नवीन लेखन...

सौंदर्यदृष्टी आणि कलात्मकता

लेखिका ह्या काव्यलेखन व ललितलेखनाबरोबरच डिझायनिंगबाबत सल्लागार म्हणूनही कार्यरत असून त्यांचा इंटिरिअर डिझाईनिंगचा ‘वास्तुआर्ट’ नामक व्यवसाय आहे.

True success is all about working towords meaningful goals and dreams. एखादं स्वप्न पाहणं आणि ते सत्यात उतरावं म्हणून प्रयत्न करत राहणं हे ब्रीद घेऊन चाललो तर यशापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला कोणीच अडवू शकणार नाही. करिअरच्या वेगळ्या वाटा चोखाळताना प्रचंड जिद्द आणि मेहनत घ्यायची तयारी ठेवणाऱ्याला नेहमीच संधी खुणावत असतात आणि यशाचे मार्ग मोकळे करून देतात. ‘गुंजन सक्सेना’ हा सिनेमा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल.

आजच्या ग्लॅमर वर्ल्डमध्ये फॅशन आणि ट्रेंड ह्या शब्दांशी निगडित किती तरी गोष्टी अवतीभवती असताना व्यक्तिमत्त्व विकास ही फक्त वैयक्तिक बाब न राहता ती सभोवतालच्या वातावरणाशीही निगडित होते. आपल्या आजूबाजूला असलेल्या परिसर, घर ह्यामध्ये तुम्हांला काही बदल करावेसे वाटतात. का तर, आर्किटेक्चर किंवा इंटिरिअर डिझायनिंग हे क्षेत्र नक्की तुमच्यासाठीच आहे. घर असो वा कॉर्पोरेट हाऊस आता विविध अंगांनी विस्तारलं आहे. त्यामुळेच ते अधिक महत्त्वाचंही झालं आहे. इंटिरिअर डिझायनर म्हणून काम करताना मुख्य शाखेबरोबरच त्याच्याशी निगडित अनेक शाखांमध्ये स्पेशलायझेशन करून ते अधिक सक्षमरीत्या सांभाळता येऊ शकतं. तुमच्या कल्पकतेच्या बळावर तुम्ही अनेक ऑफिसेस, जागा, घरं, होटेल्स ह्यांना एक वेगळाच आकार देऊ शकता.

इंटिरिअर डिझायनिंगबरोबरच आता टेक्नॉलॉजी हा शब्दसुद्धा जोडला गेला आहे. ह्यावरून त्याच्या व्यापकतेची कल्पना आपण करू शकतो. तुमची कल्पना ही फक्त सजावटीपुरती मर्यादित न राहता डिजिटल युगाशीदेखील जोडली गेली आहे.

दिवसेंदिवस सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलते आहे हे आपण सर्वजण पाहतोच. अद्ययावत् अशा यंत्रणा, टेक्नॉलॉजी तसंच ग्लोबलायझेशन ह्यामुळे लोकांचं एकंदर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. वनाप्रत अधिक आस्था लोकांच्या मनात रुजली आहे. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपण काळाबरोबर पावलं टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. जीवन जगण्याच्या सगळ्या व्याख्यांना एक वेगळा आयाम मिळाला आहे आणि ती खरोखर काळाची गरज आहे. काळ बदलतो तसं जीवनमानही बदलत जात आहे. त्याबरोबर आपणही बदलणं आवश्यक आहे. जुनं ते सोनं असं कितीही म्हटलं तरी नव्याची कास धरून सामाजिक बदलांना सहज सामोरं जाता आलं पाहिजे.

