नवीन लेखन...

शून्याला शरण !

त्यांना ती शांतता समजली असावी कदाचित,
योग्यतेशिवाय शून्य होण्यापेक्षा, शून्याला शरण केंव्हाही उत्तमचं..!

हा व्यक्त होण्याचा सर्वात पवित्र मार्ग असतो
व्यर्थ शब्दांशिवाय…!

नजरेआडून फिरणाऱ्या त्या सर्व गोष्टी एकसारख्या नसतातचं,
बरबटलेल्या ऐहिक सुखापेक्षा शुद्ध मन पर्वतासमान असतं..!

आणि ती दैहिक भावना, ते राखेसारख्या निपजलेल्या अंगाराला सोबती करावी लागते. कधी कधी त्याच्याही स्पर्श केवढा थंड भासतो…!

कर्त्याला नाकर्तेपणाचं ग्रहण लागलं की जळणारा सूर्य देखील अलगद गिळला जातो..
त्यावेळी टिमटीमणाऱ्या काजव्याचा प्रताप कोणी सांगावा..?

डोंगरकड्याचा माज उतरवत त्याच्या बाहुपाषातून मुक्त होणारा झरा सुध्दा निस्वार्थी गीत गतोच की..?
पण लाटांच्या उच्छादात सर्व गिळंकृत करू पाहणाऱ्या समुद्रला हे कोण समजवणार..?

बलशालिपणाच हत्यार हे उंबरठ्याच्या बाहेर मिरवायचं असतं..
कारण आतून तर आपल्याच लोकांचं अस्तित्व पणाला लागलेलं असतं..!

© अनिलराव जगन्नाथ

Avatar
About अनिलराव जगन्नाथ 10 Articles
उत्कृष्ट वक्ता, लेखक, ब्लॉगर, राजकीय सामाजिक आर्थिक घडामोडींचा अभ्यासक https://anilraojagannath.blogspot.com/?m=1

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..