नवीन लेखन...

ती आणि तो कालच परत

ती आणि तो कालच परत
भेटले…..खुप गप्पा मारल्या
ते दोघेही अजून तसेच होते..
पूर्वीसारखे….
मनात विचार आला
खरेच दोघे lucky आहेत
मग परत विचार आला
luck…bad luck हे मानले तर असते
नाहीतर काहीच नाही….
त्या दोघांना मी
अनेक ठिकाणी शोधतो
अनेकांमध्ये शोधतो
पण सहजपणे सापडत नाहीत….
पूर्वीसारखे असणे महत्वाचे
त्याला जुनेपण चिकटलेले नसावे
हे चिकटलेले जुनेपण पुढे
नेहमी घात करते..
पूर्वीसारखे ताजे रहाणे
आवश्यक असते…
निदान प्रेमात तरी……
— सतीश चाफेकर.
Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..