पूजाविधी गाभा

सोडूनी दिली मी पूजाअर्चा,  समाधान मज ज्यात न लाभले

दैनंदिनीच्या कार्यक्रमातील,  एक भाग तो सदैव वाटले….१

बालपणी मज कुणी शिकविले,  पूजाअर्चा आन्हकी सारे

ठसले नाही मनात कधीही,  भक्तीला हे पोषक ठरे

पूजाअर्चा ह्या विधीमध्ये,  लक्ष आमचे केंद्रीत होते

हळदी कुंकू गंध फूले आणि,  दीपधूप हे मधूर जळते

सुबकतेच्या पाठी लागूनी,  यांत्रिकतेसम आम्ही झालो

अर्थ ज्याचा कधी न कळला,  मंत्र मुखोदगत वदू लागलो

वास्तव्य ज्याचे सदैव सागरी,  स्नान तयाला काय घालता

नैवैद्य ज्याला अर्पण करितो,  तो विश्वाचा असे अन्नदाता

प्रेमभाव भक्तीसाठा उचंबळूनी तेव्हा न आला

तांत्रिकतेच्या आहारी जावूनी,  मुख्य गाभा विसरूनी गेला

पूजा विधी हा मार्गदर्शक,  समरस होण्या प्रभू चिंतनी

रेंगाळूनी जाता वाटेवरती,  वेळ दौडतो ध्येय विसरूनी

चिंतन मनन ध्यानामध्ये,  पूजा अर्चा जावे विसरूनी

हेच खरे ते साध्य आहे,  जे समर्पीत होते ईश्वर चरणी

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1447 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…