नवीन लेखन...

आजी

आज दिवाळेक ईल्लले मुंबईकार परत तात्याकडे ईले. दिवाळेच्या विषयार चावदिवसाच्या आंघोळीचो विषय ईलो…. आणि तात्याक सांगल्यानी… तात्या तुकाआवस कशी न्हावक घाली ती सांग?

तातो म्हणता अरे मी आवस बघुकच नाय… मेली 3 म्हयन्याचो आसताना… आजयेन सांभाळल्यान माका…

आता आजी कशी होती?

मेल्यानू आवस मी काय बघुक नाय … बापाशीन दुसरा लगीन काय करूक नाय … माका आनी हयत्या ईट्याच्या बापाशिक तिनाच सांभाळल्यान…… चावदिवसाक सकाळी पयल्या कोंब्याक ऊठय…. तेवा भयानक थंडी….. दातार दात आपटत…. बेसनच्या पिटाचा उटना लाय…. आऩी न्हावक घाली…. पयलो तांबयो आंगार वतल्यान काय अशी शिरशिरी येय ….. आठावला काय आजय आंगार काटो येता…. तेवा कोन पयलो कारीट फोडता तेचे पैजी लागत…. पण म्हातारेन मरापर्यंत माका कारिट पयला फोडुक गावाक व्हया तेची काळजी घेतल्यान… तेवा न्हानयेरला मडक्या रंगवची पद्धत होती रे…. तेका कारटाचो हारय घालित आदल्यादिवशी…. न्हानी सारवन सापसुप केली जाय…. आता सारखी परीस्थीती नाय रे तेवा… पण वालयच्या गोड्या फोवाची सर मेल्यानू तुमच्या जिलेबीक येवची नाय अशी चव होती तिच्या हाताक…. आणी एक गोस्ट सांगतय तुमका… अरे मयग्या तुझो आजो मरताना आजयेेक पाठवल्यान आमच्याकडे आनि सोलाची कडी करुन घेतल्यान… आणी ती पीऊन मगे प्राण सोडल्यान .. ईचार बापाशीक अशी चव होती तिच्या हाताक…. वायंगान पेरतानाचे पोऴयेची आठवण कोणय आजुनय सांगात…. तिच्या हातचा एकदा खल्ललो जल्मात ईसराचो नाय

तीच्या हाताक गुन होतो…. मी जी औषधा देतय ती तीनाच दाखवलेली.. ती आणी धोंडग्याची आवस खास मैत्रीनी… आणी दोघाय औषधा देयत… धोंडग्याच्या बायलेन छळल्यान सासयेक. … त्याऐवजी औषधा शिकली आसती तर भला झाला असता…. आता रडता सासू बरी होती…..

म्हातारेन माका सगळा शिकवल्यान… बापाशीची माझ्या मरापर्यंत हिम्मत नाय होती ..आजी पुढ्यात आसताना माका हात लावची… काय सांगु पोरांनो तुमका… अगदी म्हारापोरापासुन भिकार्या पर्यंत तिच्या समोरसुन कोन ऊपाशी जावक नाय….. कदाचीत आजचे आमचे दिवस हे तीचीच पुण्याई…

प्रत्तेक घराक घरपण व्हया तर एक म्हातारी व्हयी रे……

तिच्या शिवाय घराक घरपण नाय रे येना… आसलेल्यानी झपले तर म्हातारे सांभाळा रे … मगे नाय गावाची…….

….. बापुर्झा

डॉ बापू भोगटे

डॉ बापू भोगटे
About डॉ बापू भोगटे 13 Articles
डॉ बापू भोगटे हे पशुवैद्यकिय पदवीधर असून त्यांचा मुक्काम कोकणात कुडाळ येथे आहे. ते काजू आणि नारळ बागायतदार असून त्यांचा पोल्ट्री फार्मही आहे. ते गोदरेज अॅग्रोव्हेटचे डिस्ट्रीब्युटर आहेत. गेली २० वर्ष ते जंगल भ्रमंती करत आहेत. त्यांनी आता जंगल नाईट स्टे ऊपक्रम पर्यटकांसाठी सुरु केला आहे. ते स्वत:ला अगदी टिपीकल मालवणी ऊंडगो... माणूस.. असे म्हणवून घेतात. त्यांनी स्वयंसेवी संस्थांमार्फत पशुवैद्यकीय ऊपक्रमातून २००० लोकांना पोल्टी व डेअरी ट्रेनिंग दिले आहे. कोकणातील गावराहाटी याबाबत त्यांचा विशेष अभ्यास आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..