ऐश्वर्या नारकर या माहेरच्या पल्लवी आठल्ये. त्यांचा जन्म ८ डिसेंबर रोजी नाशिक येथे झाला. त्यांचे पहिलं व्यावसायिक नाटक होतं ‘गंध निशिगंधाचा’! त्यात प्रभाकर पणशीकर, रेखाताई कामत, अविनाश नारकर, शरद पोंक्षे,अशी तगडी स्टारकास्ट होती. त्या नाटकाच्या दरम्यानच अविनाश नारकर यांच्या बरोबर प्रेम जमले. यानंतर त्यांनी विवाह केला.
तंबाखू विक्रीची नारकर कुटुंबाची लोअर परळ आणि डिलाइल स्ट्रीटवर दोन दुकानं होती. ३५० चौ. फुटांच्या जागेत, तेरा-चौदा जण राहत होते. अवीनाश नारकर घरातील सर्वात लहान. त्या वेळी अविनाश नारकर नाटक, चित्रपट, मालिका व डिबग करायचे. अनेक इंग्रजी मालिकांना त्यांनी हिंदी, मराठी आवाज दिलाय. ‘अल्लाद्दीन’ मालिकेतला इयागोचा आवाज अवीनाश नारकर यांचा आहे.
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर या दोघांकडे मराठी सिनेसृष्टीतील अगदी सोज्वळ कपल म्हणून पाहिलं जातं. अनेक सिनेमा आणि नाटकांमध्ये हे दोघ आहेत. तसेच मालिकांमध्येही यांनी काम केली आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी या सुखांनो या, माझे मन तुझे झाले या मालिका, गंध निशिगंधाचा, तुमच्या आमच्या घरात, आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे ही नाटकं, तर बाबांची शाळा, सून लाडकी सासरची, समांतर, चॅम्पियन्स, यलो असे चित्रपट केले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply