नवीन लेखन...

चांगल्या कळफलकाच्या निकषांपेक्षा सर्व-स्वीकृत कळफलक अभ्यासणे गरजेचे.

भारत सरकारने प्रमाणित केलेला संगणकावर टंकलेखन करण्यासाठी देवनागरी लिपीसाठी ( व अन्य सर्व भारतीय लीपींसाठी) इंस्क्रिप्ट किंवा इंडियन स्क्रिप्ट कळफलकाची निवड केलेली आहे. हे काम अगदी अचानकपणे न होता प्रथम भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स (डी.ओ.इ.–डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स) विभागातर्फे त्यांच्या सी-डॅक (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग) या संशोधन केंद्राने तब्बल २४ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८६ साली संगणकाधारे भारतीय प्रादेशिक भाषा वापर या संबंधी संशोधन व विकसन कार्यक्रमांतर्गत त्याची बाजारातील आवश्यकता याचा अभ्यास करून संपूर्ण संशोधनानंतर इंस्क्रिप्ट किंवा इंडियन स्क्रिप्ट की-बोर्ड रचना विकसित केलेली आहे व सरकारने ती स्वीकृत केलेली आहे. या संबंधाची सर्व तांत्रिक माहिती इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन व प्लॅनिंग जर्नल (भाग-१४, क्र.१ ऑक्टो. ८६) मध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे.

वापरकर्त्यांच्या सोईसाठी त्यात १९८८ साली कोडच्या दृष्टिकोनातून काही बदल करण्यात आले व हाच की-बोर्ड संपूर्ण भारतभर तसेच जगभर भारतीय भाषांच्या टंकलेखनासाठी मान्यता असलेला की-बोर्ड म्हणून स्वीकारला गेला. जेव्हा मायक्रोसॉफ्ट, ऐपल आणि सन सारख्या कंपन्यांनी युनिकोड प्रणाली स्विकारून त्याचा वापर त्यांच्या संबंधीत प्रणालीसोबत करू लागले तेव्हा खऱ्या अर्थाने इंस्क्रिप्ट की-बोर्डची स्वीकारार्ह्यता वाढली गेली. आपण मात्र मराठीचा वापर विस्तृतपणे न करता उगाचच साप म्हणून भुई बडवत बसलेलो आहोत. त्यामुळे संगणकावर मराठीच्या वापरासंबंधी जनमाणसात उगाचच गैरसमज पसरत चाललेले आहेत याची दखल आपण घेत नाही आहोत.

मला हे मान्य आहे की प्रचलीत इंस्क्रिप्ट कळफलकांच्या रचनेमध्ये अगदी एखादा दुसरा बदल करणे गरजेचे आहे.परंतू हे काम संबंधीत संस्थेशी सलोख्याच्या चर्चेने होणे सहज शक्य आहे, त्यासाठी वर सांगितलेल्या नामवंत कंपन्यानी व भारत सरकारने प्रमाणित केलेल्या कळफलकाच्या रचनेवर शिंतोडे उडविणे थांबले पाहिजे या मतावर मी ठाम आहे.

काही वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेल्या लेखामधील संबंधीत नामवंत व अनुभवी लेखकाची क्षमा मागून मी काही मुद्द्यांचा परामर्ष घेऊ इच्छितो. त्यांनी वर्णन केलेल्या चांगल्या कळफलकासाठी काही निकष सांगितलेले आहेत, त्या मुद्द्यांनुसार वस्तूस्थिती सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

१) संगणकावर अक्षरे टंकलिखीत करण्यासाठी उपलब्ध असलेल्या ४७ कळा ( ४८ नाही) मौल्यवान आहेत यात कोणतीही शंका नाही. इंस्क्रिप्ट कळफलकाची रचना करणाऱ्या संशोधन संघाने फक्त मराठी किंवा हिंदीचा विचार न करता एकसंध सर्व भारतीय लीप्यांचा विचार केलेला आहे हे तमाम भारतीयांना भूषणावह आहे. हे करताना ळ नुक्ता सारखे एखादे दुसरे अक्षर कळफलकावर आल्याने काहीही बिघडत नाही. मोठे ध्येय गाठण्यासाठी अतिशय अल्पशी तडजोड व्यवहार्यच मानली गेली पाहिजे. ए, ओ सारख्या स्वराक्षरांचे चिन्ह मराठीत व हिंदीत सातत्याने वापरात येत असल्याने ते अन्-शिफ्ट जागेवर ठेवलेले आहे व त्याचे चिन्ह शिफ्टवर ठेवल्याने टंकलेखन करताना काहीही फरक पडत नाही. शिवाय अन्-शिफ्ट जागेवर असलेली चिन्हे अनेक मुलभूत अक्षरांसोबत मुक्तपणे वापरता येतात (उदा. रा, री, रि, रू, रु, रे, रो, रौ, रै, रं, रः) र नुक्ता (ऱ) हे अभर पोटफोड्या र् तयार करण्यासाठी ( उदा. होणाऱ्या, करणाऱ्या इ.) उपयोगात येते त्यामुळे त्याची रचना योग्यच आहे.

