नवीन लेखन...

प्रेमाचा उगम

दाखवू नकोस प्रेम तुझे उपरेपणाच्या भावनेने  ।

तसेच मिळेल परत तुला केवळ वाणीच्या शब्दाने  ।।

कंठामधूनी भाष्य निघाले आदळे कर्णपटावरी  ।

प्रेमाचा बघूनी ओलावा परिणाम होई मनावरी  ।।

शब्द निघता हृदयामधूनी झेप घेई हृदयस्थरावरी  ।

आत्म्याची तळमळ भिडते आत्म्याच्या गाभ्यावरी  ।।

खोलवर आणिक जाता ईश्वर बिंदूत विलीन होतो  ।

सत्याचा शोध लागूनी आनंदाचा पाऊस पडतो  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2022 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..