कोणत्याही विषयाचा जितका सखोल अभ्यास करू तितकी त्या विषयाची व्याप्ती वाढत जाते. डिझायनर म्हणून काम करत असताना तुमचं व्यक्तिमत्त्व फक्त डिझायनिंग शब्दापुरतं मर्यादित राहत नाही तर, त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक बाबींशी तुम्ही आपसूकच जोडले जाता. वातावरण, माणसं, निसर्ग ह्यांचा तुम्ही आपसूकच अभ्यास करू लागता. तुमचे सामाजिक दृष्टिकोण, मानसिक दृष्टिकोण अधिक व्यापक होत जातात. माणूस म्हणून जगत असताना नवनिर्मितीचा आनंद हा इतर कोणत्याही आनंदापेक्षा, सुखापेक्षा अधिक प्रिय वाटू लागतो. चौकटीबाहरे येऊन पुन्हा त्याच चौकटीसाठी काम करताना एका वेगळ्याच अनुभवाची अनुभूती येत राहते. आपलं अनुभवविश्व ती समृद्ध करत राहते.

लहानपणी अतिशय छोट्या घरात राहत असताना स्पेस मॅनेजमेंट ह्याबद्दल आपण तेव्हाही विचार करायचो, हे आता प्रस्थापित झाल्यावर आपल्या लक्षात आलं. परंतु आपल्याला ज्याची आवड आहे तेच क्षेत्र आपण करिअर म्हणून निवडायला हवं. ह्या गोष्टीला तेव्हा इतकं महत्त्व नव्हतं. खूप उशिरा मला माझी आवडीची वाट सापडली. आपल्या बाबतीत जे घडलं ते इतरांच्या बाबतीत होऊ नये, असं मला नेहमीच वाटतं. आता तसं प्रत्येकाल करिअरनिवडीबाबत स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तरीसुद्धा कित्येकदा किंवा बरेचदा नेमकं काय करावं हा प्रश्न सतावतोच.

इंटिरिअर डिझायनिंग हे क्षेत्र सर्वसमावेशक आहे. म्हणजेच एकाच वेळी तुम्हाला वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करायला मिळतं. इंटिरिअर डिझायनिंग हे क्षेत्र करिअर म्हणून निवडल्यास फ्रीहँड ड्रॉइंग, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आणि थिअरी ऑफ डिझाईन असे अभ्यासक्रमाचे दोन भाग असतात. तसेच टेक्निकल ड्रॉर्स आणि कम्प्युटर अॅप्लिकेशन, सायन्स ऑफ इंटिरिअर डिझाईन, प्रिन्सिपल्स ऑफ इंटिरिअर डिझायनिंग, लाईफस्पेस प्लॅनिंग, लँडस्केप, इंटिरिअर कन्स्ट्रक्शन असे विविध विषय अभ्यासक्रमात समाविष्ट असतात.

हे क्षेत्र करिअर म्हणून निवडल्यास त्याच्याशी निगडित असलेल्या अनेक गोष्टींमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. Interior and spatial designer, lighting designer, visual merchandiser production designer, art director, exhibition designer ही अशा अनेक प्रकारचे स्वतंत्र जॉब प्रोफाइल तर इंडस्ट्री किंवा एम्प्लॉयमेंट सेंटरमध्ये architectural firm, retailers, interior designing companies, event managment companies, set designing companies, construction companies, designing consultancies इत्यादी ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता असते किंवा स्वत:चा उद्योग सुरू करता येऊ शकतो. वर उल्लेख केलेल्या अनेक
शाखांव्यतिरिक्त आणखी बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्यात तुम्ही कन्सल्टंट म्हणून काम करू शकता. उदाहरणार्थ: रंगसंगती, फॅब्रिक, इलेक्ट्रिकल फील्ड, कर्टेन, साऊंडप्रूफिंग ह्याबाबत प्रावीण्य मिळवून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. ह्या कोर्सच्या पात्रतेसाठी (eligibility) विचार केल्यास इंटिरिअर डिझायनिंग कोर्ससाठी डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स करता येतो. बारावीनंतर ह्या शाखांकडे वळता येतं.

सरतेशेवटी कला आणि कलात्मकता ह्या सृजनाशी जोडल्या गेल्या आहेत. निर्मिती हे त्याचं मूळ आहे. सर्जन हे ह्या व्यवसायाचा गाभा आहे. कल्पकतेतून कलात्मकतेकडचा हा प्रवास आयुष्यात अनेक रंग भरून जातो हे निश्चित.

– संध्या लगड

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..