लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा

Marathisrushti Articles
  • मुख्य पान
  • लेखसंग्रह
  • सर्व चॅनेल्स
    • लेखसंग्रह
    • व्यक्ती-कोश
    • महासिटीज
    • खाद्ययात्रा
    • आरोग्य
    • कविता-गझल
  • मराठीसृष्टी विषयी
  • लेख व्यवस्थापन
  • लेखक नोंदणी
  • लॉग-इन
  • जाहिरात करा
  • संपर्क
  • लेखसंग्रह मुख्य पान
  • विशेष लेख
  • वैचारिक लेख
  • विषयवार लेख
    • अध्यात्मिक/धार्मिक
    • अर्थ-वाणिज्य
    • आरोग्य
    • उद्योग/व्यापार
    • कायदा
    • कृषी-शेती
    • क्रीडा-विश्व
    • खाद्ययात्रा
    • पर्यावरण
    • बातम्या / घडामोडी
    • पर्यटन
    • राजकारण
    • विज्ञान/तंत्रज्ञान
    • व्यक्तीचित्रे
    • विविध कला
    • व्यवस्थापन
    • शैक्षणिक
    • संस्कृती
    • सहकार
  • विविध सदरे
    • मराठी मुलुखातून
    • राष्ट्रीय सुरक्षा
    • जीवनाच्या रगाड्यातून
    • खाद्ययात्रा
    • मुलाखत अशी एक
    • नोस्टॅल्जिया
  • साहित्य – ललित लेख
  • कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
  • हलकं फुलकं
  • इतर सर्व
नवीन लेखन...
  • [ April 17, 2026 ] विश्वकर्मा शिल्पकार – समालोचन ऐतिहासिक
  • [ April 12, 2026 ] विश्वकर्मा शिल्पकार: वाकाटक-गुप्त काल ते तेराव्या शतकापर्यंत ऐतिहासिक
  • [ April 5, 2026 ] ओळख मूलांकांची – मूलांक ७ ज्योतिषविषयक टिप्स
  • [ April 2, 2026 ] ओळख मूलांकाची – मूलांक ६ ज्योतिषविषयक टिप्स
  • [ March 30, 2026 ] ‘मार्च’चे मातब्बर क्रिकेट
  • [ March 29, 2026 ] ओळख मूलांकाची – मूलांक ५ ज्योतिषविषयक टिप्स
  • [ March 27, 2026 ] ओळख मूलांकाची – मूलांक ४ ज्योतिषविषयक टिप्स
  • [ March 21, 2026 ] महाराष्ट्राचे शेक्सपियर – राम गणेश गडकरी व्यक्ती-परिचय
  • [ February 28, 2026 ] ओळख मूलांकाची – भाग ३ – मूलांक ३ ज्योतिषविषयक टिप्स
  • [ February 28, 2026 ] विश्वकर्मा शिल्पकार: आरंभिक इतिहास कालखंड ऐतिहासिक
  • [ February 28, 2026 ] कालचा व्हॅलेंटाईन डे… कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
  • [ February 28, 2026 ] अंदमान द्वीपसमूह : भारताचा निसर्गरत्न पर्यटन
  • [ February 16, 2026 ] बाळगुटी एक वरदान: भाग १० – बहुउपयोगी सुंठ आयुर्वेद
  • [ February 13, 2026 ] ओळख मूलांकांची : मूलांक २ ज्योतिषविषयक टिप्स
  • [ February 13, 2026 ] मूर्ख लक्षणे : ओळख आणि उपाय अध्यात्मिक / धार्मिक
  • [ February 13, 2026 ] महाकाव्यकालीन विश्वकर्मा शिल्पकार ऐतिहासिक
  • [ February 13, 2026 ] बलात्कार कविता/गझल रसग्रहण
  • [ February 5, 2026 ] ‘फेब्रुवारी’चे फर्जंद क्रिकेट
  • [ February 5, 2026 ] व्हिएतनाम : इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि आधुनिकतेचा अनोखा मिलाफ पर्यटन
  • [ February 4, 2026 ] ओळख मूलांकांची : मूलांक १ ज्योतिषविषयक टिप्स
Homeनियमित सदरेतंत्रविश्व – भाग २ : मोबाईल बँकिंग सुरक्षितता

