नवीन लेखन...

स्वर्गत – तळकोकणातली सोयरिक

तळकोकणात सोयरिक जुळवणे या प्रक्रीयेला स्वर्गत म्हणतात….

आता याचा स्वर्गाशी काय संबंध तो मात्र माहित नाही… आणी ते पवित्र कार्य, खुप पुण्य वगैरे मिळते म्हणून तसेच मोठेपणाचा सोपा मार्ग म्हणून… या प्रक्रियेत लोक हिरहिरीने भाग घेतात…. पण या अतिऊत्साही मध्यस्थ्यामुळे काहीवेळा मजेदार प्रसंग ऊद्भवतात…..

त्यातलाच एक तुम्हाला सांगतो….

काही दिवसापुर्वी आमच्या सौ.व दोन्ही मुलांसोबत सासुरवाडीला जाण्याचा बेत ठरला…. ऐनवेळी काजूच्या बागेतुन यायला ऊशिर झाला… मग घाईत बागेतुन आलो तसाच हाप पँट आणी टिशर्टवर गाडीत ड्रायव्हींगला बसलो….

वाटेत सौंच्या मैत्रीणीचे दुकान… शकूंतलाचे…10 वर्षापूर्वी तिच लग्न झालय अशी सौनी माहीती दिली.

मैत्रीणीचे दुकान म्हणजे खरेदी अपरिहार्य… पण सुदैवाने ती मला ऒळखत नव्हती… खाउची खरेदी झाल्यावर… तिला गाडीत कुणी ऒळखीचे वाटले… बघितले तर मैत्रीण…. मग मुलाला आणखी एखादा पुडा दिला बहुधा.. आणी आणखी गिऱ्हाईक नसल्यामुळे गाडीजवळ आली…. व ईकडच्या तिकड़च्या गप्पा सुरू झाल्या… मध्येच ती सौं ना बोल्ली,

“बघ गो कोन पोरग्या आसा तर भावाक… ”

ही खास ताकाला येऊन भांड लपवण्याची मालवणी स्टाईल….

मी मध्येत तोंड घातले….

“वो ताई माका पोरग्या बघा खय आसा तर”

तीचे डोळे अचानक चमकले बहुदा कुणीतरी मुलगी असावी पाहुण्यात….

तिने पटकन विचारले मैत्रीणीला….
“गो वय काय हेंचा? काय करतात? तुमच्याकडेच ड्रायव्हर आसत मा?

आणि आमच्यातलेच………  /जातितले/…….. मा?

आसा एक पोरग्या पण अपेक्षा काय?

एव्हाना “गाडी” गरम होउ लागली होती…. मला अंदाज आला पण ईलाज नव्हता .. ऊत्तर दिल्याशिवाय गाडी पुढे नेता येत नव्हती…

शेवटी सौनि ऊत्तर दिले…

” अपेक्षा काय नाय….. फक्त एक समोर आसा ती बायको…. आणि दोन पोरा संभाळुक व्हयी”

मी काहीही न बोलता गाडी चालू केली…. आणि शकुंतला वेड्यासारखी माझ्याकडे व सौकडे आलटुन पालटुन बघत होती

बापूर्झा.
डॉ. बापू भोगटे

डॉ बापू भोगटे
About डॉ बापू भोगटे 13 Articles
डॉ बापू भोगटे हे पशुवैद्यकिय पदवीधर असून त्यांचा मुक्काम कोकणात कुडाळ येथे आहे. ते काजू आणि नारळ बागायतदार असून त्यांचा पोल्ट्री फार्मही आहे. ते गोदरेज अॅग्रोव्हेटचे डिस्ट्रीब्युटर आहेत. गेली २० वर्ष ते जंगल भ्रमंती करत आहेत. त्यांनी आता जंगल नाईट स्टे ऊपक्रम पर्यटकांसाठी सुरु केला आहे. ते स्वत:ला अगदी टिपीकल मालवणी ऊंडगो... माणूस.. असे म्हणवून घेतात. त्यांनी स्वयंसेवी संस्थांमार्फत पशुवैद्यकीय ऊपक्रमातून २००० लोकांना पोल्टी व डेअरी ट्रेनिंग दिले आहे. कोकणातील गावराहाटी याबाबत त्यांचा विशेष अभ्यास आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..