सवाई “साईटस्-साऊंडस्”

सवाई हा फक्त एक उत्सवच नाही तर महोत्सव आहे .. गेली ६० वर्षे दर वर्षी नित्य नियमाने सवाई च्या सर्व मैफिली जागवणारे अस्सल रसिक हे ह्या उत्सवाचे वैशिष्ठ्य ..

खाणे आणि गाणे ह्या दोन महत्वाच्या गरजा इथे उत्तम रीतीने पुरविल्या जातात …

पुरण पुळ्या , उकडीचे मोदक , उपवासाचे पदार्थ , साबुदाणे वडे , बटाटे वडे .. घरगुती जेवणा पासून भेळ , गरम शेंगा दाणे .. सर्व खवय्यांना नेहमीच आकर्षित करतात … जोडीला वाफाळलेला गरम फक्कड चहा किंवा सुवासिक कॉफी !!

बहुतेक फक्त ह्याच संगीत महोत्सवाला अनेक परिवार- मित्र-मैत्रिणींचा घोळका एखादी पिकनिक कम मैफिल म्हणुन एकत्र बसलेला दिसतो ! वर्षात फक्त एकदाच शास्त्रीय संगीत ऐकणारे ह्या महोत्सवाला भेटतात .. काही लोकांच्या ओळखी- भेटी तर दर वर्षी फक्त ह्या महोत्सवा च्या दरम्यान होतात !

जागा पकडण्या साठी दोन-तीन तास आधी येऊन चादर अंथरून त्यावर झोपून राहणारे रसिक .. बरोबर निवडायला आणलेली भाजी , पालेभाजी कधी लोकरी चे स्वेटर विणण्याचे साहित्य .. अजून कुठली घरची कामं , ऑफिसची कामं घेऊन शांत पणे ते करत बसलेले “रसिक” हे फक्त सवाई लाच दिसतात…

ह्यात भर म्हणजे …आजकल अनेक लोकं लॅपटॉप / टॅब / आय पॅड घेऊन काहीतरी काम केल्या सारखे दाखवत सवाई चा “आनंद” घेत असताना दिसतात .. काही लोकं गाणं ऐकण्या पेक्षा ते कुठल्या तरी मोबाईल / स्मार्ट फोन नी रेकोर्ड करण्यात जास्त मश्गुल असतात !

लांब लचक फोटो लेन्स बरोबर गळ्यात कॅमेरा अडकवून (उगाचच) इकडून तिकडे धावणार्या यौवना .. युवक हजेरी लावतात .. तर काही फक्त खाण्या च्या स्टॉल्स वर मुक्कामाला येतात !

हि असली दृष्य फक्त सवाईतंच बघायला मिळतात !

मग खाणे असो वा गाणं .. रसिक नित्य नियमाने सवाई च्या वारी साठी आतुरतेने वाट पहात असतात

तर…. भेटूया नक्की … १२ ते १५ डिसेंबर !

—  संगीत संगीत या WhatsApp Group वरुन 

Avatar
About संगीत WhatsApp ग्रुप 23 Articles
श्री. संजीव वेलणकर यांनी सुरु केलेल्या “संगीत संगीत आणि फक्त संगीत” या Whatsapp समूहावरील पोस्ट आणि लेख....

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…