तंत्रविश्व – भाग २ : मोबाईल बँकिंग सुरक्षितता

March 22, 2020 विजयकुमार काशिनाथ पाटील नियमित सदरे, विज्ञान / तंत्रज्ञान, विशेष लेख, शैक्षणिक

आजचे युग हे स्मार्टफोन्सचे युग आहे. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र ,निवारा आणि अँड्रॉइड मोबाईल अशा चार आहेत असं म्हणाला हरकत नाही. मोबाईल हे केवळ संपर्क आणि मनोरंजनापूरते राहिले नसून आपल्या अनेक दैनंदिन गोष्टी सुलभ करणारे उपयुक्त साधन ठरले आहे. त्यामध्ये बँकींग व्यवहार मोबाईलद्वारे करण्याचे म्हणजेच ‘मोबाईल बँकिंग’चे प्रमाण नोटबंदी झाल्यापासून झपाट्याने वाढले आहे. बँकांनी देखील वेगवेगळ्या अँड्रॉईड अँपद्वारे मोबाईल बँकींग सुलभरित्या करण्याची सोय उपलब्ध करून दिली.सरकारने देखील यूपीआय सारखी सुरक्षित आणि जलदरीत्या फंड ट्रान्स्फर करणारी सुविधा उपलब्ध करून दिली.

