नवीन लेखन...

सरपंचाची खेळी

डोंगर दर्‍याच्या खोर्‍यात अत्यंत दिमाखाने उभे असलेले बाभुळगांव सार्‍या महाराष्ट्राचा एक गौरव असलेले एक आदर्श गांव! गावाच्या चारही दिशांनी निसर्ग सौंदर्य होत, झुलझुळ वहाणारी सरीता तिच्या जवळ असलेल घाटांच सौंदर्य जवळच उभे असलेले प्राचीन असे हेमाडपंती धाटणिचे श्रीशंकराचे मंदिर हे सारे खरेतर त्यागावाचे एक भूषण होते. घाटाचे पायर्‍याचे आधार घेऊन उभे असलेले तुळीशी वृंदावन नदीची शोभा द्विगुणीत करीत होते. पाणी तुळशी वृंदावनावरून वाहू लागले की गावातील सुवासिनीच्या हस्ते नदीची ओटी भरली जायची. तिथे सरपंचाच्या बायकोचा प्रथम मान असायचा. नदीचे पाणी एका मोठ्या भांड्यात घेतले जायचे. सरपंच त्याची पूजा करायचे व गावातून मिरवणूक काढून प्रत्येकाला तिर्थ म्हणून दिले जायचे. उरलेले पाणी पुन्हा नदी पात्रात सोडून दिले जायचे. पहिल्या पुराचा तो सोहळा संपन्न झाल्यावर सरपंचातर्फे सार्‍या गावाला अन्न दान व्हायचे. संध्याकाळी विविध करमणूकीचे कार्यक्रम व्हायचे. दरवर्षीच्या १२ जुलैचा हा एक सोहळा सार्‍या गावाला चैतन्य देऊन जायचा.

गावातील प्रत्येकाच्या विविध अडीअडचणी सरपंच आणि गावातील तात्या सावकार दूर करायचे. मग कोणाच्या औषध पाण्याचा खर्च असो, कुणाच्या मुलामुलीचे लग्न असो. तात्या सावकार मदतीला धावून यायचे. गावातील शेती करणारे मग तात्यांच्या मदतीबद्दल धान्य द्यायचे. तथापि तात्या ते धान्य देखील गावातील गोरगरीबांना वाटून टाकलायचे. गावातील खंडेरायाचा उत्सव म्हणजे, गावातील उत्साहाला चैतन्य देणारा दिवस, घरोघरी पाडव्यासारखा देऊळकाठी उभी रहायची. घरोघरी मिष्टान्न म्हणजे पुरणपोळीचा बेत असायचा. खंडेरायाचा हा उत्सव चार दिवस चालायचा. शहरात नोकरी निमित्त असलेली मंडळी देखील रजा काढून गावात हजर असायची. शिवाय एखादं नाटक बसवून ते या उत्सवात सादर करून गावकर्‍यांची करमणूक करायचे. गावात मारूती, विठ्ठल देवळासमोरच्या भव्य पटांगणात विविध करमणूकीचे कार्यक्रम व्हायचे. विविध खाद्य पदार्थ विक्रेते व्यापारी, खेळणी, विविध वस्तू असा सारा बाजार भरायचा. याच बाभूळगावाचे नांव बदलावे असा प्रस्ताव काही तरूण मंडळी एकत्र येऊन त्यांनी गावासमोर मांडला. सरपंच तात्या सावकार यांच्यासह सर्वांनाच तो तेथे आवडला. आणि एकमताने गावाचे नांव आता आनंदपूर असे ठेवायचे ठरले. तसा प्रस्ताव सरकार दरबारी जाऊन त्याला मान्यता देखील मिळाली. अतिशय गुण्या गोविंदाने नांदणारे हे गांव म्हणून सार्‍या पंचक्रशीत त्याचा गौरव होत होता.
