नवीन लेखन...

ओळख मूलांकाची – भाग ३ – मूलांक ३

अंकज्योतिष शास्त्रात प्रत्येक अंकाचं विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रानुसार (Numerology), व्यक्तीचा स्वभाव, त्याचं भविष्य तसेच, व्यक्तीच्या आवडी निवडी यांचा अंदाज लावता येतो. या ठिकाणी आपण आज मूलांक 3 (Mulank) च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मूलांक ३ चा शासक ग्रह गुरू असून हा सात्विक, शुद्ध आणि सौम्य ग्रह मानला जातो. गुरुच्या अधिपत्याखाली राहणारे लोक सौम्य असतात, नैतिक मूल्ये बाळगतात, साधे असतात, ज्ञान मिळवण्यासाठी लोभी असतात आणि धार्मिक स्वभावाचे असतात. मूलांक ३ (ज्यांचा जन्म ३, १२, २१ किंवा ३० तारखेला झाला आहे) असलेल्या व्यक्तींचा स्वामी ग्रह गुरू आहे. हे लोक स्वभावाने हुशार, स्वाभिमानी, धाडसी आणि ज्ञानप्रेमी असतात. गुरूच्या प्रभावामुळे हे लोक प्रतिभावान, शिस्तप्रिय आणि सहसा नेतृत्व गुण (Leadership qualities) असलेले असतात.

मूलांक ३ (Mulank 3) च्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:
स्वभाव: हे लोक आत्मविश्वासी, मोकळ्या मनाचे, कष्टाळू आणि प्रामाणिक असतात. त्यांना कोणाचे उपकार घेणे किंवा कोणाच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप आवडत नाही. त्यानुसार मूलांक 3 असणारे लोक फार स्वाभिमानी असतात. या लोकांना कोणाच्याही पुढे हात पसरायला आवडत नाही. तसेच, या जन्मतारखेच्या लोकांना आपल्या जीवनात कोण्या दुसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप आवडत नाही. तसेच, यांना कोणाचे उपकारही आवडत नाहीत.

करिअर: बुद्धिमत्ता आणि ज्ञानाच्या जोरावर हे लोक शिक्षण, कायदा, बँकिंग, व्यवस्थापन, अभिनय किंवा प्रशासकीय क्षेत्रात उच्च पद गाठतात. आर्थिक स्थिती: हे लोक सहसा श्रीमंत असतात आणि त्यांच्याकडे पैशाची कमतरता भासत नाही. ते स्वतःच्या मेहनतीवर प्रगती करतात.

कमतरता: काही वेळेस हे लोक अहंकारी, गर्विष्ठ किंवा हट्टी बनू शकतात. त्यांच्या हट्टीपणामुळे कधीकधी समस्या निर्माण होतात.

अभ्यासात नेहमी हुशार असतात: या जन्मतारखेचे लोक अभ्यासात फार हुशार असतात. अभ्यासात-लिखाणात हे नेहमीच पुढे असतात. तसेच, वर्गात, समाजातसुद्धा यांची ओळख हुशार व्यक्ती म्हणूनच असते. या लोकांना विज्ञान आणि साहित्य यांसारख्या विषयात फार आवड असते. हे लोक फक्त शिक्षणातच नाही तर इतर क्षेत्रातही यश संपादन करतात.

आर्थिक तंगी: या जन्मतारखेचे लोक फार साहसी, वीर, शक्तिशाली, संघर्षशील आणि कधीच हार न मानणारे असतात. मात्र, यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. यांच्या आर्थिक स्थितीत नेहमीच चढ-उतार पाहायला मिळतो. अनेकदा यांना घरातून पैसे मागावे लागतात. मात्र, वयाच्या ठराविक टप्प्यावर यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होते.

वैवाहिक जीवन: या जन्मतारखेच्या लोकांचा आपल्या मित्रपरिवार फार विश्वास असतो. त्यामुळेच हे लोक पटकन धोका खातात. प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, यांच्या लव्ह रिलेशनशिप फारशा टिकत नाहीत. मात्र, यांचं वैवाहिक जीवन फार सुखी असतं या लोकांवर गुरुचे विशेष आशीर्वाद असतात. चांगले आणि आनंदी जीवन जगण्यासाठी गुरुचे आशीर्वाद आवश्यक असतात. आपण सात्विक जीवन जगले पाहिजे. या जन्मसंख्येचे लोक सात्विक जीवन जगतात. त्यांना गुरुच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी, संपत्ती आणि आदर मिळतो. या मूलांकाचे जे लोभ, कपट, स्वार्थ आणि तामसिक जीवनशैलीच्या अगदी विरुद्ध जीवनशैलीचे पालन करतात ते गुरुच्या कृपेशिवाय संघर्षमय जीवन जगतात.
अंकशास्त्रानुसार, 3 मूलांकाच्या लोकांची मजबूत शक्ती आश्चर्यकारक असते. हे लोक एकदाच काही करायचे ठरवले तर ते पूर्ण करूनच दम घेतात.

