नवीन लेखन...

शुद्धतेत वसे ईश्वर

खिन्न मनानें बसला होता,  उन्हांत एका खडकावरी  ।

डबके घाण पाण्याचे,  वातावरण दुषित करी  ।। १

किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें,  आणिक पडला काडी कचरा  ।

नजिक येईना वाटसरूं कुणी,  बघूनी सारा गालिच्छ पसारा  ।। २

सोडून देऊनी निवारा ,  नदीकांठच्या शिखरीं गेला  ।

निर्मळ करूनी जागा,  आश्रम त्याने एक बांधला  ।। ३

बाग फुलवूनी सुंदर तेथें  फळा फुलांना येई बहर  ।

राघू मैना मयुर पक्षी,  गाऊनी नाचती तालावर  ।। ४

निसर्गरम्य सौंदर्य ठेवा,  बाळगला जो त्या परिसरी  ।

धुंद राही तो सदैव तेथें  विसरूनी इतर जनांपरी  ।। ५

जमू लागले वाटसरू,  घेती विसावा कांहींक्षण  ।

विनानिमंत्रित येत होते, बघूनी प्रसन्न वातावरण  ।। ६

लाभे प्रभू सहवास त्यांना,  निर्मळ देही पवित्र मनी  ।

तोच येईल तुम्हा भेटण्या,  देह मंदिर केवळ बघूनी  ।। ७

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2014 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..