पुण्या मुंबईकडे कामास असणार्‍या तरूण गावकर्‍यांनी एकत्र येऊन विचार विनमय करून गावापुढे आता प्रस्ताव मांडला आता तरूणांना संधी द्या. अनेक वयस्कर मंडळींनी त्याला मान्यता दिली नाही. परंतु तात्या सावकारांना ती कल्पना आवडली. त्यांनी सर्वांना समजावून सांगितले आणि एकदाचा तो प्रस्ताव मान्य झाला. तथापि सरपंच आणि काही स्वार्थी मंड़ळींनी एक प्रश्न केला. अहो आता कुठे गाव सुधारतेय या तरूण मंडळींना गावच्या कारभाराचा अनुभव येई पर्यंत त्यांच्या समवेत सरपंचासह जुनी दोन सहकारी घेण्यात यावेत. शहरातून आलेली मंडळी परत कामासाठी शहरात गेली.
(याच बाभूळगावाचे नांव बदलावे असा प्रस्ताव काही तरूण मंडळी एकत्र येऊन त्यांनी गावासमोर मांडला. सरपंच तात्या सावकार यांच्यासह सर्वांनाच तो तेथे आवडला. आणि एकमताने गावाचे नांव आता आनंदपूर असे ठेवायचे ठरले. तसा प्रस्ताव सरकार दरबारी जाऊन त्याला मान्यता देखील मिळाली. अतिशय गुण्या गोविंदाने नांदणारे हे गांव म्हणून सार्‍या पंचक्रशीत त्याचा गौरव होत होता.)
पुढील वर्षी गावातील निवडणूक आपणास पुन्हा सरपंच/उपसरपंच अशी पदे मिळतीलच याची खात्री नसल्याने या चार पाच मंडळींनी सरपंचाच्या सहकार्याने काही गुप्त योजना आखल्या. त्याच काळात गाव सुधार योजनेसाठी सरकारकडून आनंदपूर हे गांव निवडले गेले. रस्ते, पाणी योजना, आरोग्य, शिक्षण वगैरे अनेक कामासाठी सरकार कडून मदतीचा ओघ सुरू झाला. विशेष म्हणजे या कामाचे पैशाबाबत हिशोब देण्याची गरज नसल्याचे जाहीर झालेले होते. तात्या सावकार आता हयात नव्हते. त्यांचा मुलगा नुकताच सज्ञान झाला होता. तथापि अजूनही गावाला नारायणराव हेच सरपंच होते. गांव सुधारणेतून थोडे रस्ते, पाणी सुविधा, आरोग्य, शिक्षणाबाबत कार्य केल्यामुळे सार्‍यांचाच त्यांच्यावर विश्वास बसला आणि वर्षानुवर्ष नारायणराव त्यांचे चुलते आणि काही नातेवाईक मंडळी गावाचे पंच मंडळी म्हणून काम पहात होते.
तात्या सावकारांचा मुलगा शहरात जाऊन शिक्षण घेऊन गावात परतलेला होता. सरकारचा ग्राम सुधारणा तवा निघाला आणि त्यात तात्या सावकाराचा मुलगा ग्रामसेवक म्हणून त्याच गावी कामावर रूजू झाला. आता सरपंचाला धीर आला. कागदपत्रे रंगविणारा पोर्‍या मिळाल्यामुळेच इतर कारस्थान करण्यात सरपंचाला वेळ मिळू लागला. एक दिवस पंचायतीचे सभेत सरपंचाने ठराव मांडला नदीला बांध घालून पाणी अडविण्याचा. प्रथमता त्याला विरोध झाला. परंतु सरपंच तसे बोलण्यात हुशार होते. त्यांनी त्यांचा हा प्रस्ताव सर्वांच्याच गळी उतरवीला. तात्या सावकारच्या मुलाला तो प्रस्ताव मान्य झाला नाही. तथापि सरपंचाच्या बाजूनी असलेल्या जास्त मतामुळे त्याचे काही
(शहरात कामाला असलेल्या मंडळींशी यात्रा, उत्सवानिमित्त गांवात आले की सरपंच त्यांची चांगलीच व्यवस्था ठेवीत. त्यांचे सत्कार करीत त्यामुळे त्यांचाही सरपंचावरचा विश्वास वाढत गेला.)
