शुद्धतेत वसे ईश्वर

खिन्न मनानें बसला होता,  उन्हांत एका खडकावरी  ।
डबके घाण पाण्याचे,  वातावरण दुषित करी  ।।

किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें,  आणिक पडला काडी कचरा  ।
नजिक येईना वाटसरूं कुणी,  बघूनी सारा गालिच्छ पसारा  ।।

सोडून देऊनी निवारा ,  नदीकांठच्या शिखरीं गेला  ।
निर्मळ करूनी जागा,  आश्रम त्याने एक बांधला  ।।

बाग फुलवूनी सुंदर तेथें  फळा फुलांना येई बहर  ।
राघू मैना मयुर पक्षी,  गाऊनी नाचती तालावर  ।।

निसर्गरम्य सौंदर्य ठेवा,  बाळगला जो त्या परिसरी  ।
धुंद राही तो सदैव तेथें  विसरूनी इतर जनांपरी  ।।

जमू लागले वाटसरू,  घेती विसावा कांहींक्षण  ।
विनानिमंत्रित येत होते, बघूनी प्रसन्न वातावरण  ।।

लाभे प्रभू सहवास त्यांना,  निर्मळ देही पवित्र मनी  ।
तोच येईल तुम्हा भेटण्या,  देह मंदिर केवळ बघूनी  ।।

डॉ भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

About डॉ. भगवान नागापूरकर 1382 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

Loading…