वस्तूतील आनंद

आनंद दडला वस्तूमध्यें,  सुप्त अशा त्या स्थितीत असे
सहवासाने आकर्षण ते,  होऊन बाहेरी येत दिसे….१,

प्रेम वाटते हर वस्तूचे,  केवळ त्यातील आनंदाने
बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने…२,

तोच लूटावा आनंद सदैव,  अंवती भंवती वस्तूतला
दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला…३,

जेव्हा कुणीतरी म्हणती,  ईश्वर आहे अणू रेणूत
वस्तूमधील आनंद बघतां  हेच तत्त्व ते येई ध्यानात…४

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

About डॉ. भगवान नागापूरकर 1413 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…