चालले नाही. शहरात कामाला असलेल्या मंडळींशी यात्रा, उत्सवानिमित्त गांवात आले की सरपंच त्यांची चांगलीच व्यवस्था ठेवीत. त्यांचे सत्कार करीत त्यामुळे त्यांचाही सरपंचावरचा विश्वास वाढत गेला. सरपंचांना चार मुले आणि मुली होत्या गावाजवळच्या खेड्यातच त्यांना सासर होते. सरपंचाच्या चारही मुलांना एकेक उद्योग काढून दिला होता. शेती सरपंच स्वतःच पहात होते. गावातल्या उत्सवासाठी शहरातील मंडळी गावाकडे आली होती. पुन्हा परतण्यापूर्वी सरपंचांनी त्यांना त्यांच्या नव्या बंगल्यावर पार्टीसाठी बोलावले होते. त्यावेळी तेथे सरपंचासह ग्रामसेवक व इतर आठ दहा मंडळी होतीच. सरपंचाचा तो बंगला पाहून सार्‍यांचेच डोळे दिपले होते. ग्राम सेवकांनी आपल्या दोन मित्रांना डोळ्यांनीच खुणावले. बंगल्या शेजारी सुंदरसा तलाव व झाडी होती. सरपंचाचा पगडा तर आता गावावर पूर्णपणेच होता. नाही म्हणायला ग्रामसेवक गावातील त्याचे काही मित्र व शहरात असलेले गावकरी असे चार पाचजण सरपंचाचे हे नवीन कारस्थान ओळखून होते.
मुले हाताशी आलेली होती. स्वतंत्र अशा व्यवसायातून पैसा मिळवित होती. त्यामुळे त्यांचे सारे कुटुंबच आता श्रीमंत झाले होते. गावाची सुधारणा होऊ लागली होती. मातीची घरे जाऊन सिमेंटची झाली. गावात हायस्कूल झाले. दवाखाने आले. विशेष म्हणजे गावात आता वीजही आली होती. सरपंचांनी नदीला घातलेल्या बांधामुळे निर्माण झालेल्या तलावाचे पाणी पंपाच्या सहाय्याने नवीन घेतलेल्या शेतात वळवले. ऊस, कापूस, तांदूळ या सारख्या उत्पन्नाबरोबर त्यांच्या मनात एक कल्पना आली की शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीची शाखा गावात आणायची त्यातून गावातील धान्य शहरात जाईल. शेतकरी वर्गाला पैसा मिळेल.
यात्रेच्या निमित्ताने आलेल्या सर्व गावकरी वर्गाकडे सरपंचांनी ही कल्पना मांडली. अनेक शेतकर्‍यांनी आता हाती पैसा येईल म्हणून ती कल्पना उचलून धरली. तात्या सावकाराच्या मुलाचे आणि त्याच्या मित्रांना ही नवी योजना रूचली नाही. कारण आता गावातला माणूस न माणूस सरपंचाच्या बाजूने रहाणार त्यांचे विरोधात जावे तर सरपंचाच्या घरी कामाला असलेले आपल्या विरूध्द उठतील म्हणून त्यांचे काहीच चालेना यात्रे निमित्त गावात आलेल्या त्या काही तरूणांना घेऊन सावकाराच्या ग्रामसेवक मुलाने एक गुप्त सभा घेऊन सरपंचाचा नवा प्रयोग काय त्याची चर्चा केली. आणि शहरात एकत्र भेटण्याचे ठरवले.
