाठीच दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे श्रीखंड ,बासुंदी असे पक्वान्न करायची पद्धत आहे जी अतिशय शास्त्रीय आहे.याच हेतूने कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या शीतल प्रकाशात आटीव दूध थंड करून पिण्याची पद्धत आहे.या पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचा आपण आदर करायला हवा कारण त्यात शास्त्रीयता लपलेली आहे .उगीचच fad म्हणून एखादी गोष्ट मुद्दाम बदलायचा प्रयत्न करू नये कारण त्यात आपलेच नुकसान आहे .हल्ली कोजागिरीला भेळ आणि दूध किंवा पावभाजी आणि दूध असे काहीतरी चमत्कारिक combination खायची पद्धत रूढ झाली आहे जे विरुद्धान्न आहे.भेळ बनवताना आपण चिंच ,tomato अश्या आंबट पदार्थांचा वापर करतो आणि पावभाजी बनवताना त्यात भरपूर tomato ,लिंबू वापरतो,या नंतर गोड दूध पिण्याने ते सगळेच अम्लगुणाचे होते ,जणू नासतेच आणि मग जळजळ होऊ लागते .त्यामुळे या वर्षी आपल्याकडून अशी काही चूक होणार नाही याची आपण नक्की दक्षता घेऊया.

फळे खाताना डाळिंब नक्की असूद्या .पुढे लक्ष्मीपूजनालाही याच हेतूने सगळ्या पित्तशामक वस्तूंचा वापर सांगितला आहे .साळीच्या लाह्या,डाळिंब आणि बत्तासे !! त्या सगळ्या गोष्टीचा नक्की वापर करूया आणि आपणच आपले स्वास्थ्य रक्षण करूया .

— वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D. (आयुर्वेद)

— `आरोग्यदूत’ WhatsApp ग्रुपवरुन 

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 116 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..