Web
Analytics
समत्व बुद्धी – Marathisrushti Articles

समत्व बुद्धी

एका टोंकावरती जातां,  शांत न राही झोका तेथें
विलंब न करता क्षणाचा,  जायी दुजा टोका वरती,

जीवनांतील झोके देखील,  असेच सदैव फिरताती
बऱ्या वाईटातील अंतर,  नेहमी चालत असती

समाधान ते मिळत नसे,  जेव्हां बघता तुम्हीं भोग
त्यांत देखील निराशा येते,  मनीं ठरविता जेव्हां योग

जवळपणाच्या नात्यामध्यें   दुरत्वाचे अंकूर फूटते
दूर असता कुणी तरी,  जवळ करावे वाटते,

संतूलन करूनी मनाचे,  समत्व बुद्धी ठेवावी
टोकावरती जाण्याची भूमिका,  सदैव टाळीत रहावी,

मध्य बिंदू तो साधतां, निवड न राही एकाची
स्थिरत्व येईल जीवनाचे,  टोके जातां सुख दु:खाची.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1336 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…