नवीन लेखन...

युगांतर – भाग ९

रवींद्रची पाण्यातली हालचाल मंद होऊ लागली होती. त्याचा श्वास कमी कमी होत चालला होता. तो वाचवायला आला होता खरा त्या बाळाला, पण पाण्यात उडी मारल्या पासून तो जणू काही स्वप्नातून सत्यात उतरला होता. त्या बाळाला आणि त्या अण्णांच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला त्या काळोखात शोधत होता. पण तो सोडून त्या पुष्करणी मधे बाकी कोणाचंही नामोनिशाण नव्हतं. तो […]

युगांतर – भाग ८

संध्याकाळी सूर्यास्ताचा समय….. समुद्रावरून वारा प्रचंड वेगाने वहात होता. समुद्रावरचे काठ म्हणजेच सुरुचं बन अक्षरशः त्या वादळी वाऱ्याच्या तडाख्याने हेलकावे खात होतं. थंडीचे दिवस असले तरी आभाळ भरून आलं होतं आणि आता अवकाळी पाऊस पडणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. रवींद्र वाडीत फेरफटका मारत होता. ताई आणि तिचे मिस्टर दुपारी काही कामा निमित्त श्रीवर्धन […]

युगांतर – भाग ७

रवींद्र ने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ताईच्या डोक्यात खोलवर गाडल्या गेलेल्या गोष्टींना चिथावणी देत होती. पुष्करणी, पाणी, भैरोबा, लहानसा जीव या गोष्टींनी तर तिला आतून पूर्णपणे हादरवून टाकले होते. तिच्या डोळ्यांसमोर एकदम ५० वर्षांपूर्वी च्या घडामोडी जशाच्या तश्या धावू लागल्या. तिला कळत नव्हतं रवी ला याच गोष्टींचा समावेश असलेले स्वप्न का पडत होते. पुष्करणी, पाणी त्याचाच तर […]

युगांतर – भाग ६

सकाळचे ७ वाजले तरी रवींद्र अजून उठला नाही हे पाहून ताईने खोलीत जाऊन हाक मारली, तशी “उठतो ग” असे उत्तर तिला ऐकायला आले. आई ला जाऊन ३ दिवस झाले होते. ताई आणि तिचे मिस्टर दिवस कार्य होई पर्यंत तिथेच राहणार होते. दोन्ही काका परत मुंबई ला गेले होते ते दहाव्याला येतो असे सांगूनच. मावसभाऊ बाजूच्या गावातच […]

युगांतर – भाग ५

अंधार दाटून आला होता, आणि रवींद्र त्या अंधारात चालत जात होता. आजूबाजूला किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र रातकिड्यांचा आवाज कानात घुमत होता तर पायाखालची माती काटे, गवत, लहान खडे यांनी चालायला अडथळा आणत होती. पण रवींद्रचे लक्ष पुढे काळोखात जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या व्यक्तीवर खिळले होते आणि पुसट दिसत असणाऱ्या त्या व्यक्तीच्या मागे तो भान हरपल्या सारखं चालत जात होता. ना […]

युगांतर – भाग ४

रवीने हातातला कप बाजूला ठेवला, “ताई काय बोलत्येस तू? कसला आजार? काय सांगत्येस तू हे”, रवीने ताईच्या खांद्यांना हाताने गदगदा हलवून विचारले, त्याच्या चेहऱ्यावर अशक्य गूढ भाव निर्माण झाले होते पण ताईने आपलं तोंड घट्ट मिटून घेतलं होतं, नकारार्थी मान हलवून ती सांगायचं टाळायचा प्रयत्न करत होती. “प्लिज ताई बोल ना ग, काय झालं होतं तुला? […]

युगांतर – भाग ३

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ताईने राहिलेल्या दुधाचा चहा करून घराची आवरा आवर आणि साफ सफाई करायला घेतली. डिसेंबर चा काळ असल्याने थंडी पडली होती. समुद्र जरी जवळ असला, उष्म वातावरण असले तरी थंडीत हवामान त्या उष्म्याला जुमानायचे नाही. माजघरा मागच्या दरवाजातून बाहेर पडल्यावर पडवी वजा जागा होती, लहानपणी येथे सकाळी चुलीवर एक हंडा नेहमी पाणी […]

युगांतर – भाग २

रवींद्र त्या सुर्यनारायणाला नमस्कार करून परत फिरला आणि काही मिनिटातच तो सूर्य अस्ताला गेला आणि सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं. घरात आता ताई, ताईचा नवरा आणि २ काका आणि एक मावसभाऊ एवढे जण होते. घरात आईचा फोटो ठेवला होता आणि त्या समोर दिवा तेवत होता. दुपारी असलेली गर्दी जाउन त्या ठिकाणी आता फक्त उपस्थित लोकांचे श्वास आणि […]

युगांतर – भाग १

रवींद्र च्या मनात विचार आला की या सूर्याने कित्येक युगांतरे पाहिली असतील तरी याचा स्थितप्रज्ञ पणा अजूनही तसाच आहे. पण आज माझ्या आयुष्यात युगांतर होतंय आणि तरीही मी असा भेदरलेला, दबलेला का आहे, नाही मलाही या सुर्यासारखं स्थितप्रज्ञ, अभेद्य व्हायलाच हवं, व्हायलाच हवं. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..