असे असले तरी एखाद्या अँपमधील आणि सुविधेमधील त्रुटींचा (loopholes)शोध घेऊन त्याचा आणि इतर मार्गांनी मिळविलेल्या माहितीचा वापर करून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.त्यासाठी मोबाईल बँकिंग करताना ते सुरक्षितरित्या करणे आवश्यक असते त्यासाठी आपणास काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते, जेणेकरून कोणतीही फसवणूक किंवा नुकसान टाळता येईल. त्याकरिता पुढील मुद्दे लक्षात ठेवावेत.
१. वैयक्तिक माहितीची गोपनीयता
मोबाईल बँकिंग करताना वापरावी लागणारी कोणतीही माहिती उदाहरणार्थ तुमचा डेबिट कार्ड नंबर, अकाउंट नंबर, ओटीपी किंवा मोबाईल लोगिन पासवर्ड, m.पिन, युपीआय पिन कोणाजवळही उघड करू नका. ही माहिती गुप्त राखा. कोणतीही बँक कोणत्याही कारणास्तव अशा प्रकारची माहिती आपल्या ग्राहकांना विचारत नाही हे लक्षात ठेवावे. जर तुम्हाला अशा पद्धतीचा तुमची गोपनीय माहिती विचारणा संदर्भात फोन आला तरीही ही माहिती देऊ नये प्रत्यक्ष बँकेत जाऊन खात्री करावी.
सोशल मीडियाचा वापर करताना देखील शक्यतो वैयक्तिक माहिती कमीत कमी उघड होईल याची काळजी घ्यावी.
२. मोबाईल ॲप्स लॉक व मोबाईल लॉक
मोबाईल बँकिंग सुरक्षितता म्हणजे साहजिकच मोबाईलची सुरक्षितता प्राधान्याने येते. मोबाईल मध्ये स्क्रीन लॉक हा पर्याय असतो त्याचा वापर करा. याशिवाय मोबाईल बँकिंग करण्यासाठी जे ॲप तुम्ही वापरता त्यालाही पॅटर्न लॉक अथवा पासवर्ड लॉक तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे द्विस्तरीय सुरक्षितता मिळते.
३. पासवर्ड सुरक्षा
मोबाईल बँकिंग करताना आपणास विविध पासवर्ड वापरावे लागतात, त्याबाबत सुरक्षितेच्या दृष्टीने पुढील खबरदारी घ्यावी.
— मोबाईल बँकिंग करताना वापरायचे पासवर्ड काही ठराविक कालावधीनंतर बदलत राहावे.
— पासवर्ड तयार करताना अक्षरे, अंक आणि सिम्बॉल याचा वापर करून तयार करावा. सहज अंदाज करता येईल असे नाव, जन्मतारीख, गाडी नंबर, परिवारातील व्यक्तीचे नाव अशा गोष्टी पासवर्ड म्हणून वापरू नयेत.
— पासवर्ड कुणालाही सांगू नये तसेच तो कोठे लिहूनही ठेवू नये.
४. मोबाईल बँकींग ॲप्स बाबत
मोबाईल बँकिंग करण्यासाठी जे ॲप्स आपण वापरतो त्याबाबत पुढील प्रमाणे उपाय योजना करून सुरक्षितता वाढवता येते.
— ॲप डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोर सारख्या अधिकृत ॲपस्टोरचाच वापर करावा
— मोबाईल बँकिंग करण्यासाठी शक्यतो बँकेने उपलब्ध केलेले अधिकृत ॲप्सचा वापर करावा कारण त्यामुळे अधिक सुरक्षितता मिळते.
— मोफत वायफाय असलेल्या ठिकाणी मोबाईल बँकींग ॲप्स वापरून बँकिंग व्यवहार करू नये.
५. वॉलेट्स चा योग्य वापर
नोटाबंदीनंतर ई- वॉलेट्स चे पेव फुटले आहे. अनेक विविध आकर्षक योजना दाखवून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न या कंपन्यांकडून होत आहे. अशावेळी सुरक्षितेच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे खबरदारी घ्यावी.
— एखादे ॲप डाउनलोड करण्याआधी त्याची गरज आहे का याचा विचार करा आणि आवश्यक असेल तरच डाऊनलोड करा. नवं ते हवं या तत्त्वानुसार नवनवीन इ-वॉलेट चा वापर टाळावा
— वॉलेट्स मध्ये आवश्यक असेल तेवढीच रक्कम भरून ठेवावी. गरज असेल तेव्हाच वॉलेट मध्ये पैसे ॲड करावे.
— वॉलेट डाउनलोड करण्यापूर्वी त्याची सुरक्षितता तपासून घ्या. ते ॲप वापरण्यासाठी विनाकारण अनावश्यक वैयक्तिक माहिती द्यावी लागत नाही ना हे तपासा. आपल्या कोणत्या परमिशन लागतात हे पहा.
६. मोबाईल बँकिंग साठी वेगळे अकाउंट असणे
मोबाईल बँकिंग करण्यासाठी सर्वात सुरक्षित उपाय म्हणजे मोबाईल बँकिंग करण्यासाठी वेगळे बँक अकाउंट असणे होय. त्याकरिता आपल्याला जेवढी रक्कम दरमहा मोबाईल बँकिंग करण्यासाठी अथवा इ वॉलेटचा वापर करण्यासाठी लागेल तेवढी रक्कम जमा असलेले एक वेगळे अकाउंट  वापरता येईल आणि बँकिंग करण्यासाठी केवळ याच अकाउंट्‍सच्या डिटेल्सचा वापर आपणास करता येईल आणि आपले मुख्य सॅलरी अथवा सेविंग अकाउंट सुरक्षित ठेवता येईल.
अर्थात सर्वच व्यवहारासाठी असे करता येणार नाही परंतु किरकोळ रकमेच्या व्यवहारासाठी सतत मुख्य अकाउंटचा तपशील येण्याचा धोका टाळण्यासाठी या पर्यायाचा वापर करता येईल.
७. इतर टिप्स
— ई-मेल द्वारे  अथवा मेसेज द्वारे मिळालेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन शॉपिंग करू नका किंवा इतर कोणतेही व्यवहार करू नका. लिंक पाठवलेल्या व्यक्तीकडून त्याबाबत माहिती घेतल्यानंतरच त्याचा वापर करावा.
— वापर नसेल तेव्हा मोबाईल मधील ब्लूटूथ, वायफाय, डाटा कनेक्शन आणि लोकेशन बंद करावे. आवश्यक असेल तेव्हाच या गोष्टी वापराव्यात.
— वापर नसेल तेव्हा मोबाईल बँकिंग अँप लॉग आऊट करावे.
— दुसऱ्या कोणास मोबाईल वापरण्यास देऊ नये आणि काही काळाकरिता दयायचा असल्यास
गेस्ट मोड चालू करून द्यावा.
— मोबाईल बँकिंग करण्यासाठी वापरण्यात येणारा मोबाईल फोन जर हरवला किंवा चोरीला गेला तर त्वरित करावयाच्या कृतींची यादी तयार ठेवावी अथवा  लक्षात ठेवावी. अशावेळी  पुढील उपाय करावेत
– प्रथमता ग्राहक सेवा प्रतिनिधीला कॉल करून आपले सिम कार्ड बंद करावे.
– क्रेडिट, डेबिट कार्ड ची माहिती एखाद्या ॲप मध्ये वापरले असल्यास ते कार्ड अंशतः अथवा कायमस्वरूपी ब्लॉक करावे, त्याकरिता बँकेची त्वरित संपर्क साधावा अथवा बँकेने दिलेल्या कार्ड हॉटलिस्ट करण्यासाठीच्या नंबरचा वापर करावा.
– गुगलच्या डिव्हाईस मॅनेजर द्वारे मोबाईल लॉक करावा आणि शक्य असल्यास मोबाईल डाटा डिलीट करावा.
अशा विविध पद्धतीचा अवलंब करून आपणास सुरक्षितरित्या मोबाईल बँकिंग नक्कीच करता येईल.
— विजयकुमार काशिनाथ पाटील 
…22/03/2020

