नवीन लेखन...

फोटोग्राफी टुरिझम  (एक वेगळी आवड)

२१ व्या शतकातील दोन दशके संपता संपता पर्यटन माध्यम विविध अंगांनी वाढत आहे. फिरायला निघालो की फोटो हवेच. काही वर्षांपूर्वी कॅमेरे थोडे महाग होते. पुन्हा प्रिंटचा खर्च. सगळे समीकरण थोडं महागच होतं. त्यामुळे आवड असूनही लोक फोटोग्राफीकडे वळायचे नाहीत. Compact कॅमेऱ्यानी क्रांती आणली असं म्हणायला हरकत नाही. थोड्या स्वस्तातल्या कॅमेऱ्यांमुळे पर्यटकांची स्वतः फोटोग्राफी करायची हौस भागत होती.

डिजिटल कॅमेऱ्यांचा बाजारपेठेत प्रवेश झाला आणि पर्यटकांची फोटोग्राफीची आवड असलेल्यांची चांदीच झाली. त्यात नवीन आलेल्या लेटेस्ट मोबाईल फोनने टुर्समधला प्रत्येक क्षण टिपायची चढाओढच सुरू झाली. चांगल्या फोटोग्राफीची आवड जोपासणाऱ्या एका वर्गाची काही वर्षात वाढ होत गेली. आणि यातूनच पर्यटन क्षेत्रातील फोटोग्राफी टुर्सचा जन्म झाला.

पर्यटन आणि फोटोग्राफी यांचं अतूट नात आहे. प्रत्येक पर्यटक फोटोग्राफी करतोच, बहुतांशी पर्यटक फोटोग्राफीसाठी Compact कॅमेराच वापरतात. पण अलीकडच्या काळात डीएसएलआर कॅमेराचा वापर अनेक पर्यटक करू लागले आहेत.

फोटो टुरिझम म्हणजे टूर वर निघालोय आणि फोटो काढले असे नसून आपली आवड काय आहे, कुठल्या विषयात रुची आहे त्या अनुषंगाने आपण आपले स्थळ निवडणे अपेक्षित असते.

फोटो टुरिझममध्ये ढोबळ मानाने काही प्रकार आहेत. निसर्ग चित्रण (Nature Photography), सांस्कृतिक चित्रण (Culture Photography), पुरातत्व चित्रण (Architecture Photography), Landscape Photography, Wildlife Photography, आपण कुठल्या छंदासाठी (फोटो टुरिझम) निघालो आहोत, त्या अनुषंगाने लेन्सेसचा वापर करणे खूप आवश्यक आहे. Landscape Photography करताना जास्तीस जास्त Wide Angle लेन्सेसचा वापर करावा. Wildlife Photography करताना Tele Photo Lense चा वापर करावा. (१००/४००, १५०/६००, २००/५००, ७०/२००)

फोटोग्राफी करताना काही अलिखित नियम पाळणे आवश्यक आहेत निसर्ग चित्रण करताना निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. Wildlife Photography करताना शांतपणे निरीक्षण करावे. जंगलाचे नियम समजून घ्यावेत.

भारतात फोटोग्राफी टुरिझमला खूप वाव आहे. एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य कमी पडू शकते इतकी विविधता आपल्या देशात आहे. भारतात अनेक परदेशी पर्यटक Culture Study साठी येत असतात. Photo Documentation करून त्यांच्या देशात जाऊन PHD करतात इतका आपला देश समृद्ध आहे.

फोटोग्राफी टुर्स करताना एक गोष्ट लक्षात घेण्याची खूप गरज आहे, आपण निवडत असलेली पर्यटन कंपनी किंवा ग्रूप कडे निष्णात गाईड्स आहेत का याची खातर जमा करावी आणि आपण जात असलेल्या ठिकाणाचा स्वतः अभ्यास करावा जेणे करून आपण जेव्हा प्रत्यक्ष फोटोग्राफी कराल तेव्हा तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल.

तुम्ही जर नवीनच फोटोग्राफीला सुरुवात करत असाल तर चांगल्या फोटोग्राफरचे मार्गदर्शन घ्याच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या डोळ्यांना, मनाला काय भावतंय ते पहा, बघा. तुमचा फोटो सुरेखच येईल.

आपण खास फोटोग्राफी पर्यटनास निघणार आहात तर काही गोष्टीची काळजी निश्चितच घ्या.

१. कॅमेरा बॅटरी/ सेल पुरेसे घ्यावेत.

२. मेमरी कार्ड (आपण किती दिवसांसाठी टुरला निघणार आहात त्याचा अंदाज घेऊन तेवढी मेमरी कार्डस्, कार्ड रिडर्स घ्यावीत.

३. बॅटरी चार्जर्स.

४. कॅमेरा लेन्सेस, एन. डी. फिल्टर्स, पोलोरेझ फिल्टर्स.

५. हार्ड डिस्क/ रोजच्या रोज टिपलेले फोटो स्फर करण्यासाठी एक लॅपटॉप.

ज्या भागात तुम्ही फोटोग्राफी करण्यासाठी जाणार असाल तिथे विजेचा प्रॉब्लेम असेल तर सोलर चार्जर घेतला तर उत्तम. किंवा कार चार्जर आपल्या सोबत बाळगावा.

-संतोष निंबाळकर

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..