समाधानी अश्रू

बांधले होते सुंदर घरटे,   कौशल्य सारे एकवटूनी
वृक्षाच्या उंच फांदिवरी,  लोंबत होते झोके घेवूनी…१,

दूर जावूनी चारा आणिते,   पक्षीण आपल्या पिल्याकरिता
जग सारे ते घरटे असूनी,  स्वप्न तिचे त्यांत राहता…२,

वादळ सुटले एके दिनी,   उन्मळून पडला तो वृक्ष
पिल्लासाठी ती गेली होती,   शोधण्यासाठी आपले भक्ष्य…३

शाबूत घरटे फांदी वरते,  वृक्ष जरी तो पडला होता
पिल्लामधली ती कुजबुज,  असह्य दशेत ऐकत होता…४

कित्त्येक वर्षीचे जीवन त्याचे,  क्षणांत भूमिगत झाले
स्थिर बघूनी पक्षी घरटे,  अखेरचे ते अश्रू गळले…५

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1530 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…