तात्या सावकाराचा मुलगा आता खूपच अनुभवी झाला होता. शहरातले त्याचे वकील, प्रोफेसर – सामाजिक कार्यकर्ते, पोलिस असे विविध मित्र त्याला वेळोवेळी सल्ले देत! नारायणरावांची आणि सार्‍या कुटुंबाची गावाला वेठीस धरण्याची खेळी सर्व मित्रांना समजल्यामुळे त्यांनी शहरात कामानिमित्त असणार्‍या आनंदपूरच्या त्या तरूणांना सत्य घटनेची जाणीव करून दिली. त्यामुळेच ही तरूण मंडळी मधूनच गावाला भेटी देत. सरपंचाच्या विरोधात उभे रहायचे म्हणजे सबळ पुरावे हवेत. मुख्य म्हणजे सरपंचांनी गावातील लोकांना पतपेढी काढून जे कर्ज दिलेले होते. त्यासाठी त्यांच्या जमिनीच म्हणून लिहून घेतलेल्या होत्या. शेतकरी शेतात राबून भरघोस उत्पन्न घ्यायचे. परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती शाखा गावातच असल्याने ते त्यांनाच विकावे लागे. त्यासाठी मध्यस्थी म्हणून दलाल असायचे. ते भाव पाडून धान्य विकत घ्यायचे आणि चढ्या भावाने विकायचे हे सर्व दलाल म्हणजे सरपंचाच्या नात्यातीलच होते…..
जमिनीची मशागत खते व इतर मजूरी ह्या सर्वांतून उत्पन्न मिळून खर्च वजा जाता काहीच शिल्लक रहायचे नाही. मग पतपेढीतून कर्ज घेण्यासाठी गावकर्‍यांना सरपंचाकडे जावे लागे. एकीकडे आनंदपूरच्या विकासाला खीळ बसत होती तर दुसरीकडे नारायणरावांचा आनंदोत्सव सुरु होता. त्यांच्याकडे कामाला असणार्‍या नोकर चाकरांना बर्‍यापैकी पैसे मिळायचे. परंतु पुढे हा कारभार मुलाच्या हाती आल्याने आता पगारवाढ तर सोडाच परंतु खाडे ही कापले जायचे. त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. उघडे डोळ्यांनी ते नारायणराव, त्यांच्या मुलाचे प्रताप बघत होते. तात्या सावकाराच्या मुलांना हे सारे सांगावे पण चुकून सरपंचांना कळले तर या भितीने अनेकांना तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागत होता. रामा गड्याने अशी बेईमानी केली होती. तेव्हा त्यालाच सरपंचांनी यमसदनाला पाठविले होते. त्यामागे खरे कारण वेगळेच होते. हे रघु भिल्लाने ओळखले होतेच त्यालाही दोन मुली होत्या. व त्या नुकत्याच वयात आलेल्या होत्या. पैशाच्या धुंदी पायी सरपंचाच्या मुलांसह त्याच्या मुलांच्या नियती बदलत चालल्या होत्या. नारायणरावांना त्यांच्या बायकोने त्यांच्या कुटुंबाने चालविलेले क्रूर खेळ पाहून इशारा दिला होता. त्याबाबत
(शेतकर्‍यांच्या उत्पन्नातून सक्तीने ५ हजार रूपये कापून घेतले. सरकारी मदतीपैकी २५ टक्के रक्कम पंचायत इमारतीसाठी खर्च करून बाकीची आपल्या कारखान्याच्या विकासासाठी वापरली. पंचायतीची इमारत एका मजल्यावर स्वतःचे कार्यालय थाटले.)
