नवीन लेखन...

रामकृष्णबुवा वझे तथा वझेबुवा

रामकृष्णबुवांना लहानपणापासून गायक होण्याचाच ध्यास होता. त्यांच्या आईनेही मुलाला गायकीचे शिक्षण देण्यासाठी काबाडकष्ट घेतले. त्यांचा जन्म २८ नोव्हेंबर १८७४ रोजी झाला. लहान वयातच बुवांचा संगीताकडील ओढा स्पष्ट झाल्यावर त्यांनी संस्थानातील राजगायकांकडे संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे दोन वर्षे गाणे शिकल्यावर ते मालवण येथे पुढील संगीत शिक्षणासाठी गेले. घर सोडल्यानंतर रामकृष्णबुवा आधी पुण्याला गेले. तेथून संगीत शिक्षणासाठी मुंबई, इंदूर, उज्जैन, वाराणसी असा त्यांचा प्रवास चालू राहिला. ग्वाल्हेर येथे उस्ताद निसार हुसेन खाँ यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांच्या कारकीर्दीला खरे वळण मिळाले. त्यांनी काही काळ जयपूर येथे मनरंग परंपरेतील मुहम्मद अली खान यांच्याकडूनही शिक्षण घेतले. जयपूर येथे त्यांची गाठ पुन्हा निसार हुसेन खाँ यांच्याशी पडली. ह्या खेपेस खाँसाहेबांनी वझेबुवांना कसून तालीम दिली. वाराणसी येथे त्यांना स्वामी विवेकानंदांच्या सहवासात १५ दिवस राहण्याची संधी मिळाली. नेपाळमध्ये दरबारगायक म्हणून त्यांनी वर्षभर सेवा केली. गायक नट कै. केशवराव भोसले यांच्या आग्रहावरून बुवांनी ललितकलादर्श या कंपनीच्या नाटकांना चाली दिल्या.

स्वातंत्रवीर सावरकर लिखित रणदुंदुभी आणि सन्यस्त खड्ग ह्या संगीत नाटकातली पदे वझे बुवांनी स्वरबद्ध केली होती. वधुपरीक्षा, संन्यासाचा संसार, शहा शिवाजी, श्री, रणदुंदुभी, नेकजात मराठा, सोन्याचा कळस अशा अनेक नाटकांतील त्यांनी संगीत दिलेली पदे लोकांच्या विशेष पसंतीस उतरली. त्यांनी देशभर भ्रमंती करून अनेक मैफली गाजविल्या. त्यांनी तयार केलेल्या गायकीचा ‘वझेबुवांची गायकी’ म्हणून खास गौरव झाला. दुर्मिळ संगीत रागांमधील दुर्मिळ चीजांचे त्यांनी संकलन केले होते, ते ‘संगीत कला प्रकाश’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाले. गायनावर निस्सीम प्रेम केलेल्या या थोर गायकाने गाणे हे श्रोत्यांसाठी आहे असे सतत मानले. गोव्यात तसेच महाराष्ट्रात दीनानाथ मंगेशकर, केसरबाई केरकर, व्ही.ए. कागलकरबुवा, तानीबाई, केशवराव भोसले, भास्करराव जोशी, बापुराव पेंढारकर, भार्गवराम आचरेकर, हरिभाऊ घांग्रेकर, भालचंद पेंढारकर, गुरुराव देशपांडे, दिनकरपंत फाटक, गजाननबुवा जोशी, शिवरामबुवा वझे, लक्ष्मणराव वझे, मोहनबुवा कर्वे, विनायकराव पटवर्धन अशा पुढे नावारूपाला आलेल्या कलाकारांना रामकृष्णबुवांनी गायनाचे शिक्षण दिले. रामकृष्णबुवा वझे यांचे निधन ५ मे १९४५ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..