 

  • तंत्रविश्व
Avatar
About विजयकुमार काशिनाथ पाटील 11 Articles
नमस्कार मित्रांनो, मी..विजयकुमार पाटील...आपणासारखाच शब्दविश्वातील एक प्रवासी. व्यवसायाने इंजिनीअर असलो तरी मन पुस्तकातच अधिक रमतं. उत्तम पुस्तके,उत्तम चित्रपट आणि उत्तम मित्र यांचा संग्रह हा माझा छंद. वाचनाची आवड लहानपणापासून असली तरी लेखनास मात्र मी नुकतीच सुरुवात केली आहे.खुप वाचन केलं की आपणही काही लिहावं असं वाटू लागतं,त्या वाटण्यातून बरेच लेखन झालं.अमेझॉनवर माझी काही ebooks प्रकाशित झाली आहेत. तंत्रज्ञानाची आवड असल्याने बदलते तंत्रज्ञान सोप्या मराठी भाषेत समजावून सांगणारे 'मराठी technical vijay' हे youtube channal देखील मी नुकतेच सुरू केले आहे. मराठीश्रुष्टीच्या या माध्यमातून विविध विषयांवरील माझे लेखन आपल्या पर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न आहे. तो कसा वाटला मला जरूर कळवा. धन्यवाद
Contact: Website Facebook YouTube
Previous article
Next article

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Loading…




 


नवीन लेख

विश्वकर्मा शिल्पकार – समालोचन

विश्वकर्मा शिल्पकार: वाकाटक-गुप्त काल ते तेराव्या शतकापर्यंत

ओळख मूलांकांची – मूलांक ७

ओळख मूलांकाची – मूलांक ६

‘मार्च’चे मातब्बर

ओळख मूलांकाची – मूलांक ५

ओळख मूलांकाची – मूलांक ४

महाराष्ट्राचे शेक्सपियर – राम गणेश गडकरी

ओळख मूलांकाची – भाग ३ – मूलांक ३

विश्वकर्मा शिल्पकार: आरंभिक इतिहास कालखंड

 

सभासद व्हा आणि मिळवा फायदे

आजच मराठीसृष्टीचे सभासद व्हा आणि न्यूजलेटर, मोफत ई-बुक्स तसेच पुस्तके, इ-बुक्स आणि सॉफ्टवेअरवर आकर्षक ऑफर्स मिळवा.


  • लेख व्यवस्थापन
  • लेखक नोंदणी
  • Author Kit
  • न्यूजलेटर सभासदत्त्व
  • वापरण्याचे नियम
  • संपर्क
  • Feedback
  • Disclaimer & Legal
  • मराठीसृष्टीचे लेखक
  • मराठीसृष्टीचे हितचिंतक
  • प्रवास .. १९९५ ते …..
  • मराठी साईट बनवा
  • विविध सदरे
  • गाजलेले लोकप्रिय लेख
  • मराठी सॉफ्टवेअर
  • लेखसंग्रह
  • व्यक्ती-कोश
  • महासिटीज
  • खाद्ययात्रा
  • आरोग्य
  • कविता-गझल
  • Youtube Channel
  • Facebook
  • Instagram
  • मराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम
  • मराठीबुक्स डॉट कॉम
  • मराठी साहित्यिक डॉट कॉम
  • मराठीसृष्टी प्राईम
  • फॉन्टफ्रिडम गमभन

Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..