स्वतंत्र जीवन जगायला आवडते: मूलांक 3 असलेल्या लोकांना स्वतंत्रपणे जीवन जगणे आवडते. ते कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करत नाहीत. हे लोक खुल्या मनाचे असतात. क्षुल्लक गोष्टी त्यांना अजिबात समजत नाहीत. हे लोक फक्त तार्किक गोष्टींवर विश्वास ठेवतात.

अध्यात्मात रस: मूलांक 3 असलेल्या लोकांना अध्यात्मात रस असतो. जसजसा काळ पुढे सरकतो तसतशी त्यांची या दिशेने आवड वाढत जाते. हे लोकही खूप उत्सुक असतात.मूलांक ३ च्या वक्तींमध्ये नॉलेज ची भूक असते. शिक्षण चांगले होते, इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्हिटी चांगली असते, चांगले शिक्षक होऊ शकतात, जीवन सात्विक असते, समाजात मार्गदर्शक म्हणून कामे ह्यांना जमतात, ऑकल्ट सायन्स मध्ये हे मास्टर असतात, जसे ज्योतिषी, रेकी,टॅरो,वास्तुतज्ञ वगैरे क्षेत्रात अशा व्यक्ती जरूर पाहण्यात येतात. ह्यांना असा सल्ला दिला जातो कि अशा व्यक्तींनी कधीही नॉनव्हेज खाऊ नये. जीवनातील बरीच ध्येय गाठण्यास मदत होईल.

मूलांक 3 चे लोक घाबरट असतात. ते इतरांचा विचार जास्त करतात, समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करेल याचा विचार ते करतात. मूलांक 3 चा शासक ग्रह बृहस्पति आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू मानला जातो. घाबरट असले तरी 3, 12, 21 किंवा 30 जन्मतारखेचे लोक फार महत्त्वकांक्षी देखील असतात. हवं ते मिळवण्याची जिद्द त्यांच्यात असते. वाचन आणि लेखनाची असते आवड.

मूलांक 3 असलेले लोक उच्च शिक्षण घेतात : हे लोक खूप अभ्यासू असतात, वाचन आणि लेखनात ते खूप हुशार असतात. या लोकांना विज्ञान आणि साहित्यात प्रचंड रस असतो. हे लोक अभ्यासात यशस्वी होतात. मात्र, या लोकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. अनेकदा या लोकांना घरून आर्थिक मदत घ्यावी लागते. वाढत्या वयाबरोबर त्यांची आर्थिक स्थिती सुधारू लागते.

मूलांक ३ प्रेम जीवन: या मूलांकाच्या लोकांनी १, ४, ५, ६ किंवा ७ क्रमांकाच्या लोकांवर प्रेम करावे किंवा त्यांच्याशी लग्न करावे.

नकारात्मक व्यक्तिमत्व:या ग्रहाची विस्तृत ऊर्जा बहुतेकदा मूलांक ३ मधील व्यक्तींना भौतिक यशाकडे आणि मोठी घरे आणि महागड्या गाड्यांसारख्या आलिशान वस्तूंच्या इच्छेकडे प्रेरित करते. कारण ते लक्ष आणि प्रशंसा मिळवण्याचा प्रयत्न करतात, ते स्वकेंद्रित देखील होऊ शकतात, त्यांच्या कामगिरी किंवा क्षमतांना अतिशयोक्तीपूर्ण बनवू शकतात. कधीकधी त्यांच्या योजना पूर्ण करण्यासाठी शिस्तीचा अभाव असू शकतो, ज्यामुळे अपूर्ण प्रकल्प किंवा ध्येये निर्माण होऊ शकतात. सुसंगत अंक: १, २, ५ आणि ९ हे अंक मूलांक ३ साठी शुभ मानले जातात.
उपाय: गुरूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारी उपवास करणे, धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे आणि पुखराज रत्न (ज्योतिषाच्या सल्ल्याने) परिधान करणे शुभ मानले जाते.

प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे: करीना कपूर खान, श्रद्धा कपूर, सोनू सूद आणि रजनीकांत यांसारख्या व्यक्तींचा मूलांक ३ आहे.
शुभ रंग, दिवस आणि तारीख त्यांच्यासाठी पिवळा, जांभळा, निळा, लाल आणि गुलाबी रंग खूप शुभ असतात. गुरुवार व्यतिरिक्त मंगळवार आणि शुक्रवार हे दिवसही त्यांच्यासाठी खूप शुभ आहेत.
मूलांक ३ साठी लकी तारखा – ३, ६, ९
मूलांक ३ साठी शुभ रंग पिवळे, नारंगी, गुलाबी आहेत.
मूलांक ३ साठी शुभ दिवस – गुरुवार.
मूलांक ३ साठी भाग्यवान रत्न – पुष्कराज रत्न

क्रमांक ३ साठी व्यवसाय: तुम्ही एडिटिंगचे काम, घाऊक विक्रेता, पूजा दुकान, पान दुकान, मिठाईची दुकान, परफ्यूमचे काम, चित्रपट निर्माता, जमीन खरेदी-विक्री, ज्वेलरी, पिवळ्या वस्तूंचा व्यवसाय, वक्ता, नेता, शिक्षण आणि शेअर्स इत्यादी व्यवसाय करू शकता. जन्मांक 3 च्या जातकांवर होणार धनवर्षाव! गुरु आणि सूर्याच्या कृपेने भाग्योदय उजळणार. मूलांक 3 च्या जातकांसाठी 2026 हे वर्ष कसे जाईल जन्मांक 3 च्या जातकांसाठी 2026 हे वर्ष अतिशय सुंदर आणि फलदायी ठरणार आहे. तुमचा स्वामी ‘गुरु’ आणि 2026 चा प्रभावी अंक 1 चा स्वामी ‘सूर्य’ यांच्या शुभ संयोगामुळे तुमच्या आयुष्यात आनंद आणि यशाची नवी पहाट येणार आहे. नोकरीत बढती मिळणार की परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार.

