नवीन लेखन...

‘शक्ती’ हेच ईश्वरी रुप

तप्त सळई स्पर्ष करीतां ,   चटका देई शरीराला  । सुप्त अशी औष्णिक शक्ति,   आस्तित्व दाखवी त्या वेळेला  ।। वीजा चमकूनी गर्जती मेघ,   लख्ख उजेड सारते काळोख  । प्रकाश नि ध्वनीच्या लहरी,   आस्तित्वाची दाखवी झलक  ।। साधी असे तार तांब्याची,   झटका देई विद्युत असतां  । विद्युत शक्तीचा परिणाम,  जाणवी देहा प्रवेश करतां  ।। झाडावरले पडता फळ,  भूमी […]

देह – एक महान वस्ती

सात कोटीची वस्ती असूनी,  सुंदर वसले शहर एक  । प्रत्येक जण  स्वतंत्र असूनी,  कार्ये चालती तेथे अनेक  ।। सुसंगता शिस्तबद्ध   साह्य करिती एकमेकांना  । शत्रूची चाहूल येतां,  परतूनी लाविती त्या घटना  ।। अप्रतिम  शहर असूनी,  नाव तयाचे असे  ‘पुरूष’  । ‘पुरू’ म्हणजेच गाव असूनी,  मालक त्याचा आहे ‘ईश  ।। अशीच अगणित शहरे, या अथांग विश्वाच्या शरीरी  […]

क्षण भंगूर जीवन

ठसका लागून प्राण जातो,   घशांत अडकून काही तरी  । क्षणांत सारा खेळ आटपतो,   धडपड केली किती जरी  ।। हृदय जेव्हा बंद पडते,   उसंत न मिळे एक क्षणाची  । केवळ तुम्हीं चालत असतां,   यात्रा संपते जीवनाची  ।। कांचेचे  भांडे निसटता,   तुकडे त्याचे होऊन जाती  । देहाचा काय भरवसा,   जेव्हां सांपडे अपघाती  ।। वाढ करण्या शरीराची,  पडत असती […]

 वातावरण

विचारांची उठती वादळे  । अशांत होते चित्त सदा  ।। आवर घालण्या चंचल मना  । अपयशी झालो अनेकदां  ।।   विषण्णतेच्या स्थितीमध्यें  । नदीकांठच्या किनारीं गेलो  ।। वटवृक्षाचे छायेखाली  । चौरस आसनावरी बसलो  ।।   डोळे मिटूनी शांत बसतां  । अवचित घटना  घडली  ।। विचारांतले दुःख जाऊनी  । आनंदी भावना येऊं लागली  ।।   एक साधूजन ध्यान […]

देह ईश्वरी रूप

स्नान करूनी निर्मळ मनीं,   दर्पणापुढे  येऊन बसला  । जटा साऱ्या एकत्र बांधूनी,   भस्म लाविले सर्वांगाला  ।। ओंकाराचा शब्द कोरला,   चंदन लावूनी भाळावरती  । रूद्राक्षाच्या माळा बांधल्या,   गळा हात नि शिरावरती  ।। वेळेचे भान विसरूनी,   तन्मय झाला रूप रंगविण्या  । प्रभू नाम घेत मुखानें,  नयन आतूर छबी टिपण्यां  ।। पवित्र आणि मंगलमय,  वाटत होते स्वरूप बघूनी  । […]

शिखरावरी बांधली मंदिरे

विचारांच्या उठती लहरी,   वलये त्यांची होत असती  । सुविचारांची वलये सारी,    नभाकडे जात दिसती  ।।   पवित्र निर्मळ विचारांच्या,   तरल अशा लहरी असती  । अशुद्ध साऱ्या विचारांची,   जड लहरी तळात राहती  ।।   फार पूरातन काळी देखील,   उकल दिसते या गोष्टीची  । पवित्रतेच्या सर्व स्थळांनी,   शोधली जागा शिखरावरची  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०    

खरा एकांत

निसर्गाचा अप्रतिम ठेवा,   नदीकाठच्या पर्वत शिखरीं  । बाह्य जगाचे वातावरण,   धुंदी आणिते मनास भारी  ।।   त्याच वनी एकटे असतां,   परि न लाभे एकांत तुम्हांला  । चित्तामध्यें वादळ उठतां,   महत्त्व नव्हते बाह्यांगाला  ।।   खडखडाट सारा होता,    दैनंदिनीच्या नित्य जीवनी  । समाधानी जर तुम्हीं असतां,   शांतता दिसते त्याच मनीं  ।।   एकांततेची खरी कल्पना,   मनावरती अवलंबूनी  […]

दिलासा

ज्योतिष्याची चढूनी पायरी,   जन्म कुंडली दाखवी त्याला  । अडले घोडे नशिबाचे,   कोणते अनिष्ट ग्रह राशीला  ।।   नशिबाची चौकट जाणूनी,    आशा त्याची द्विगुणित झाली  । मनांत येतां खात्रीं यशाची,   जीव तोडूनी प्रयत्ने केली  ।।   प्रयत्नांती असतो ईश्वर,    म्हणूनी मिळाले यश त्याला  । आत्मविश्वास जागृत करण्या,   ‘भविष्य’ शब्द  कामी आला  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

 चक्र

मरूनी पडला एक प्राणी,  जंगलामधल्या नदी किनारी  । कोल्ही कुत्री आणि गिधाडे,  ताव मारती त्या देहावरती  ।। एके काळी हेच जनावर , जगले इतर जीवांवरती  । आज गमवूनी प्राण आपला,   तोच दुजाची भाकरी बनती  । निसर्गाचे चक्र कसे हे , चालत असते सदैव वेगे  ।। एक मारूनी जगवी दुजाला,  हीच तयाची विशेष अंगे  । डॉ. भगवान […]

विनाश – ईश्वरी व मानवी

संतुलन  करूनी चालवी,  निसर्गाचा खेळ सतत  । जन्ममृत्यूची चाके फिरवी,  एकाच वेगाने अविरत  ।। जन्म घटना ही शांत होता,  मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी  । नष्ट होतो जेव्हां मानव,  विचार लाटा उठती मनी  ।। मरणामध्यें निसर्ग असतां,  हताश होऊनी दु:ख करी  । मानवनिर्मित नाश बघूनी,  घृणायुक्त  येई शिसारी  ।। पूर वादळे धरणी कंप,  पचवितो आम्ही ही […]

1 3 4 5 6 7 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..