नवीन लेखन...

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सी.आर.व्यास

 

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित सी. आर. व्यास यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९२४ रोजी झाला.

सुरूवातीला सुमारे दशकभर त्यांनी महाराष्ट्रातील बासरी गावातील पंडीत गोविंदराव भातांबेकर यांच्याकडे धडे घेतले. पुढे पंडीत सी. आर. व्यास मुंबईमध्ये स्थायिक झाले पण त्यांनी ग्वालियर घराण्यातील राजारामबुवा पराडकर यांच्याकडे प्रशिक्षण घेणे सुरू ठेवले. आग्रा घराण्याच्या पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सांगितिक कौशल्य अधिक बहरले.

अनेक दशके पंडित सी.आर.व्यास यांनी जुन्या आणि नविन रागांमध्ये बंदिशांची रचना केली. देशभरातील अनेक गायकांनी ह्या रचना गायलेल्या आहेत. ‘राग सरिता’ ह्या पुस्तकामध्ये त्यांच्या कार्याचा समावेश करण्यात आलेला आहे.

संगीताच्या दुनियेमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात १९८७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९२ साली पद्मभुषण पुरस्कार आणि १९९९ साली तानसेन पुरस्कारांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

पंडित सी. आर. व्यास यांचे १० जानेवारी २००२ रोजी त्यांचे निधन झाले.

— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 3839 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..