नवीन लेखन...

दयेची दिशा

निसर्ग नियमें दया प्रभूची,  सदैव बरसत असते  । दयेचा तो सागर असता,  कमतरता ही पडत नसते  ।। १ अज्ञानी ठरतो आम्हींच सारे,  झेलून घेण्या तीच दया  । लक्ष्य आमचे विचलित होते,  बघून भोवती फसवी माया  ।। २ उपडे धरता पात्र अंगणीं,  कसे जमवाल वर्षा जल  । प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी,   निघून जाईल वेळ  ।। ३ भरेल […]

पुनर्जन्म

संघर्षाची बिजें जळतील,  जाणतां तत्व पुनर्जन्माचे  । आपसांमधील हेवे-दावे,  मिटून जातील कायमचे  ।। १ फिरत असते चक्र भोवती,  स्वार्थीपणाचे भाव आणिते  । त्यांनाच मिळावे सारे काही,  जाणता स्वरक्ताचे नाते  ।।२ उगम झाला जाती धर्माचा,  स्वार्थीपणाच्या याच कल्पनी  । वाटीत सुटतो प्रेम तयांना,  केवळ सारे आपले समजूनी  ।।३ कन्या जेव्हां सासरीं जाते,  नाती-गोती नवीन बनती  । वाटत […]

देह मनाचे द्वंद

दोन स्थरावर जगतो मानव,  आंत बाहेरी आगळा  । भिन्न भिन्न ते दर्शन घडते,  यास्तव कांहीं वेळा  ।। एकच घटना परी विपरीत वागणे  । दुटप्पेपणाचा शिक्का बसतो,  याच कारणे  ।। देहा लागते ऐहिक सुख,  वस्तूमध्ये जे दडले  । अंतर्मन परि सांगत असते,  सोडून दे ते सगळे  ।। शोषण क्रियेत आनंद असतो,  ही देहाची धारणा  । त्यागमधला आनंद […]

ईश्वरी गुप्तधन

होता एक गरीब बिचारा  । किडूक मिडूक ते जगण्या चारा  ।। कौलारु जुनी पडवी निवारा  । जन्म दरिद्री दिसे पसारा  ।।   परिस्थितीनें गेला गंजूनी  । आर्थिक विवंचना पाठी लागूनी  ।। शरीर जर्जर झाले रोगांनी  । जगण्याची आशा उरे न मनीं  ।।   अवचित घटना एके दिनीं  । धन सापडे जमिनीतूनी  ।। मोहरांचा तो होता रांजण  […]

शुद्धतेत वसे ईश्वर

खिन्न मनानें बसला होता,  उन्हांत एका खडकावरी  । डबके घाण पाण्याचे,  वातावरण दुषित करी  ।। १ किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें,  आणिक पडला काडी कचरा  । नजिक येईना वाटसरूं कुणी,  बघूनी सारा गालिच्छ पसारा  ।। २ सोडून देऊनी निवारा ,  नदीकांठच्या शिखरीं गेला  । निर्मळ करूनी जागा,  आश्रम त्याने एक बांधला  ।। ३ बाग फुलवूनी सुंदर तेथें  फळा […]

खरी पूजा

गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती  । श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती  ।१। भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी  । शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई  ।२। प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती  । विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती  ।३। भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर  । पवित्रता भासे तेथे, बघता […]

वियोग

सहवासाचे सुख जेवढे,  वियोगाचे दुःखही तेवढे  । बांधल्या प्रेम बंधन गाठीं,  तुटता विसरुन जाती  ।। लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा  । उडून जातां शाल सुखाची,  व्यक्त होई मग दुःखे जीवाची  ।। कशास करितो प्रेम असे ते,  सहवासाने वाढत जाते  । फुग्यापरी जातां फूटूनी,  दुःख सारे जीवनीं  आणिते  ।। दाखव प्रेम त्याच ठिकाणी, […]

ईश्वरी इच्छेनेच

वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन  । घटना घडल्या जीवनामध्यें,  राही त्यांची आठवण  ।। चालत असतां पाऊल वाट,  जीवन रेषे वरची  । स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा,  भावी आयुष्याची  ।। परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें,  पुरता गुरफटलो  । फिरणाऱ्या त्या  वर्तुळातूनी,  बाहेर येवूं न शकलो  ।। कल्पिले होते नियतीनें,  तेच घडविले तिनें  । भंग पावले स्वप्नचि सारे,  तिच्याच लहरीनें  ।। […]

देहाला कां शिणवितां ?

शरीरातील अवयव सारे, यंत्रवत् असती  । आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती  ।। यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी  । अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी  ।। शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती  । त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम  होती  ।। खाणें शुद्ध पिणे शुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते  । संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते  ।। उपास […]

शोधूं कोठें त्यास ?

शोधत होतो रुप प्रभूचे,   एक चित्त लावूनी  । अवंती भवंती नजर फिरवी,   श्वास रोखूनी  ।।   शांत झाले चंचल चित्त,   शांत झाला श्वास  । ह्रदयनाडी मंद होऊनी,   चाले सावकाश  ।।   पचन शक्ती  हलकी झाली,   जठराग्नीची  । शिथील झाली गात्रे सारी,   देह चैतन्याची  ।।   देहक्रियांतील प्राणबिंदू ,  असे ईश्वर  । समरस होतां त्याच शक्तिशीं,   होई […]

1 2 3 4 5 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..