नवीन लेखन...

धीरोदात्त महिलांची कहाणी – द डायरी ऑफ मेरी बर्ग आणि माय फॅमिली इज ऑल आय हॅव



पुस्तक परिचय – मधुसुदन पतकी

‘द डायरी ऑफ मेरी बर्ग’ आणि ‘माय फॅमिली इज ऑल आय हॅव’ ही दोन आत्मनिवेदने नुकतीच प्रकाशित झाली. दुसर्‍या महायुद्धानंतरची परिस्थिती आणि या परिस्थितीला धीरोदात्तपणे तोंड देणार्‍या बेरी बर्ग आणि हेलन डिअर यांची ही कहाणी सामान्य वाचकालाही परिस्थितीशी लढण्याचे बळ देते. ही दोन्ही पुस्तके आत्मनिवेदनाच्या पातळीवर न राहता महत्त्वाचे दस्तऐवज ठरतात.

‘द डायरी ऑफ मेरी बर्ग’ या आत्मकथनाचा अनुवाद शोभना शिकनीस यांनी केला आहे. या नावाचे साम्यधर्म ‘द डायरी ऑफ अॅनाफ्रँक’ याच्याशी होते. दोन्ही पुस्तकांचे विषय सर्वसाधारणपणे सारखेच आहेत. अॅनाफ्रँक आणि मेरी बर्ग ज्या मानसिकतेतून गेल्या त्यांची मानसिक अवस्थाही जवळपास सारखीच आहे. जर्मन सैन्याने वॉर्सावर आपला पोलादी पंजा कसला आणि त्यानंतर मेरी बर्गने ही डायरी दिली. कैद्यांच्या देवाणघेवाणीची सहअनुमती केलेल्या करारानुसार तिची सुटका झाली. या करारानुसार सुटका होताना तिने १२ छोट्या वह्या काळजीपूर्वक दडवून ठेवल्या होत्या आणि त्यानंतर एक वर्षाच्या आत त्या जगापुढे उघड करण्यात आल्या. या तिच्या वह्यांमधून जगापुढे निखळ सत्य समोर आले. जगभरातल्या वाचकांसाठी प्रकाशित करण्यात आलेली ही साहित्यकृती त्यामधील सच्चेपणा, तपशिल, अर्थगर्भता आणि सुगमता यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरते. या कादंबरीचा कालखंड दुसर्‍या महायुद्धाच्या वेळेचा आहे. जीवनमृत्यूचे हेलकावे घेत असताना असणारी मानसिकता आणि घटनांच्या तपशिलामुळे त्याला आलेले ऐतिहासिक दस्तऐवजाचे महत्त्व यामुळे ही कादंबरी केवळ रंजक न राहता साहित्यमूल्याचा एक मापदंड ठरते. युद्धकाळात मानवी संहाराला आणि वर्णद्वेषाला पूर्णविराम देण्याची आर्त साद ही कादंबरी घालते. त्यामुळे हृदय पिळवटून टाकणारी वास्तववादी कथा आपल्या डोळ्यासमोर तरळत राहते. एस. एल. श्नायडरमन या स्विडिश पत्रकाराने मेरी बर्गच्या डायरीच्या प्रस्तावनेत म्हटले आहे, ‘पुन्हा केव्हा तरी भविष्यकाळात, वॉर्साच्या भग्नावशेषात दडलेले दुसर्‍या लेखकांचे अहवाल प्रकाशात

येतील, युद्धासंबंधीच्या

या शूरकथेला पाठिबा देणारे साक्षीदारही शोधता येतील मात्र, सद्यस्थितीत मेरी बर्गची रोजनिशी हा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला घटनाक्रमाचा एकमेव दस्ताऐवज आ
े.’ श्नायडरमनच्या या उद्गारातून या कादंबरीचे मोल लक्षात येते. मेरी बर्गची डायरी बारीक-सारीक तपशिलांनी अर्थगर्भतेने आणि विश्वसनीय अशी आहे. जर्मनांनी पोलंडवर हल्ला केला तेव्हा मेरी बर्ग पंधरा वर्षांची होती. आजूबाजूला घडणार्‍या घटनांना वाव देण्यासाठी तिने ही डायरी लिहिली. तिचे आई, वडिल मोठी भावंडे तसेच फॅशन डिझायनर असलेला लेना, श्या वॉटेंन बर्ग यांची तपशिलवार चित्रणे कादंबरीत येतात. अर्थात मेरीच्या बारा डायर्‍यांच्या प्रकाशनानंतर तिचे पुढे काय झाले हा प्रश्न अनुवादक शिकनीस यांच्याप्रमाणे वाचकांच्या मनात कायम राहतो. मेरी बर्गची डायरी वाचताना दुसर्‍या महायुद्धानंतरचा काळाकुट्ट इतिहास डोळ्यासमोर येतो, जो जिवंत होतो आणि आपणास अस्वस्थ करतो. ही अस्वस्थता सकारात्मकरीत्या मेहता पब्लिशिग हाऊसने वाचकांपर्यंत पोहोचवली आहे.