नारायणरावाने काहीही वक्तव्य न करता एक दिवस बंगल्यावर कोणी नसतांना रघु भिल्लाला कामासाठी बोलावले आपला मनोदय सांगितला. तो राजी होत नाही हे पाहून तेथेच त्याला अडकविण्यासाठी पोलिसांना फोन करून माझ्या पत्नीला रघु भिल्लानेच मारले असा कांगावा केला. पोलिसांना नारायणराव सरपंचाचे पूर्वीच्या विविध कामाची कल्पना असल्याने त्याने रघु भिल्लाला जाळ्यात अडकविले. गावात त्याच्या विरोधात राग येईल अशा बातम्या पसरविल्या रघु भिल्लाच्या कुटुंबाचे सरपंचाच्या मुलासह गावकर्‍यांनी हाल केले. मुलींना नासविले. त्या धक्याने रघु भिल्लाच्या पत्नीने आत्महत्या केली. परंतु त्यापूर्वी नारायणराव सरपंच आणि त्यांच्या सार्‍या कुटुंबाचे प्रताप ग्रामसेवकास सांगितले. तात्या सावकाराच्या ग्रामसेवक मुलाने त्यांचे सारे म्हणणे ऑडिओ टेपच्या सहाय्याने तेथे नोंदवून घेतले. रघू भिल्लाच्या पत्नीने तात्या सावकाराच्या मुलाला आता सबळ पुरावाच हाती आल्याने धीर आला होता.
तात्या सावकाराच्या मुलाने त्या ऑडिओ टेपच्या ३-४ सी. डी. तयार करून मूळ टेप त्याच्या वकील मित्राकडे दिली. रघु भिल्लाची भेट तात्या सावकाराच्या मुलाने घडवून आणली. त्यावेळी नारायणरावाच्या कटू कारस्थानाबद्दल रघु भिल्लाने दुजोराच दिला. त्या वकील मित्राने सुध्दा नारायणराव यांनी त्यांना आणि कुटुंबाला कसे छळले होते हे
सांगितले. प्रथम रघु भिल्ला यातून सोडवू या म्हणून वकिल मित्राने सत्य हकीकत सांगून सारेच कामाला लागले.
(आपण कोणीही कायदा हातात घ्यायचा नाही. अशाही सूचना त्यांना दिल्या.)
नारायणरावाचा मुलगा आता सरपंच होता. त्याने पंचायतीची ४ मजली इमारत उभी करण्याचा घाट घातला. शेतकर्‍यांच्या उत्पन्नातून सक्तीने ५ हजार रूपये कापून घेतले. सरकारी मदतीपैकी २५ टक्के रक्कम पंचायत इमारतीसाठी खर्च करून बाकीची आपल्या कारखान्याच्या विकासासाठी वापरली. पंचायतीची इमारत एका मजल्यावर स्वतःचे कार्यालय थाटले. तात्या सावकाराच्या ग्रामसेवक मुलाला तलाठ्याकडून सर्व करून घ्यावयाला लावले. गावचा विकास आता थंडावत चालला. गाडगे महाराज अभियानातर्फे सरकारकडून मिळालेली मिशनरी विकून टाकली सुलभ शौचालयाचा पैसा आपल्या बंगल्यासाठी वापरला. गावातील लोकही कंटाळून गेली. उत्सव संपले बंद झाले. मंदीरात लागत असलेले तेलाचे दिवे बंद झाले. देव अंधारात राहिले. रस्त्यावरचे दिवे बंद झाले. रस्ते उखडले होते. छुळछुळ वाहणारी नदी आटली, त्यामुळे नळ योजना संपली. सरपंचाने बांधलेल्या विहरीवर एका हंड्यास १० रू. पडू लागले. सरपंचाच्या विरोधात बोलावे तर दुसर्‍या दिवशी त्याची शोकसभा त्यांच्याच अध्यक्षतेखाली व्हायची. सारे आनंदपूर सारे दुःखपूरात बदलले गेले.
