पुंडलिकाचे दैवत

आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला,
उभा विठ्ठल दारावरती,  हेच तो विसरला  ।।धृ।।

आईबाप हे दैवत ज्याचे,
रुप पाही त्यांच्यात प्रभूचे  ।
सेवा करीत आनंद लूटतां,  तल्लीन जो जहला
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला  ।।१।।

निद्रेमध्यें असतां दोघे,
मांडी देऊनी आपण जागे  ।
कशी मोडू मी झोप तयांची,  प्रश्न विचारी भगवंताला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला  ।।२।।

वीट देऊनी विठ्ठलासाठीं,
उभे केले त्या जगजेठी  ।
आपण गेला घेऊन त्यांना,  स्नानाकरीता चंद्रभागेला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला  ।।३।।

आठ्ठाविस युगे गेली उलटूनी,
कटीवरती हात ठेवूनी  ।
पांडूरंग बघे वाट तयांची,  भक्तितच जे विसरती जगाला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला  ।।४।।

डॉ. भगवान नागापूरकर

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1530 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…