२) देवनागरी लीपी तीन मजली आहे हे सर्वश्रुत आहे. इंस्क्रिप्ट कळफलकावर त्यांच्या मजल्याच्या जागेनुसार कळांची रचना केलेली नसली तरी अक्षरे व त्यावरील कोणतीही मात्रा टंकलिखीत होताना ती अगदी बरोबर मजल्यानुसारच टंकलिखीत होते. मात्रा आधी टंकीत केलेल्या कोणत्याही अक्षरासोबत सुयोग्य जागेवर यावी यासाठी सॉफ्टवेअरच्या सहाय्याने ते अक्षरवळण तयार करतानाच काळजी घेतली जाते. कळफलक वापरकर्ता फक्त लिखीत मजकूराचे टंकलेखन करत असल्याने या अल्गोरिदम् ची त्यांना माहिती असण्याची खरोखर आवश्यकता नाही.

३) देवनागरीमधे विरामचिन्हे ही येतातच येतात. इंस्क्रिप्ट कळफलकावरील रचनेप्रमाणे त्याची रचना बदललेली नाही. फक्त अशी विरामचिन्हे समाविष्ट करण्यासाठी त्यासाठी वेगळी सोय न करता कळफलकावरील ठराविक अशा एखाद्या-दुसऱ्या कळा दाबण्याने देवनागरीचा कळफलक तात्पुरता इंग्रजीत बदलला जातो व ही विरामचिन्हे आरामात टंकीत करता येतात. हे काम झाल्यावर पुन्हा त्याच ठराविक कळा दाबून इंग्रजीचा कळफलक देवनागरीत आणता येतो.

४) इंस्क्रिप्ट या प्रमाणित कळफलकाच्या सहाय्याने मराठी किंवा इंग्रजी टंकलिखीत करताना कळफलकावरील अल्ट या कळेचा वापर करण्याची आवश्यकताच लागत नाही, फक्त टंकलेखन करताना काही विशिष्ट अक्षरचिन्हे – जी सहसा लागतच नाही अशी टंकीत करण्यासाठी अल्ट व संबंधीत अक्षराचा संकेत क्रमांक टाईप करून ते अक्षरचिन्ह टंकीत करता येते. हीच सोय इंग्रजीतून टंकलेखन करताना देखील वापरात आणता येते व ती जगन्मान्य पद्धत आहे.

५) इंस्क्रिप्ट कळफलकाच्या सहाय्याने ट्ट, ठ्ठ ही अक्षरे सहजच टाईप करता येतात. परंतू ती दोन्ही प्रकार टंकलिखीत करण्यासाठी सोय होणे गरजेचे आहे. अर्थातच हे काम व इतर आवश्यक असलेले किरकोळ बदल सी-डॅक सारख्या संस्थेला चुटकीसरशी करता येईल.

६) या विषयावर लेखन करणाऱ्या काही लेखकानी सुचविल्याप्रमाणे इंस्क्रिप्ट कळफलकाच्या सहाय्याने देवनागरी लीपीसाठी टंकलेखन करताना लिंक अप्रोचने अक्षरे टंकलिखीत होतात. इतकेच नव्हे तर ऱ्हस्व मात्रेसाठी कळ दाबली असता, ती मात्रा अक्षराच्या सुयोग्य जागी टाकली जाते. उदाहरणार्थ <मिसळून <=

इंस्क्रिप्ट कळफलकाच्या जोडीला युनिकोडचा व्यापक वापर संगणकावर सहजपणे व कोणताही खर्च न करता येणे शक्य झालेले आहे. असा वापर केल्याने आपले वाड्.मय जगभर पाठवता येते व ते कोणत्याही संगणकावर सहजपणे प्रदर्शितही होते. या संबंधी बरीचशी माहिती मी पुढील लेखामध्ये देवू इच्छितो. अर्थातच युनिकोड व त्याचा संगणकावर वापर अशी माहिती इतरत्रही उपलब्ध आहे.

– <प्रा. सुभाषचंद्र य. पवार

प्रस्तुत लेखाचे लेखक हे स्वतः ग्राफिक आर्टिस्ट

व फॉण्ट डिझायनर, या विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक असून

ते सी-डॅक च्या जिस्ट-पेस कार्यक्रमाचे महाराष्ट्र राज्य या प्रदेशाचे समन्वयक

म्हणून गेली १५ वर्षे काम पहात आहेत. कित्येक वर्षांपासून ते प्रमाणित

कळफलकाच्या वापराने संगणाकावर मराठी, हिंदीतून काम करीत आहेत

व त्यातून त्यांची अनेक पुस्तकांची निर्मिती झालेली आहे. यात तंत्राने

लिहिलेल्या त्यांच्या किमया फोटोशॉपची या पुस्तकास महाराष्ट्र शासनाने

२००९ सालचा उत्त्कृष्ट मराठी वाड़्मय राज्य पुरस्कार दिलेला आहे.

— प्रा. सुभाषचंद्र य. पवार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..