नवीन लेखन...

न्यूट्रीशनचे ज्ञान खेळाची गुणवत्ता सुधारू शकेल का ?

Does Nutrition Knowledge Translate into Sports Practice

स्पोर्ट्स परफॉर्मन्स मध्ये न्यूट्रीशन महत्वपूर्ण भूमिका बजावते. न्यूट्रीशन ह्या विषयीचे ज्ञान आणि त्यांचा खेळातील परफॉर्मन्स ह्याचा काही संबंध आहे का ह्या विषयी मात्र खेळाडूंमधे स्पष्टता नव्हती असे निदर्शनास आले. न्यूट्रीशन ह्या विषयीचे ज्ञान जितके चांगले तितका त्यांचा न्यूट्रीशन चॉईस चांगला असू शकतो असे ही आढळले आहे. चांगल्या न्यूट्रीशन चॉईस चा फायदा त्यांना त्यांचा फिजीकल फिटनेस मधील विविध घटक जसे की बॉडी कंपोझिशन, अॅनरोबीक पॉवर, एनड्यूरन्स सुधारण्यासाठी मदत करू शकतात. खेळात ट्रेनिंग सुधारण्यासाठी, तसेच खेळाडूंचा परफॉर्मन्स उच्चतम होण्यासाठी योग्य प्रमाणात योग्य अन्नघटकांचे सेवन करणे महत्व पूर्ण ठरते. खेळाडूंना न्यूट्रीशन विषयी कितपत माहिती आहे हे तपासण्यासाठी वेगवेगळी मॉड्यूल वापरली जातात.

खेळातील परफॉर्मन्स चांगला होण्यासाठी काही महत्वपूर्ण घटकांचे ज्ञान असणे लाभदायक ठरेल
—  हायड्रेशन आणि डीहायड्रोशन स्टेटस
—  स्पोर्ट्स ड्रिंक – योग्य ड्रिंक कोणते, ते केव्हा घ्यावे, किती घ्यावे
—  एनर्जी साठी कार्बोहायड्रेट आणि फॅटचे किती सेवन करावे
—  कार्बोहायड्रेट कधी घ्यावे आणि फॅटचे सेवन कधी करावे
—  फळ आणि भाज्यांचे सेवन
—  डाएटरी फायबर (तंतुमय पदार्थ) किती आणि कधी घ्यायला हवे
—  प्रथिनांचे सेवन किती प्रमाणात करावे
—  परफॉर्मन्स सुधारण्यासाठी जीवनसत्व व खनिज (vitamins and minerals) ह्यांचे सप्लीमेंट गरजेचे आहे का
—  न्यूट्रीयंट टायमिंग महत्वाचे आहे का ?

न्यूट्रीशन विषयीचे ज्ञान, खाण्याच्या सवयी आणि खेळ ह्या संदर्भातील काही अध्यापने
सेमी-प्रोफेशनल सॉकर खेळाडू मध्ये न्यूट्रीशन चे ज्ञान आणि त्यांचा फिजीकल फिटनेस किती आहे हे तपासण्यासाठी एक अध्ययन केले होते. न्यूट्रीशन चे ज्ञान किती आहे हे तपासण्यासाठी त्या संदर्भातील 11 मुद्दे असलेली एक प्रश्नावली तयार केली. ह्या संदर्भातील सर्व खेळाडूंची माहिती जेव्हा गोळा केली तेव्हा मात्र हे खेळाडू कार्बोहायड्रेट चे सेवन कमी करताना आढळले. अशाच प्रकारच्या दुसर्‍या एका प्रयोगात किशोरवयीन सॉकर खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. त्या ही खेळाडूंमधे एनर्जी चे सेवन आवश्यकतेपेक्षा कमी होते, आहारात समतोल नव्हता, तसेच हे खेळाडू तळकट पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात करतात असे निदर्शनास आले. ह्या दोन ही अध्यापनावरून न्यूट्रीशन चे सेवन उच्चतम पातळीवर घेऊन जाण्याची गरज आहे असे दिसते. हा पूर्ण शोध प्रबंध Scientfica volume 20 14 article ID 180353 मध्ये प्रकाशित झाली आहे

अशाच प्रकारचे अध्यापन प्रोफेशनल English rugby खेळाडूंमधे् केले. त्यासाठी ह्या खेळाडूंचं न्यूट्रीशन विषयीचे ज्ञान आणि त्यांच्या खाण्याची सवयी eatwell plate food categories वरून तपासली. ह्यासाठी सुपर लिगच्या दरम्यान सर्व साधारण न्यूट्रीशन विषयी प्रश्नावली दिली. शोध प्रबंधासाठी निवडलेल्या 21 खेळाडूंचे वय 25+5 वर्ष, BMI 27+2.4 kg/m2, आणि खेळाचा अनुभव 6+4 वर्ष. त्यांना त्यांच्या न्यूट्रीशन ज्ञाना प्रमाणे चांगले ज्ञान व थोडे ज्ञान अशा दोन भागात विभागले. चांगले ज्ञान असलेले 11 खेळाडू होते तर थोडे ज्ञान असलेले 10 खेळाडू होते. खेळाडूंची खाण्याची पद्धत काय आहे हे जाण्यासाठी फूड (अन्न) प्रश्नावली मध्ये ते कोणते पदार्थ किती वेळेस घेत होते ह्याची माहिती घेतली.

ह्या माहीती वरून असे निदर्शनास आले की ह्या खेळाडूंना न्यूट्रीशन विषयी बरेच ज्ञान होते, पण स्टार्ची आणि फायबरस पदार्थ कधी, किती वेळ कसे घ्यावे ह्या संदर्भात मात्र माहिती नव्हती. तसेच ज्या खेळाडूंचा स्कोर जास्त होता, ते खेळाडू जास्त फळे, भाज्या तसेच कार्बोहायड्रेट जास्त असलेले पदार्थ निवडताना आढळले. हा शोध प्रबंध Journal of International Society of Sports Nutrition 2015 12 :18 ह्या नियतकालिके मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

ह्या सर्व शोध प्रबंधा वरून असेच दिसते आहे कि खेळाडूंना न्यूट्रीशन संदर्भात हस्तक्षेप कसा करावा जेणेकरून त्याचा परफॉर्मन्स सुधारेल ह्यासाठी न्यूट्रीशन चे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. सुरुवातीला कमीतकमी प्रत्येक खेळाडूला त्याच्या खेळासाठी आवश्यक असलेल्या एनर्जी चे सेवन कसे करावे, लिन मसल मास कसे सुधारावे, त्यांच्या खेळाला आवश्यक असलेले वजन कसे घटवावे किंवा वाढवावे आणि हायड्रेशन विषयी कशी काळजी घ्यावी ह्या संदर्भात प्रशिक्षण देणे मोलाचं ठरेल.

Avatar
About डॉ. शीतल म्हामुणकर 20 Articles
डॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे. डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..