नवीन लेखन...

३१ डिसेंबर……म्हणजे पार्टी हवीचं

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी वीकेण्डला आल्यामुळे जंगी पाटर्य़ाचे बेत रचले जात आहेत. यापूर्वी केवळ शहरी भागातच थर्टीफस्ट साजरा केला जात होता. आता ही प्रथा खेडय़ापाडय़ातही पोहोचली आहे. थर्टीफस्ट जवळ आला की युवावर्गांची धूमधाम तयारी असते. ती पार्टी कुठे करायची, कशी करायची, जेवणाचा मेनू कसा असावा यात युवा पिढी मग्न आहे. पण ३१ डिसेंबरला हॉटेलात जेवायला जाणं म्हणजे एक शिक्षाच. हॉटेलात गेलं की जागा मिळेल की नाही, जागा मिळाली तर दिलेली ऑर्डर वेळेत येईल की नाही याची अजिबातच खात्री नसते. ब:याचदा आपल्या आवडीच्या हॉटेलात तर जायलाच मिळत नाही. मग कुठेतरी काहीतरी खावून ३१ डिसेंबर साजरा करण्याचं उसनं समाधान चेहे:यावर मिरवावं लागतं. त्या ऐवजी पार्टी करायला नेहमी हॉटेलात कशाला जा ? घरच्या घरी पार्टी केली तरी मजा येते. व या वर्षी एक निर्णय घ्या कि ३१ डिसेंबर ला घरी पार्टी करणार व फँमिली सोबत जेवण करणार. घरी पार्टी करणार म्हणजे मेनू ठरवणे आले. पार्टीचा मेनू म्हणजे स्नॅक्स व डिनरचा. येत्या ३१ डिसेंबर २०१६ ला शनिवार आहे. काही घरात फक्त शाकाहारीच असते. शाकाहारी मेजवानीसाठी अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. शिवाय झणझणीत पदार्थाचाही बेत आपण आखू शकतो. पाश्चात्त्य संस्कृतीला घेऊन आपण त्याला व्हेज तडका देतो, त्याचाच वापर करून आपण वेलकम ड्रिंक म्हणून मॉकटेल, सूप मध्ये रोस्टेड पेपर टोमॅटो सूप, स्नॅक्स म्हणून क्रीम कॉर्न, तंदुरी पनीर असे अनेक पदार्थ घरच्या घरी बनवू शकतो. शिवाय, शाही व्हेज बिर्याणी ही नित्यनियमाने करणा:-या पदार्थाची मेजवानी करू शकतो. जेवणानंतर स्वीट डिश लागतेच, त्यामुळे सिझलर ब्राऊनी हा उत्तम पर्याय आहे. थंडीच्या दिवसांत आईस्क्रीम खाण्याची मजा काहीच औरच असते. त्यामुळे पार्टीला रंगत आणायची असेल तर आईस्क्रीम पाहिजेच. आईस्क्रीमचेही अनेक प्रकार असल्याने आपल्याला आवडतील त्या आईस्क्रीम बनवू शकतो. नववर्षाची पहिली रात्र डान्स, गाण्याने होत असते. त्यामुळे अशावेळेस पाहुण्यांना हलके पदार्थ देऊन ताजेतवाने ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यात आईस्क्रीम तर आहेच पण आपण पॉपकॉर्नही देऊ शकतो. त्यासोबत मस्तानीही आपण देऊ शकतो

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..