नवीन लेखन...

पुत्र कुपुत्र होईल पण माता कुमाता होणार नाही

वृद्धापकाळी आईवडिलांचा सांभाळ करणाऱ्या मुलांना व्यवसायानिमित्त त्यांच्या पासून दूर राहण्याची गरज पडते. वृद्ध आईवडिलांची खरोखरीच मुलांनी काळजी घेतली तर “वृद्धाश्रम” चालवण्याची गरजच भासणार नाही. पण अशी मुले किती? स्वतःची मुले घरापासून दूर राहत असली की आईवडील त्यांची काळजी करत असतात, “काय करत असेल माझे मूल? अनोळखी गावी कुठे राहत असेल?” अशी चिंता आईवडील करतच असतात. परंतु मुले स्वतःच्या आईवडिलांची काळजी करतात का? संत पुनित महाराजांनी तर असे म्हटले आहे की, “बाकी सगळे विसरा, पण आईवडिलांना विसरू नका”. […]

तर सोन्याला सुगंध येईल

शिक्षकाची नोकरी करणे सोपे आहे. अवघड आहे ते हृदयापासून शिक्षक बनणे. शाळेमध्ये येणारा विद्यार्थी कुठल्या वातावरणातून आला आहे? त्याच्या घरची परिस्थिती कशी आहे? कुठल्या परिस्थितीमध्ये तो शिकत आहे वगैरे गोष्टींची जर शिक्षकाला माहिती असेल तरच शिक्षणामध्ये येणारे अनेक अडथळे वेळेवरच दूर होउ शकतात. […]

हे माझ्या सदैव लक्षात राहील

माझे जीवन असंख्य अनुभवांनी घडलेले आहे. मला लिहिण्याची (लिखाणाची) सवय नव्हती. परंतु कित्येक घटना अशा अनुभवल्या की त्यांना शब्दात उतरविण्याची इच्छा झाली. एका छोट्याश्या गावामधून राज्याच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्याच्या माझ्या प्रवासात मला आलेले अनुभव की ज्यापासून मी काही शिकले, प्रेरणा मिळविली व त्याचप्रमाणे माझे व्यक्तिमत्व घडले, त्यांना पुस्तक स्वरुपामध्ये गोष्टीरूपात मी प्रसिद्ध करीत आहे. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..