वैशाली देशपांडे यांचा हा लेख WhatsApp वरुन मिळाला. हा लेख तीन भागांमध्ये आहे. सुंदर माहिती आहे म्हणून शेअर करतोय…
ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे
मानवी शरीर universal life force जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे. या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ, maintenance आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो. या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते. आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय. प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते. Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते.
माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते…आणि त्या खालोखाल मेंदू.
यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही. किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले मत तयार होते.. याचे कारण आपले आणि त्याचे हृदय चक्र (अनाहत चक्र) जी तेजोवलये बाहेर सोडत असतात ती एकमेकांना स्पर्शतात आणि सूक्ष्म पातळीवर माहितीची देवाणघेवाण करतात.. आणि आपण त्याप्रमाणे त्याच्याशी आपले वागणे बोलणे ठरवतो.
मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विचार करण्याची शक्ती.. आपल्या मनात दिवसाला सरासरी 70000 विचार येतात.. विचार सुद्धा ऊर्जा रुपातच उत्सर्जित होत असतात.. त्यांचा ही प्रभाव आपल्या तेजोवलयावर पडत असतो. सकारात्मक विचारांमुळे आपले तेजोवलय नेहमी स्ट्रॉंग रहाते. जर आपण सतत निराशेच्या , द्वेषाच्या किंवा रागाच्या विचारात राहात असू तर आपल्या तेजोवलायवर त्यांचा विपरीत परिणाम होतो. आपले विचार आपल्या भावनांना जन्म देतात..आणि त्यानुसार तेजोवलय बदलत राहाते..
जर दोन्ही हात पसरून आपण उभे राहिलो तर जो अंडाकृती आकार आपल्या शरीरासभोवती तयार होईल तेवढे सर्वसाधारण निरोगी माणसाचे तेजोवलय त्याच्या शरीराबाहेर सर्व दिशांनी पसरलेले असते. या ह्ददीत आपली आवडती किंवा जवळची व्यक्ती आली तर आपल्याला आवडतं.. पण ज्यांच्या शी आपलं फारसं पटत नाही किंवा वर सांगितल्या प्रमाणे एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल आपले प्रथमदर्शनी चांगले मत नाही अशी व्यक्ती आली , तर आपण नकळतच 2 पावलं मागे सरकतो.. कदाचित यावरूनच ,”keeping someone at arm’ length” किंवा “2 पावलं दूर रहा ” वगैरे वाकप्रचार निघाले असावेत.
तेजोवलय जर clean आणि strong असेल तर आपल्या आरोग्यावरच नव्हे तर सम्पूर्ण आयुष्यावरच त्याचा चांगला परिणाम होतो. तुमचं सगळं व्यक्तिमत्व दुसरयांवर प्रभाव पडणारं बनतं.. आपसी संबंध चांगले रहातात.. उच्च पदावरील व्यक्ती, अभिनेते, देशप्रमुख किंवा इतरही क्षेत्रातील अशा व्यक्ती ज्यांना नेतृत्वगुण आणि mass influence ची सवय असते त्यांचे तेजोवलय खूप स्ट्रॉंग असते.
प्राचीन योग शास्त्रात देखील तेजोवलयाचं महत्व सांगितलं आहे. आपण जर देवदेवतांची चित्र पाहिली तर त्यांच्या मस्तका भोवती गोल तेजस्वि प्रकाश दाखवलेला असतो. ते तेजोवलय असते. उर्जास्वरूपात असल्याने साध्या डोळ्यांना तेजोवलय बघता येत नाही. पण काही विशिष्ठ पद्धतीने नियमित अभ्यास आणि सराव केला तर ते शक्य आहे.
तुम्ही शब्दांनी, वागण्याने आपल्या भावना किंवा intentions लपवू शकता .. पण तुमचे तेजोवलय काहीही लपवून ठेवत नाही.. तुमच्याबद्दलची सर्व माहिती तुमचं तेजोवलय देत असते.
मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला तेजोवलयाबद्दल वाचून काय वाटले ..आणि त्याबद्दल अजून माहिती वाचायला आवडेल का ..हे नक्क्की सांगा
जर आवडत असेल तर पुढच्या भागात आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात याचा कसा उपयोग करावा, कुठल्या गोष्टीं मुळे तेजोवलय damage होऊ शकते आणि ते कसे clean, स्ट्रॉंग आणि protect करावे, अशी आणि इतरही आणखी माहिती तेजोवलयाबद्दल करून घेऊ.
— वैशाली देशपांडे
15.04.2017
तेजोवलय पुढील माहिती ची वाट पाहत आहे
Tell me how to protect Aura and reading
खूप छान लेख, पुढच्या लेखांची वाट पाहत आहे
तेजोवलय (Aura) भाग 1
हा लेख तीन भागांमध्ये आहे.
भाग 1 – khup mahiti poorna
2 n 3 chi aturtene vaat pahat ahe
waiting for 2 nd3 part