नवीन लेखन...

वियोग

सहवासाचे सुख जेवढे,  वियोगाचे दुःखही तेवढे  ।

बांधल्या प्रेम बंधन गाठीं,  तुटता विसरुन जाती  ।।

लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा  ।

उडून जातां शाल सुखाची,  व्यक्त होई मग दुःखे जीवाची  ।।

कशास करितो प्रेम असे ते,  सहवासाने वाढत जाते  ।

फुग्यापरी जातां फूटूनी,  दुःख सारे जीवनीं  आणिते  ।।

दाखव प्रेम त्याच ठिकाणी, बघणार नाही वियोग कुणी  ।

केवळ प्रभूचा सहवास, तेच असे वियोगरहीत  ।।

प्रेम वाढते प्रभूसहवासे,  निस्वार्थी भक्ती त्यांत वसे  ।

समरस होता एक रुपानें,  वियोग मिटतो क्षणाक्षणाणे  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1943 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..