खाज सुटणे
नखासारख्या टणक अथवा अणकुचिदार किंवा टोकदार वस्तूने ओरखडा काढण्याची प्रबळ इच्छा निर्माण करणारी संवेदना म्हणजे खाज. त्वचेत पसरलेल्या मोकळ्या ज्ञानतंतूंच्या टोकांतून ही संवेदना निर्माण होते. शरीराच्या काही भागातील त्वचेतून अशी संवेदना अधिक सहजतेने निर्माण होते. बाह्य कर्णातील बोगद्यासारखा भाग, जननेंद्रियांवरील त्वचा, गुदद्वारासमीपची आणि नाकपुड्यांच्या शेजारची त्वचा, ही काही उदाहरणे आहेत. काही रासायनिक रेणू, काही विद्युत चेतना […]