गुरुचं ज्ञान आणि सूर्याचं तेज! जन्मांक 3 च्या जातकांसाठी 2026 हे वर्ष ठरतंय यशाचं महाद्वार. त्यांच्या आयुष्यात गुरु आणि सूर्याच्या युतीने ‘राजयोग’ येणार आहे. आरोग्य: 2026 मध्ये तुमचे आरोग्य मार्च आणि ऑगस्ट महिना वगळता अतिशय उत्तम राहील. बीपी, लघवीशी संबंधित त्रास किंवा यकृताच्या (Liver) समस्या उद्भवू शकतात. 17 फेब्रुवारी ते 11 एप्रिल हा काळ श्वसनाचा त्रास किंवा सायनस असलेल्या रुग्णांसाठी थोडा कठीण असू शकतो. मधुमेह आणि रक्तदाब असलेल्यांनी जानेवारी आणि जूनमध्ये विशेष काळजी घ्यावी. नेत्रविकार असल्यास नियमित सूर्योपासना करा.

नोकरी आणि व्यवसाय: या वर्षी तुमचा व्यवसाय प्रगतीपथावर असेल. रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन आणि आयटी क्षेत्रातील व्यावसायिकांना मार्च ते सप्टेंबर दरम्यान मोठे यश मिळेल. चित्रपट, आयटी आणि व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांना एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान परदेशी जाण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती (Promotion) किंवा नवीन नोकरीचे चांगले पर्याय मिळतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील.

प्रेम आणि वैवाहिक जीवन: तुमच्या लव्ह लाईफसाठी हे वर्ष खूप सकारात्मक आहे. 18 फेब्रुवारीनंतर विवाहाचे प्रबळ योग जुळून येतील. 11 जानेवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान लव्ह लाईफमध्ये थोडा तणाव असू शकतो, विशेषतः जानेवारी आणि मे मध्ये नाते जपण्याची गरज आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि जोडीदारासोबत सुंदर सहलींचे योग येतील.

आर्थिक स्थिती: आर्थिक दृष्टीने मार्चनंतरचा काळ अतिशय मजबूत आहे. या वर्षी तुम्ही वाहन, दागिने, शेअर्स, घर किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक कराल. 11 मार्चनंतर पैशांची आवक वाढेल. मे, जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात नवीन वाहन खरेदी करण्याचे सुखद योग आहेत.

शुभ काळ आणि संधी: फेब्रुवारी आणि 16 मार्च ते 29 नोव्हेंबर हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. 11 मार्च ते 22 जून दरम्यान वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. मुलांच्या प्रगतीसाठी हे वर्ष खूप चांगले आहे. परदेशातील कामांतून लाभ मिळवण्यासाठी मार्च ते जून हा काळ अनुकूल आहे.

2026 साठी भाग्योदय उपाय: दररोज भगवान विष्णूंच्या नावाचा जप करा. विष्णू मंदिरात जाऊन 4 प्रदक्षिणा घाला. शनिवारी ‘सुंदरकांड’ आणि गुरुवारी ‘श्री विष्णू सहस्त्रनामा’चे पठण करा. आहारात हळद आणि दुधाचा वापर करा. सात धान्यांचे दान करत राहा. मंगळवारी गहू आणि गुळाचे दान करा. पक्ष्यांना दाणा-पाणी द्या. नियमितपणे ‘श्री रामचरितमानस’ किंवा ‘आदित्य हृदय स्तोत्रा’चे पठण करा. आई-वडील आणि मोठ्या भावाचे आशीर्वाद घेत राहा.

२०२६ हे परिपूर्ण वर्ष आहे.
✔ वैयक्तिक वर्ष क्रमांक ३ मध्ये करण्यासारख्या सर्वोत्तम गोष्टी:
• तुमचे विचार व्यक्त करा
• तुमची प्रतिभा सार्वजनिकरित्या सामायिक करा
• संवाद सुधारा
• सामाजिक संबंध निर्माण करा
• सर्जनशील प्रकल्प
• प्रवास आणि नेटवर्किंग
• उच्च-आत्मविश्वास निर्णय
⚠ २०२६ मध्ये टाळा:
• विखुरलेली ऊर्जा
• खूप अपूर्ण योजना
• आळस
• नकारात्मक स्व-चर्चा

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत.)

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
०८.०२.२०२६

 

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 117 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

1 Comment on ओळख मूलांकाची – भाग ३ – मूलांक ३

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..