धान्यांची कुळकथा
मानवी सभ्यतेत शेतीचा विकास व त्यातही धान्याचा विकास यांना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. धान्य म्हटले जाणारे गहू, तांदूळ, डाळ, बाजरी, आदी विविध धान्यांची अत्यंत मनोरंजक पण माहितीपूर्ण कुळकथा सांगितली आहे
धान्यांची कुळकथा
पाने : ६२ ; किंमत : ६० रू.
लेखक : डॉ. क.कृ. क्षीरसागर
प्रकाशक: नचिकेत प्रकाशन, नागपूर

पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, आणि विद्यमान नाशिक अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील “पंचवटी” येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे.
कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर मनमाड-काचीगुडा लोहमार्गावर वसलेले जालना हे एक प्राचीन शहर आहे. अनेक श्रध्दास्थाने असणार्या मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील राजूरचा गणपती हेही असंख्य भक्तांचे श्रध्दास्थान आहे.प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले ‘भोकरदन’ हे स्थळ तसेच देवीचे ‘अंबड’ व समर्थ रामदासांचे जन्मगाव ‘जांब’ ही याच जिल्ह्यात आहे.