नवीन लेखन...

श्री गणपतिस्तोत्रम् – भाग ५

मदौघलुब्धचञ्चलालिमञ्जुगुञ्जितारवं !प्रबुद्धचित्तरञ्जकं प्रमोदकर्णचालकम् !!
अनन्यभक्तिमानवं प्रचण्डमुक्तिदायकं !
नमामि नित्यमादरेण वक्रतुंडनायकम्!!५!!

मदौघलुब्धचञ्चलालिमञ्जुगुञ्जितारव- एका अत्यंत मनोहारी प्रसन्न घटनेचे आचार्यश्रींनी तितक्याच विलोभनीय रीतीने केलेले हे वर्णन.

अली म्हणजे भुंगा. चंचल अर्थात सदैव इकडे तिकडे फिरत असलेले असे ते भुंगे.
ते का आले? तर भगवान श्री गणेशांच्या गज मस्तकावरून अखंड स्रवत असलेल्या ज्ञानमदाच्या ओघावर लुब्ध झालेले ते मुनीमानसरूप भुंगे .

मंजू अत्यंत मृदु असे चित्ताकर्षक. गुंजारव अर्थात भुंग्यांच्या द्वारे केला जाणारा गुंऽऽ गुंऽऽ असा, रव म्हणजे आवाज.
एकत्रितरीत्या पाहता ज्यांच्या गंडस्थळावरून अखंड वाहणार्‍या मदाच्या ओघामुळे आकृष्ट झालेल्या भुंग्यांच्या मंजुळ अशा गुंजारवाने अधिकच आत्ममग्न झालेले.

प्रबुद्धचित्तरञ्जक – प्रबुद्ध अर्थात ज्ञानी. आत्मज्ञानी. अध्यात्मविद्या विशारद. अशा शास्त्रवेत्यांच्या चित्ताला आकर्षित करणारे. त्यांच्या चित्तात सतत ज्यांचे चिंतन चालते असे. त्या चिंतनानेच त्यांचे रंजन करणारे म्हणजे त्यांना आनंद प्रदान करणारे ते प्रबुद्धचित्तरञ्जक.

प्रमोदकर्णचालक- आपल्याच आनंदात कान हलवत असलेले. हा झाला सामान्य अर्थ. पण वेगळ्या अर्थाने आनंद झाला तरच कान हलवणारे. अर्थात त्यांना आवडेल असे त्यांचे नामस्मरण कानावर पडले तरच प्रसन्नपणे ते कानावर घेणारे. अन्य गोष्टी आपल्या सुपा सारख्या कानाने पाखडून उडवून लावणारे ते प्रमोदकर्णचालक.

अनन्यभक्तिमानवं प्रचंडमुक्तीदायक- जे भगवान गणेशांची अनन्य भक्ती करतात त्यांना भगवान श्रीगणेश प्रचंड अर्थात तेजस्वी अशी मुक्ती प्रदान करतात. यातील मुक्ती शब्द फार महत्त्वाचा आहे. मोक्ष म्हटलेले नाही. याच जीवनात जिवंतपणी मिळणारा परमोच्च आनंद म्हणजे मुक्ती. ती मोरया च्या कृपेने मिळते.

मुक्ती हवी माये पासून. माया ही वेडीवाकडी आहे. त्या वक्रा असणाऱ्या मायेला जे तोंडाने म्हणजे फुंकरीने उडवून लावतात त्यांना वक्रतुंड असे म्हणतात.

पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात की अशा वक्रतुंडांचे मी नित्य आदराने नमन करतो.

— प्रा. स्वानंद गजानन पुंड 

प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड 338 Articles
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..