मनाला जुळती मन….
नाते उदयास येते….
‘माना’ची मातंबरी
मन गुंतुनि जाते….
भावनांचा खेळ….
‘मान’ली तरच नाती….
आज करावा गोड…
उद्या कुणाचे हाती….
दु:ख ही गोड मानावे..
गोड ही विष ठरते……
कुण्या ‘मधुमेही’च्या
मनात शिरून जाणावे….
बिंदुला जोडुनिया बिंदु….
रांगोळी बनते…..
तयासी रंगत
आपले ‘जीवन’ रंगते…..
लाभता ध्येय….
अन् उद्देश….
हा ‘जीव’ भरतो रंग….
जगण्याचे तरंग…
भाव बुडबुडे….अन्
मानलेले ‘गोता’वळे….
कधी अर्थ….
सर्वार्थाने निरर्थक…..
अथांग….
अबोध…..
अनंत…..
न उमजे मज….
बिंदु शी बिंदु…..
जीवनाचे कोडे….
न उलगडे मज…..
डॉ.दीपक सवालाखे….
यवतमाळ.
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे लेखक
Leave a Reply