मुलाच्या अघोरी कृत्याला नारायणराव देखील वैतागले. परंतु त्यांनी आपल्या आईलाच स्वतःच मारले होते हे मुलांना माहित असल्याने ते म्हणायचे बाबा तुमचे वय झाले. या वयात जायचेय का खडी फोडायला? आम्ही करतोय ते पहात रहा. गप्प बसा. दुसरीकडे रघु भिल्लासह त्या ४/५ मित्रांचे वेगळेच कारस्थान नारायणराव आणि कुटुंबाच्या विरोधात रचले जात होते. आपल्या नवर्‍यांच्या उद्योगाला नारायणरावांच्या सुनाही वैतागल्या होत्या. पण त्यांचे काहीही चालत नव्हते. यासर्व षडयंत्राची परिस्थितीची माहिती लेखी स्वरुपात कळविली होती. सगळेच आपल्या ताटाखालची मांजरे आहेत अशा थाटात सरपंचाची मुले वावरत होती.
आनंदपूर गावाच्या सरपंचाच्या विविध खेळीचे प्रताप वकिलामार्फत आणि असंख्य गावकर्‍यांच्या सहीने सी. बी. आय. पर्यंत पोहचले होते. पंचायतीच्या नव्या इमारतीच्या उदघाटनासाठी सरपंच मुलाने जिल्हाधिकार्‍यांना बोलाविले होते. त्यामुळे गावातील वातावरण जत्रेसारखे झाले होते. गावकर्‍यांची इच्छा नसून देखील जीवे मारण्याच्या भीतीपोटी सारेच हजर होते.
सकाळी ९ ची वेळ नारायणरावासह त्यांचा सरपंच मुलगा इतर मुले सारे कुटुंब देवळाजवळच्या पंचायत इमारती जवळ जमले होते. हॉर्न देतच प्रथम पोलिसांचा ताफा आला त्याच्या मागे जिल्हाधिकारी आणि आणखी ४/५ लाल दिव्याच्या मोटारी येऊन थांबल्या. त्यातून एकक अधिकारी बाहेर पडला. नारायणरावांच्या सर्व कुटुंबियांनी खुद्द सरपंच असलेल्या मुलानेही त्यांचे स्वागत केले. इमारतीच्या उदघाटनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर गावकरी उठून जाऊ लागले तसे पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी आणि सी. बी.आय. अधिकार्‍यांनी सर्वांना थांबण्याची विनंती केली.
जिल्हाधिकार्‍यांनी पोलिस अधिकार्‍यांना विनंती करून आनंदपूर गावाबद्दलचे वैशिष्ट्य सांगण्यास सांगितले. सुरुवातीचे कौतुक उदगार ऐकून नारायणरावसह सारे सुखावले मध्यंतरीच्या काळात याच गावाच्या विकासाचा प्रताप सरकारकडे आला तो सांगण्याची विनंती जिल्हाधिकार्‍यांनी केली. त्यावेळी शंका येऊन नारायणरावांसह सर्व कुटुंब पळून जाण्याच्या बेतात असता पंचायतीच्या कार्यालयाला वेढा पाहून नारायणरावाच्या पायाखालची वाळू सरकली. कुटुंबाचे एक एक प्रताप ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. कारण प्रत्येकास मनातून वाटले होते देवाच्या दारी उशीरा का होईंना न्याय असतोच तोच न्याय आता आपल्याला मिळालेला आहे. नारायणरावांसह सर्वांना अटक केली आणि जिल्हाधिकार्‍यांनी एक घोषणा करावी म्हणून पोलिस अधिक्षकांनी विनंती केली. हे आनंदपूर मध्यंतरी दुःखदपूर झाले होते. आता नारायणराव कुटुंबाची सारी मालमत्ता सरकार जमा केलेली असून तात्या सावकाराचे चिरंजीव सध्याचे ग्रामसेवक या आनंदपूर सरपंच म्हणून पुढील ५ वर्षांसाठी निवड केली आहे. असे म्हणून त्यांचे नाव पुकारून सर्वा समक्ष लेखी आदेश दिला…. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर तेथे आनंद ओसंडतांना दिसत होता……..
पंडीत हिंगे, हडपसर.
(सौजन्य – “पंढरी प्रहार”)

— पंडीत हिंगे, हडपसर.

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..