नवीन लेखन...

रॅपिड ट्रान्झिट रेल सिस्टीम…

जगामध्ये जसजशी शहरं झपाट्याने वाढत गेली, तसतशी जलद वाहतुकीची गरज वाढू लागली, लोकल-रेल्वेयंत्रणा अपुरी पडू लागली. त्यातच जागेची कमतरताही भासू लागल्याने तीन नवीन यंत्रणा अस्तित्वात आल्या:

१. मेट्रो

२. मोनोरेल

३. लाईट रेल

युरोपमध्ये जमिनीखालून रेल्वे (अंडरग्राऊंड ट्यूब-रेल्वे) फार लवकर उपयोगात आणली गेली होती. लंडन मधील पॅडिंग्टन ते फटिंग्टन अशी ४ मैल लांबीची ट्यूब-रेल इ.स. १८६३ मध्ये बांधली गेली. त्या काळात रोज २६,००० प्रवासी या मार्गाने प्रवास करीत असत. ट्यूब-रेल्वेची प्रगती इतकी झपाट्याने होत गेली, की गेल्या १५० वर्षांत लंडन ट्यूब-रेल्वे त्या शहराचा अविभाज्य घटक बनली आहे. जमिनीच्या पोटात शिरण्याकरता उत्तम सरकते जिने, स्टेशनं, हवा खेळती ठेवण्याची व्यवस्था, ह्या सर्व गोष्टींसाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरलं गेलं. आज लंडन परिसरात २७५ स्टेशन्स व ४०८ कि.मी. लांबीचे विविध मार्ग (जमिनीखाली १ ते ३ मार्ग) असून, रोज जवळजवळ ३० लाख लोक प्रवास करतात. २०१३ साली लंडन ट्यूब-रेल्वेला १५० वर्षं झाली. त्यानिमित्तानं एक शानदार सोहळा आयोजित केला गेला आणि क्वीन एलिझाबेथ यांनी ट्यूब रेल्वेनं प्रवास केला.

इंग्लंडनंतर युरोपियन देशांमध्ये ट्यूब-रेल्वेची बांधणी भराभर होती गेली. रशियामधली ‘मॉस्को ट्यूब – रेल्वे’ ही जगातील सर्वांत उत्तम व स्वस्त म्हणून प्रसिद्ध आहे. तेथील प्रत्येक स्टेशन हा कलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

पुढे अमेरिका, चीन, जपान सर्वांनीच ट्यूब – रेल्वे अमलात आणली. आज जगातील सर्व मोठ्या शहरांत ट्यूब रेल्वे हे दळणवळणाचं महत्त्वाचं साधन आहे.

ब्रिटिश राज्यकर्त्यांनी स्वतःचा फायदा लक्षात घेऊन भारतात फार लवकर रेल्वे सुरू केली, परंतु ट्यूब – रेल्वे बांधण्यात त्यांना कोणताही फायदा नव्हता, त्यामुळे भारतातील ट्यूब-रेल्वे बांधणीला फार उशीर लागला.

१९४९ मध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बिधनचंद्र रॉय यांनी कलकत्ता शहराकरिता ट्यूब – रेल्वे बांधणीच्या दृष्टीने प्राथमिक स्वरूपाचा अहवाल तयार करण्याची सूचना केली, परंतु ते सर्व कागदावरच राहिलं. इ.स. १९७२ साली इंदिरा गांधींनी मेट्रो कामकाजाचा मुहूर्त केला. १९८४ साली भारतातील पहिली मेट्रो कलकत्ता येथे सुरू झाली. एकंदर, काम धीम्या गतीने चालत हळूहळू कलकत्त्यातील सार्वजनिक वाहतुकीचा ती एक मुख्य घटक बनली आहे. २०१३ सालापर्यंत या मेट्रो रेलचा मार्ग १२० कि.मी. लांबीचा होता. या मेट्रोच्या डब्यांची रचना आधुनिक आहे आणि या मेट्रो रेलवर ५ रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत तिकिटाचे दर लावलेले आहेत.

ज्या शहरांची लोकसंख्या २० लाखांहून जास्त असेल तेथे वरील तीन पद्धतीचे रेल्वेमार्ग बांधण्याचा निर्णय रेल्वेबोर्डाने इ.स. १९९० मध्ये घेतला. दिल्ली विस्तारित प्रदेशात ३ टप्प्यांतून रेल्वेबांधणी सुरू झाली. १९९८ सालापर्यंत १४४ अब्ज कोटी रुपये खर्च झाले. २०१२ पासून हा खर्च १ मीटर बांधणीसाठी २ अब्ज कोटी रुपये इतका पडत आहे. आतापर्यंत १९२ कि.मीटर रेल्वेमार्गावर २०० गाड्या धावतात. त्यांच्या २५०० फेऱ्या एका दिवसात होत असून, दर २ ते १० मिनिटांच्या अंतराने गाड्या धावत असतात. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी दिल्ली रेल्वे स्टेशन धावणारी ‘दिल्ली एअरपोर्ट एक्सप्रेस’ ही गाडी २० मिनिटांच्या अंतराने जा-ये करत असते. ही गाडी सर्व प्रकारे अत्याधुनिक असून, विमान तळावर प्रवाशांचं सामान चेक-इन करण्याची स्टेशनवरच सोय असल्याने विमान प्रवाशांचा बराच वेळ वाचतो. गाडीचा वेगही सुसाट असून पस्तीस मिनिटांत हा प्रवास पूर्ण होतो. मोटारीच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅम टाळणाऱ्यांसाठी ही उत्तम सोय आहे. पहिल्या दिवसापासून ‘दिल्ली ट्यूब –रेल्वे’ अतिशय फायद्यात असून, १९ ऑगस्ट २०१३ रोजी २६ लाख लोकांनी एकाच दिवशी या ट्यूब-रेल्वेने प्रवास केला होता. मुंबईत मेट्रोचा मार्ग वर्सोवा ते घाटकोपर असा नुकताच सुरू झाला आहे.

भारतातील मेट्रो पूर्णपणे जमिनीखालून जात नसून, त्या बऱ्याच ठिकाणी शहराच्या गर्दीच्या रस्त्यांवरून जातात. त्यांना वळणे अतिशय तीव्र असल्याने वेगमर्यादा ताशी ३० ते ४० कि.मी. इतकीच ठेवता आली आहे. याउलट, जगातील बहुतेक मेट्रो अतिशय वेगात ताशी २०० ते ३०० कि.मी. अंतर कापतात. दिल्ली ते गुरगाव ही ५ कि.मी. अंतराची मेट्रो खाजगी मालकीची असून, असा हक्क असलेली ही भारतातील पहिलीच मेट्रो-रेल्वे आहे.

बंगलोर शहरामध्ये NAMA Metro ही २०११ सालापासून सुरू झाली आहे. चेन्नईकरता मास रॅपीड ट्रांझिट सिस्टीम २००२ पासून चालू झाली आहे.

दिल्ली मेट्रो ऑथॉरिटी अॅक्ट २००२ प्रमाणे भारतातील २० शहरांकरता १० वर्षांचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी २००० अब्ज कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पैशांचं हे महाधनुष्य कसं पेललं जाणार आहे हे काळच ठरवेल.

-डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 178 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..