‘माय फॅमिली इज ऑल आय हॅव’ हे मेहता पब्लिशिग हाऊसचे दुसरे पुस्तक. हेही नाझी आणि साम्यवादी राजवटीमध्ये होरपळलेल्या एका स्त्रीचे आत्मनिवेदन आहे. हेलन अॅलीस डिअर ही १९३७ मध्ये आपल्या परिवाराबरोबर लंडनमधून बल्गेरियाला फिरायला गेल्या होत्या. तिथे गेल्यावर त्यांचे असे लक्षात आले की, बल्गेरियातून बाहेर पडणे अशक्य आहे. साहजिकच जगण्यासाठी अत्यंत प्रतिकूल आणि विदारक परिस्थितीशी त्यांना झगडावे लागले. वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत त्यांनी त्या परिस्थितीशी सामना केला. आशा न सोडता धैर्य आणि चिकाटीने त्यांनी प्रत्येक प्रसंगाला तोंड दिले. १९८९ मध्ये बर्लिनची भित पडल्यावर त्यांना आपल्या मायभूमीत अर्थात ब्रिटनमध्ये परतणे शक्य झाले. या सगळ्या घटनांचे निवेदन त्यांनी ‘माय फॅमिली इज ऑल आय हॅव’ या पुस्तकातून केले आहे. चित्रा वाळिबे यांचा नितांतसुंदर अनुवाद वाचकाला खिळवून ठेवतो. पंधराव्या वर्षी बल्गेरियात आल्यानंतर तिथे नाईलाजाने राहणे आणि नाईलाजानेच तिथले होणे हे किती त्रासदायक होते त्याची जाणीव त्यांच्या लेखनातून पदोपदी होते. मूळ ब्रिटिश असणार्‍या या स्त्रीला बल्गेरियन माणसाशी लग्न करावे लागते. त्याच्याशी लग्न करणे ही असाह्यता त्यांनी अत्यंत भावपूर्ण शब्दात चितारली आहे. जर्मन अधिकार्‍याचा जाच हाट संपवणे हा हेलनपुढचा मुख्य प्रश्न होता. तिला बल्गेरियाचा व्लादिमीर यांच्याशी विवाह मनापासून करायचा होता

असेही नव्हते. परंतु, शेवटी परिस्थितीशी तडजोड करत तिने व्लादिमीरशी विवाह केला आणि एक सुखी संपन्न आयुष्य ती जगली. तिला झालेली मुले, त्यांनी विविध देशात जाऊन मिळवलेले नाव याचा तिला नंतर अभिमान वाटायला लागला.

‘द डायरी ऑफ मेरी बर्ग’मध्ये मेरीचे शेवटी काय झाले हे समजत नाही. परंतु हेलन एक कृतार्थ जीवन जगली आणि २००२ मध्ये तिची प्राणज्योत मालवली हे स्पष्ट होते. मूळ ब्रिटिश. ब्रिटनचा त्या काळी जगावर असलेला दरारा त्यातून युद्धामुळे एकूणच झालेली वाताहत प्रथम नाझी राजवट आणि त्यानंतर साम्यवादी विचारसरणीच्या राजवटीत जीवन कंठणार्‍या हेलनचे आत्मिक बळ मात्र जबरदस्त होते. संधी मिळाल्यानंतर तिने पुन्हा ब्रिटनला जायचे ठरवले आणि मातृभूमीतच देह ठेवला. ब्रिटिश असल्याची आणि ब्रिटिश रक्ताची जी गुणवैशिष्ट्ये आहेत ती गुणवैशिष्ट्ये तिच्यात पुरेपूर भरली होती हे तिच्या जीवनप्रवासावरून स्पष्टपणे लक्षात येते. चार मुले चार दिशांना आहेत याचे तिला आता वैश्यम नाही. किबहुना, आम्ही सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो आणि काही प्रसंगी एकत्र येतो तेव्हा जागतिक संमेलन भरल्यासारखे वाटते, असे त्या म्हणतात. यावरून त्यांची आशावादी वृत्ती अधोरेखित होते. हेलन डिअर यांनी लिहिलेल्या आठवणी हृदयद्रावक आहेत. तशात त्या धीराच्या आणि आशावादाच्याही आहेत. पराभवावर मात करत कणखर मनाने जगण्याचे उदाहरण त्या स्वतःच्या जीवनातून देतात आणि संकटांना न घाबरता ध्येय साध्य करतात. खर्‍या अर्थाने त्यांचे जीवन

म्हणजे यशाची एक गाथाच आहे.

पुस्तकाचे नाव ः ‘द डायरी ऑफ मेरी बर्ग’, लेखिका ः मेरी बर्ग, संपादन ः एस. एल. श्नायडरमन, अनुवाद ः शोभना शिकनीस, किमत ः १८० रुपये, पृष्ठे ः २१४.

पुस्तकाचे नाव ः ‘माय फॅमिली इज ऑल आय हॅव’, लेखिका ः हेलन अॅलिस डिअर, अनुवाद ः चित्रा वाळिबे, किमत ः २२० रुपये, पृष्ठे ः २१६

दोन्ही पुस्तकांचे प्रकाशक मेहता पब्लिशिग हाऊस, पुणे.

(अद्वैत फीचर्स)

— मधुसुदन पतकी – अद्वैत फीचर्स

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..