यदुनाथ दत्तात्रय थत्ते

‘साधना’ला मराठी वृत्तपत्रसृष्टीत वैचारिक प्रतिष्ठा मिळवून देणारे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला.

महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांनी १९४२ च्या आंदोलनात उडी घेतली. कारावासही भोगला. स्वातंत्र्योत्तर काळात साने गुरुजी आणि आचार्य विनोबांची शिकवण उराशी घेऊन ती आचरणात आणली. १९५६ ते ८२ पर्यंत साने गुरुजींच्या ‘साधना’ साप्ताहिकाचे ते संपादक होते.

मराठी, हिंदीतून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. धर्मनिरपेक्ष नीतिशिक्षणाची दिशा दाखविणारे ‘प्रतिज्ञा’, राष्ट्रीयत्वाची जाणीव जागृत करणारे ‘आपला मान, आपला अभिमान’ हे पुस्तक, ही त्यांच्या पुरस्कारप्राप्त ग्रंथाची ठळक उदाहरणे. केंद्र व राज्य शासनाचे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. त्यांच्या एका ग्रंथाला ‘सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर सुवर्णपदक’ही लाभले.

साने गुरुजी कथामाला, बाबा आमटेंची भारतजोडो यात्रा, निगडित असणारे थत्ते ‘प्रेस कौन्सिल’चे अध्यक्षही होते. यदुनाथ दत्तात्रय थत्ते हे साने गुरुजी यांचे शिष्य होते. यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचे निधन १० मे १९९८ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2285 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....