पहा पटलं तर
लहान पणी शाळेत असतांना ‘ आदर्श “ या शब्दाची अनेक वेळा गाठ भेट व्हायची , शालेय मन हे संस्कार क्षम असल्यामुळे कुणाचातरी आदर्श डोळ्यासमोर ठेऊन किंबहुना त्या आदर्शाला , आजच्या सो कॉल्ड भाषेत सांगायचं झालं तर Follow करणे गरजेचे आहे , हा नुसते बोट फिरवून Follow करण्या ऐवजी कृतीतून Follow करणे गरजेचे आहे ,आणि त्यातूनच देशाची राज्याची उज्वल पिढी घडत असते . तसेच काहीसे आदर्श म्हणावे असे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर आहे ते म्हणजे श्री तुकाराम मुंडे साहेब, इतिहासात पण आपण वाचलेले आहे, आदर्श पुरुषांना सामाजिक विचारांना , समाजाच्या विरोधाशी संघर्ष करून समाजासाठीच काहीतरी चांगले घडवायचे असते आणि त्यात ते यशस्वी होतात आणि म्हणुत ते आदर्श होतात .
पण श्री तुकाराम मुंडे साहेब यांच्याबाबतीत खूप वेगळी गोष्ट आहे किंबहुना प्रथमच घडत असावी. आणि ती म्हणजे श्री तुकाराम मुंडे साहेब यांनी त्यांच्या शासकीय कामामुळे, जी शासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराच्या दलदलीत स्वइच्छेने अडकलेली आहे ती खडबडून जागी व्हावी नव्हे किंबहुना शासकीय बल वापरून त्यांचे काम बंद करावे , अशीच परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे .महत्वाचा फरक असा कि जवळपास ८० % टक्के समाज त्यांच्या कार्याचे समर्थन करणारा आहे . त्यामुळे समाजाचा प्रचंड पाठिंबा आहे , विरोध आहे तो ताकदवर असलेली शासकीय यंत्रणा !
आदर्श या साठी म्हणावेसे वाटते कि त्या ताकदवर असलेल्या शासकीय यंत्रणेलाही त्यांनी जुमानलें नाही. मला शिक्षा म्हणून माझी बदली करताय – करा ती शिक्षा मला बक्षिस दिले आहे असे समजून मी पुढची वाटचाल करिन ! केवढे मोठे धाडस . “ हे असेच चालायचे – यात आपण काही बदल घडवू शकत नाही “, अशी विचारधारा स्वीकारत असलेल्या समाजात अचानक वादळ निर्माण झालं . “ का असेच चालवायचे ?, माझे कर्तव्य ,माझे अधिकार आणि माझा प्रामाणिक पणा योग्य प्रकारे वापरला तर आपणही बदल घडवू शकतो . हा आदर्श !अर्थात त्यांच्या या कार्यामध्ये त्यांच्या कुटुंबाची साथ मिळाली नव्हे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते तशी त्यांची पत्नी उभी होती. हा आदर्श !
आज गरज आहे ती श्री तुकाराम मुंडे साहेब, यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक तरुणाने जीवनात वाटचाल करावी , भले कष्टमय जीवन झालं तरी चालेल पण लाचारकी पत्करणार नाही, हा एकच बळकट असलेला विचार बरंच काही समाजात , शासकीय यंत्रणेत चांगले बदल घडवू शकतो ! —–
—— क्षितिजा ——–
गणेश वेलणकर ———-
@ क्षितिज सोशिअल मीडिया


Leave a Reply