नवीन लेखन...

नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग ९ (अंतिम)

संपूर्ण प्रवास वर्णन करताना अनेक बाबी सांगायच्या राहिल्या. काही वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा उल्लेख करतो. – सुमारे पन्नास वर्षांपूर्वीच्या या आठवणी आहेत. जशा व जितक्या आठवतील तशा लिहिल्या आहे. त्यात थोडे मागेपुढे व कमीजास्त पण होऊ शकते. – २५ एप्रिल १९७२ ला आम्ही नागपूर सोडले आणि ९ सप्टेंबर १९७२ ला परत नागपूरात आलो. […]

नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग ८

बांगला देशात येऊन आम्हाला साधारणत दोन महिने झाले होते. सर्व पाहणे, सर्वांना भेटणं झाले होते. बांगला देशाचे राष्ट्रपती सोडले तर सर्वांच्या आमच्या भेटी झाल्या होत्या. सचिवालय, तिथल्या नद्या, तिथली माणसं, समाजकारण चळवळी, रेडिओ स्टेशन, बँका, स्वातंत्र्याचे युद्ध, त्यात सहभागी होणारे, घरचे वातावरण हे सगळे पाहून आता ठरवलं की, आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो पाहिजे आणि म्हणून दिनाजपूरहून जवळच्या रस्त्याने भारतात प्रवेश करायचं ठरवलं. […]

नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग ७

भटकता-भटकता आम्ही बांगलादेशाच्या अशा बाजूला आलो की जिथे बाजूलाच त्रिपुरा आहे. त्रिपुरा राज्याच्या राजधानी चे शहर अगरताला हे अगदी सीमेवरच आहे. सात-आठ किलोमीटर अंतरावर. त्यावेळची गंमत अशी की बांगलादेश मधील अनेक लोकं रिक्षातून, शेतातून, बांधातून अगरतालाला यायचे आणि सिनेमा पाहून परत जायचे. आपल्याला बॉर्डर सिक्यूरिटी असेल असं वाटतं, पण त्या वेळची स्थिती मात्र ही अशी होती. […]

नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग ६

मुक्ती बाहिनी (वाहिनी) प्रसिद्ध नेता बागा सिद्दिकी किंवा टायगर सिद्दिकी अब्दुल कादीर सिद्दीकी म्हणून तो प्रसिद्ध होता. (श्रीलंकेचा तामिळ नेता प्रभाकरनप्रमाणे) तो फक्त २७ वर्षांचा तरुण होता. इतिहास शिकतानाच मुक्ती बाहिनीचा नेता बनला. त्यावेळच्या बांगलादेशामध्ये त्याची जबरदस्त क्रेझ व पावर होती. तेव्हा त्याच्या हाताखाली सतरा हजार तरूणांची सेना होती. शासनामध्ये कुठल्या पदावर नव्हता. पण प्रचंड दबदबा होता. सगळं शासन त्याच्यासाठी खुलं होतं. पंतप्रधान व राष्ट्रपती यांचे दरवाजे त्याच्यासाठी कायम खुले होते. […]

नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग ५

आम्हाला मुजीबुर रहमान यांचे पहिले दर्शन झालं ते एका कुठल्यातरी कार्यक्रमात! ते व्यस्त होते. त्यावेळी त्यांच्या बाजूला कोणी जवळ जाऊ नये म्हणून बॉडीगार्ड होते. संबंधिताशी आम्ही बोललो. दुसर्या दिवशी सकाळी त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी भेटायला वेळ दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्यांच्या घरी ३२ धनमंडी या पत्त्यावर गेलो. तो दोन मजली बंगला होता. सकाळी त्यांच्यासोबत चहा घेतला. त्यांनी आमचं कौतुक केलं आणि आम्ही त्यांचा निरोप घेतला. अतिशय प्रसन्न सहृदय आणि प्रेमळ व्यक्तिमत्व होतं. इतका साधा प्रेमळ माणूस अशा लढ्याचे नेतृत्व करू शकतो? यावर विश्वास बसत नव्हता. पण ते सत्य होतं. […]

नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग ४

आतापर्यंत आपल्या देशात असल्यामुळे कोणीतरी ओळखीचा मिळेल, अशी एक शक्यता होती. मात्र जिथे कोणीच ओळखीचा भेटणार नाही, अशा संपूर्ण अज्ञात, अनोळखी प्रदेशात आम्ही निघालो होतो. कलकत्त्याहून बांगलादेशला न जाताच परत नागपूरला जाण्याची नामुष्की येते की काय? अशा परिस्थितीतून वैध परवाना मिळवून, अर्धी लढाई आपण जिंकल्याचा आनंद आणि अभिमान आम्हाला वाटत होता. […]

नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग ३

जेवणाच्या वेळी त्यांनी सांगितले, “बांगलादेशमध्ये जाण्याची आम्हाला कोणाला परवानगी मिळत नाहीये? तुम्ही कसे जाणार?” आम्ही सांगून दिलं, “काही झालं तरी जाणारच. परमिशन नाही मिळाली तर बेकायदा घुसू पण आम्ही बांगलादेशला जाणारच! नागपूरचे स्वयंसेवक आहोत तसे वापस येणार नाही.” ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे प्रेमाने चेष्टा करायचे. पाहुया किती दम आहे तुमच्यात, असं म्हणायचे! […]

नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग २

कलकत्ता दिशेने प्रत्यक्ष प्रवास – मनात होता एक प्रचंड उत्साह, आणि एक अनामिक हुरहूर. पुढचा प्रवास कसा होईल? करू शकू की नाही? मनात आहे ते पाहू किंवा नाही? अज्ञात भविष्यात काय आहे? पण हे सगळे प्रश्न तारुण्यातील उत्साहामुळे मागे पडले, आणि आम्ही क्षितिजाकडे बघत पुढे निघालो. पाहता पाहता आम्ही दुपारी दोनपूर्वी भंडारा गाठले. […]

नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग १

सर्वांच्या आग्रहामुळे मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या बांगलादेश सायकल स्वारीच्या आठवणी बाहेर काढल्या. जशा जमेल तशा त्या आपल्यासमोर ठेवल्या आहेत. माझ्यासाठी या आठवणी खूप महत्त्वाच्या, आनंदाच्या आहेत. सर्वांनाच त्या आठवणी एवढ्या रोचक वाटतील असं नाही, त्यामुळे कंटाळवाण्या वाटत असेल सोडून द्या. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..